Skip to main content

मिळून मिसळून!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 08/09/2017 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक मिपाकरांनी विचारणा केल्यामुळे या धाग्यावर माहिती देत आहे. मिळून मिसळून हा फक्त मिपाकरांचा WhatsApp समुह बनवला आहे.(आधी हा समुह टेलिग्रामवर होता.पण सर्वांच्या सोयीसाठी टेलिग्रामवरुन बंद करुन तो WhatsApp वर सुरु केला आहे. समुहाचे उद्देश: १] सर्व नव्या-जुन्या मिपाकरांना एकत्र येता यावं,चांगल्या चर्चा व्हाव्यात,विषय मिपावर चर्चा करण्यायोग्य असेल तर धागा काढला जावा,धाग्याच्या लेखनासंबंधी मार्गदर्शन मिळून तो वाचनीय व्हावा.नवीन लेखकांना लेखनासाठी मार्गदर्शन मिळावं हा समुहाचा उद्देश आहे. २] राजकारण हा विषय वगळता अन्य विषयांवर चर्चा होणे,माहिती मिळणे ह

फकीर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/09/2017 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire फकीर जॅक्सन म्हणजे एक वाट चुकलेला फकीर होता. वाहवत जाणे हा त्याचा स्थायीभाव होता असं म्हटलं तरी चालेल. एकदा का एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की परत मागे फिरणे त्याच्या स्वभावातच नव्हते. ‘‘जॅक्सन’’ याच नावाने त्याला सर्व ओळखत. आगा ना पिछा. बाजारात सुद्धा ‘जॅक्सन’ याच नावाने ओळखला जाई.

अनवट किल्ले १८: संभाजीराजांच्या जीवनपटाचा साक्षीदार, प्रचितगड( Prachitgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 08/09/2017 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील गड कोट म्हणले कि आपल्याला शिवराय आठवितात. एका किल्ल्यावर जन्मलेला, किल्ल्यांच्या आधाराने आयुष्यभर राजकारण केलेला आणि एका किल्ल्यावर चिरविश्रांती घेणार्‍या या योध्द्याची प्रत्येक मराठी व्यक्तिला कोणत्याही गड कोटावर आठवण यावी हे स्वाभाविकच आहे. पण एका किल्ल्याने संभाजी राजांचा आयुष्यातले आनंदाचे आणि दुखाचे असे दोन्ही क्षण अनुभवले आहेत. हा बुलंद किल्ला आहे, श्रुंगारपुरचा पहारेकरी "प्रचितगड". प्रचितगड, उचितगड, राग्वा अशी काही नावे याला आहेत. भौगोलिक्दृष्टया सांगली जिल्ह्यात हा किल्ला येत असला तरी रत्नागिरी जिल्ह्यातुन जाणे सोयीचे आहे.

घर वादळाचे!

लेखक पद्मावति यांनी गुरुवार, 07/09/2017 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
ओबरसॉल्ज़बर्ग!! जर्मनीमधे म्यूनिचपासून साधारण दोन अडीच तासांवर असलेले एक गाव. गाव म्हणावे तर फारशी वस्तीसुद्धा नाही इथे. बर्कटेसगाडन या चिमुकल्या गावापासून काहीशा उंचीवर, डोंगराने कडेवर घेतलेला हा भूभाग. अत्यंत रमणीय निसर्ग, नजर जाईल तिथे हिरवीगार झाडी आणि जीवाला गारवा देणारी निवांत शांतता. ओबरसॉल्ज़बर्ग किंवा बर्कटेसगाडन, वरवर कुठल्याही सुंदर युरोपीयन लहानशा खेड्यांपैकी दिसणारी ही गावे गेल्या शतकात जागतीक रंगमंचावर घडलेल्या एका तूफानी नाट्याच्या केंद्रस्थानी होती याची आज कल्पनासुद्धा येणार नाही. या भागाने अवघ्या वीसेक वर्षांच्या काळात प्रचंड उलथापालथ बघितलीय, विनाश अनुभवलाय.

अजून एक हत्या , अजून एक संधी !!

लेखक जीएस यांनी गुरुवार, 07/09/2017 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनीही भारतात माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही, बळी तो कान पिळी हाच कायदा आहे, कुणाच्या शेपटावर कधी पाय पडेल व आपण जीव गमावून बसू अशा समाजात व व्यवस्थेत आपण राहतो याची पुन्हा एकदा भयप्रद जाणीव करून देणारी ही अतिशय निषेधार्ह हत्या आहे. (१) प्रत्यक्षात व सोशलसह सर्व माध्यमातूनही अराजकीय, उजव्या, मध्यममार्गी, डाव्या अशा सर्व लोकांनी या हत्येचा निषेध केला आहे. (२) गेल्या तीन-चार वर्षात बावीस पत्रकारांची हत्या झाली आहे.

दिवाळी अंक २०१७ - आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/09/2017 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या मिपाचा दिवाळी अंक आपण सादर करणार आहोत. आणि सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या भरघोस प्रतिसादाचं आवाहन आम्ही करत आहोत. गेल्या वर्षीपासून आपण मिपाच्या दिवाळी अंकात एका विशिष्ट विषयाला / साहित्यप्रकाराला वाहिलेला विभाग वेगळा करतो. गेल्या वर्षीच्या 'रहस्यकथा विभागा'ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदाचा 'विशेष विभाग' असणार आहे 'व्यक्तिचित्रे' या विषयाला वाहिलेला! मराठी साहित्यातलं व्यक्तिचित्रांचं दालन इतर भाषांपेक्षा कदाचित जास्त समृद्ध आहे.