घरा कडून घराकडे सायकल प्रवास एक स्वप्न पूर्ती (भाग पहिला)
घराकडून घराकडे सायकल प्रवास.... एक स्वप्न पूर्ती!
भाग १
सायकलिंगला सुरवात केल्यापासून आपल्या जन्मगावी एकदा तरी सायकलने जावे, ही सुप्त इच्छा मनात कायमच होती. गेल्या काही दिवसांतील सरावामुळे अंतर कापू शकेन या बद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. प्रश्न होता फक्त रस्त्यावरील सुरक्षेचा! पनवेल- गोवा महामार्गाचे सध्याचे स्वरूप थोडे उलगडून सांगितले की याविषयी अधिक खुलासा होईल. राष्ट्रीय महामार्ग असूनदेखील दुभाजकाशिवाय असलेला हा रस्ता मी स्वतः पाहिल्यानुसार गेली पंचवीस वर्षे आहे तसाच आहे. वाकण ते जवळपास इंदापूर या भागात चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत झाले आहे.
मिसळपाव
