Skip to main content

श्रीगणेश लेखमाला : लेख क्र. ९ : एका बापाचा जन्म

लेखक दशानन यांनी रविवार, 03/09/2017 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले आवडणे व आपले एक लहान मूल असणे यात जास्त फरक असेल असे मला तरी मागील वर्षापर्यँत वाटत नव्हते. पण मागील वर्षाच्या सुरुवातीलाच सौने शक्यता व्यक्त केली व पुढे काही दिवसांत खातरीलायक बातमी दिली की मी बाबा आणि ती आई होणार आहे. “अरे वा, छान छान” असे कौतुक इत्यादी करून मोकळा झालो, पण आतून हादरलो होतो... अनपेक्षित असे काहीतरी आयुष्यात घडत होते आणि पहिल्यांदा! आनंदी होतो का? हो निश्चित, खूप खूप. मनात खूप मोठे काहूर उठले होते, उत्सुकता होती, तसेच एक अनामिक भीतीदेखील. अशी बातमी मला काही वर्षांपूर्वीदेखील मिळाली होती, तो आनंद फक्त महिनाभर टिकला होता. मनात नको नको ते विचार येत-जात होते.

बाप्पाचा नैवेद्यः दलिया खीर

लेखक इडली डोसा यांनी रविवार, 03/09/2017 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही फार सुगरण नाही आणि बाप्पासाठी छान छान खाऊ करायला सुगरण असायची खरंतर गरजच नाही. दलियाची खीर आहेच अशी सहज सोपी आणि पटकन होणारी. शिवाय कोणालाही करता येईल अशी. बाप्पापण खूश आपण पण खूश. आमच्या इथे सज्जनगडावर नेहमी हा प्रसाद असतो, सगळ्यात पहिल्यांदा ही खीर मी गडावरच खाल्ली. आता स्वत: करत असले तरी गडावरच्या खिरीची सर माझ्या खिरीला मुळीच नाही.

"शेंडी लावणे"

लेखक विदेशी वचाळ यांनी रविवार, 03/09/2017 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याला किंवा एखादीला किंवा समस्त जनतेला, "शेंडी लावणे", हा बहुदा आपला सगळ्यांचा जन्म सिद्ध हक्क असावा. आणि तो तसा नसेल, तर जगातल्या सगळ्या लोकशाही देशात घटना दुरुस्ती करून मान्य करून घ्यावा, अशा एका निर्णयाप्रत आम्ही सध्या पोहोचलो आहोत. तसे असले अनेक निर्णय आम्ही तडकाफडकी घेत आणि सोडत असतो तेव्हा त्याचे फार मनावर घेऊ नये. तर त्याचे झाले असे कि आमचे मन उगाचच भरकटत आमच्या विद्यार्थी जीवनात डोकावते झाले आणि आमच्या काळी आम्ही लोकांना आणि लोकांनी आम्हाला लावलेल्या शेंड्यांची आठवण झाली. तसा मी एका ख्यातनाम संस्थेत शिकायला होतो. ते थोडेसे टेकाडावर वसवलेले होते.

बकरी ईद आणि हैदराबाद (अर्थात हैदराबाद डायरी)

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 02/09/2017 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात.

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ८ : दिव्यत्वाची प्रचिती

लेखक बाजीप्रभू यांनी शनिवार, 02/09/2017 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न : सगळे डॉक्टर हरामखोर असतात का? उत्तर : "होय" प्रश्न : सगळे डॉक्टर रुग्णांचं रक्त पितात का? उत्तर : "अलबत" प्रश्न : डॉक्टर गुजराथी असल्यास? उत्तर : तर तो महाहरामखोर असेल. प्रश्न : हॉस्पिटल जर बनियाचं आणि डॉक्टर मारवाडी असल्यास? उत्तर : लांडग्यांच्या कळपात मारलेली उडी, पायावर कुऱ्हाड किंवा कुऱ्हाडीवर पाय वगैरे वगैरे. २०१५ सालच्या १ ऑगस्टपूर्वीपर्यंत एखाद्या ‘रॅपिड फायर’मध्ये मला जर कोणी वरील प्रश्न विचारले असते, तर हीच उत्तरं मी तत्काळ दिली असती. असं म्हणतात आजकाल चांगला डॉक्टर मिळायचा असेल तर पदरी भरपूर पुण्य असावं लागतं, आणि माझं तर देव दरबारात साधं करंट अकाउंटदेखील नव्हतं.

