Skip to main content

शेती बरोबरच वेळ जाण्यासाठी काय कामधंदा करावा?? काहीतरी सूचवा!!!!

लेखक टर्बोचार्जड फिलॉसॉफर यांनी बुधवार, 23/08/2017 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
मी शेती करतो व त्यावर माझ्यापुरता चरीतार्थ चालवतो.सातारा शहराजवळच आमचे शेत असल्याने मला शेतात राहवे लागत नाही.आठवड्यातून दोन तीन चकरा होतात तेव्हढेच.शेतात पुर्वी गहू ,ज्वारी,मका हे पीक वडील घेत होते.गहू ज्वारी घरी खायला व्हायची.पण आजकाल असल्या भुस्कट पिकाच्या फंदात कोणच पडत नसल्याने आम्हीही उस हेच पीक घेतो.उसाला एकदा पक्की बांधणी (लागणीनंतर चार पाच महीन्याने) झाल्यानंतर फक्त पाणी द्यायला लागते.त्यासाठी एक माणूस ठेवला आहे. तर!!!

साखर खाल्लेला माणूस - एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी अर्थात एक प्रसन्न नाट्याविष्कार

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 23/08/2017 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
विलास व माधवी देशपांडे हे एक मध्यमवर्गीय जोडपं. यांना २२-२३ वर्षांची ऋचा ही एकुलती एक मुलगी. ती जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडतेय. विलास एका खाजगी विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जास्त वेतनाच्या अपेक्षेमुळे सरकारी नोकरी सोडून तो खाजगी क्षेत्रात आला आहे. लठ्ठ वेतनाबरोबरच तिथे असलेले विक्रीचे चढते लक्ष्य, व्यवसायवृद्धीची जबाबदारी, त्यामुळे येणारे ताणतणाव या सर्वांचा त्याच्या प्रकृतीवर व वागणुकीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव बराचसा चिडचिडा व उतावळा झाला आहे. कामाबरोबरच येणार्‍या दारू पार्ट्या, धूम्रपान, जागरणे याने तो त्रस्त आहे.

लिंगायत समाज हिंदू धर्मा पासून वेगळा होऊ इच्छितो. पण का ?

लेखक साहना यांनी बुधवार, 23/08/2017 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
लिंगायत समाजाने आपणाला वेगळा धर्म अशी ओळख मिळावी अशी मागणी केली आहे. भारताच्या इतिहासात हि काही पहिली घटना नव्हे, ह्या आधी रामकृष्ण मिशन ने तीच मागणी केली होती. येत्या काही वर्षांत हि मागणी इतर अनेक पंथ करतील ह्यांत काहीही शंका नाही. वीरशैव लोकांनी सुद्धा हि मागणी करायला सुरुवात केली आहे. पण लिंगायत समाज कसा हिंदूच आहे आणि हि मागणी कशी निरर्थक हे अनेक लोक साक्षी पुरावे देऊन मांडतील पण त्याला काहीही अर्थ नाही. ह्या मागणीची "वरवरची करणे" आणि खरी कारणे वेगळी आहेत. हि मागणी नक्की का केली जात आहे त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

एका सुंदर उपक्रमाची आणि जबरदस्त मोहीमेची दखल!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 23/08/2017 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार. एका जबरदस्त मोहीमेची आणि एका सुंदर उपक्रमाची माहिती आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली. एखादी व्यक्ती आपली आवड, पॅशन, छंद ह्यामधून किती सुंदर काम उभं करू शकतो आणि त्याही पलीकडे इतरांना किती मोठी प्रेरणा देऊ शकतो, ह्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांना हर्षद पेंडसे हे नाव ओळखीचं असेल. हर्षदजी ९ सप्टेंबर रोजी लेह- खर्दुंगला येथे होणा-या खर्दुंगला चॅलेंज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. खर्दुंग- खर्दुंगला- लेह ही ५००० मीटर्स पेक्षा जास्त उंचीवरची ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि त्यात ते सहभाग घेत आहेत!!!