(महाग्रु)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 02/09/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
(महाग्रु) पेरणा क्र १ आणि पेरणा क्र २ सूर्य मी अन काजवे ते, जाणूनी होतो जरी राहतो धूंदीत माझ्या, पाठ माझी खाजरी आत्ममग्न उष्टपक्षी, म्हणती मला पाठीवरी मीच घडवले, मीच केले, ग्रेट माझी शायरी भेट जर झालीच आपुली, सोडेन ना तूजला घरी माझिया माझेच कौतुक, ऐकूनी तू दमला जरी समूळ पिळून्-बोरकर अज्ञ पामरांच्या माहिती साठी - उष्टपक्षी = शहामृग्

बाप्पाचा नैवेद्यः केळ्याच्या पुर्‍या

लेखक सविता००१ यांनी शनिवार, 02/09/2017 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः चांगली पिकलेली ३ केळी, अर्धी वाटी साखर (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता), यात मावेल एवढी कणीक, तळण्यासाठी तेल. कृती: केळी छान कुस्करून घेउन त्यात साखर घालावी. गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे. २-३ मिनिटांत साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण थंड होउ द्यावे. नंतर या मिश्रणात बसेल एवढीच कणीक घालून (मला दीड वाटी कणीक लागली) घट्ट पीठ भिजवून ठेवावे. साधारण अर्ध्या तासाने कणीक खूपच घट्ट वाटली तर दुधाचा शिपका मारून कणीक सारखी करून नेहमेसारख्या पुर्‍या लाटून तळून घ्याव्यात. या पुर्‍या अजिबात पाणी नसल्याने बर्‍याच टिकतात.

क्षणिक बदलांची गोळाबेरीज व संख्यामालिका : अंदाजातील अचूकतेकडे मारलेली हनुमानउडी (Integration and number series : Quantum leap towards exactness in approximations)

लेखक अनिकेत कवठेकर यांनी शुक्रवार, 01/09/2017 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा तोच चंद्रविरहित प्रहर, पुन्हा तो रातकिड्यांच्या आवाजाने भरलेला आसमंत, पुन्हा नव्याने ऐकू येणारी शिकार झालेल्या वनचराची वेदनायुक्त विव्हळणी, पुन्हा शिकार केलेल्याने दिलेली उन्मादी डरकाळी, संधीसाधू तरसांनी दरम्यानच्या वेळात केलेली स्वार्थी टेहळणी अशा एक ना अनेक नित्याच्या झालेल्या घटनांची फेरउजळणी ते जंगल राजा विक्रमाला करून देत होते. परंतु प्रजाहितदक्ष राजाला या भयावह घटनाचित्राची दखल घ्यायला सवड होतीच कुठे? त्याचे मन नेहमीप्रमाणेच त्याच्या प्रजेच्या हिताची चिंता करण्यात मग्न झालेलं होतं.

#मिपाफिटनेस - सप्टेंबर २०१७ - ज्युदो

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी शुक्रवार, 01/09/2017 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "जॅक ऑफ ऑल" जॅक ऑफ ऑल उर्फ "जॅक" पूर्वी ज्युदो खेळत होते, त्यामध्ये ब्लॅक बेल्टसारखी मैलाच्या दगडाची कमाईही केली आहे आणि अनेकदा चर्चांमध्ये काँटॅक्ट स्पोर्टमुळे स्वभाव कसा शांत होतो हे हिरीरीने पटवूनही देतात. आपल्याला ज्युदो / कराटे म्हणजे हाणामारीला उत्तेजन देणारे प्रकार वाटले तरी त्याची दुसरी बाजू शोधण्यासाठी या लेखाचा नक्की उपयोग होईल. टीम #मिपाफिटनेस - मोदक, प्रशांत, डॉ श्रीहास. **************************** एकदा सकाळी सकाळी फोन खणाणला .. मोदक कॉलिंग .