Skip to main content

चूक-२

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 20/01/2025 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला नेहमी पाहायचे, पण लक्ष द्यायचं नाही ठरवलं होतं. माझं आयुष्य वेगळं होतं, माझे स्वप्न वेगळे होते. साधीशी मी, काळीसावळी, पण स्वाभिमान माझ्या मनात होता. घरची परिस्थिती हलाखीची होती, बाप दारू पिऊन मरून पडलेला, आई आणि लहान बहिणीची जबाबदारी माझ्यावर होती. कॉलेजला सायकलने जाणं, वर्गात शिकणं, आणि घरी आल्यावर आईला मदत करणं – हेच माझं रोजचं जगणं. पण त्या वर्गात तो होता. त्याचं आणि माझं काहीच कधी जुळलं नव्हतं. वर्गातल्या इतर मुलांसारखा तोही माझ्याकडे पाहायचा, काही बोलायचा.

काकडेच्या खुन्याची कथा.

लेखक भागो यांनी सोमवार, 20/01/2025 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
काकडेच्या खुन्याची कथा. तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.

सिंग्युलॅरिटी ऑफ वर्ड्स

लेखक प्रसाद गोडबोले यांनी सोमवार, 20/01/2025 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : १. सर्वच लोकांची बुध्दीमत्ता समान नसते. हे अगदी वैश्विक सत्य आहे. आणि आपल्याला हे अगदी लहानपणापासुन माहीती आहे. त्यामुळे सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे , अनुभवाला आलेच पाहिजे असा आपला हट्ट किंवा दुराग्रह नाही. २. मुळात कोणाला काही तरी कळावं ह्यासाठी काहीही खटाटोप करणे ह्यात आपला काय फायदा ? आपण आपल्या स्वानंदासाठी लिहावं . आपलं आपल्याला कळाल्याशी मतलब. आपल्याला जे कळलं अनुभवाला आलं त्याचेच निरनिराळे पैलु आपणच उपभोगावेत ह्यासाठी लिहावे हे उत्तम ! ३.

चूक

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 20/01/2025 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
तिची ती संतापी नजर मला सतत विचारत असते, “माझी काय चूक होती? माझ्या येण्याने तिच्या आयुष्यात एवढा मोठा बदल होईल, याचा मला कधीच अंदाज नव्हता. आम्ही दोघे एकाच कॉलेजात होतो. कॉलेजातील ती रग माझ्या अंगातही होती. ती आणि मी एकाच वर्गात होतो. साधी काळीसावळी, पण नीटनेटकी ती. रोज सायकलवरून कॉलेजला यायची, एक दिवसही गैरहजर राहायची नाही. कँटीनचा नाश्ता परवडणार नाही, म्हणून तिच्यासारख्याच चार मुलींसोबत घरून आणलेला डबा खायची. जेव्हा वर्गात विचारलं गेलं, “ग्रॅज्युएट होऊन काय करायचंय?” तेव्हा तिने आत्मविश्वासाने सांगितलं, “मला बँकेत नोकरी करायची आहे.” तिची घरची गरीबी माहीत असल्यानेच मी हे धाडस केलं होत.

जॉन अब्राहम (भाग ४)

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 18/01/2025 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अब्राहम (भाग १) ==> जॉन अब्राहम (भाग २) ==> जॉन अब्राहम (भाग ३) जेव्हा स्पष्टपणे गुलामगिरीविरोधी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार अब्राहम लिंकन यांनी १८६० च्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला, तेव्हा सुरूवातीला सात दक्षिणी राज्ये (दक्षिण कॅरोलिना, मिसिसिपी, फ्लॉरिडा, अ‍ॅलाबामा, जॉर्जिया, लुझियाना आणि टेक्सस) यांनी धोका पत्करला आणि संघटित होऊन अमेरिकेतून वेगळे होऊन नवीन देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला .

कराडची मुलगी

लेखक चौथा कोनाडा यांनी शनिवार, 18/01/2025 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ? कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी !

गोत्र, जनुकीय दोष इ० इ०

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 18/01/2025 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या माझ्या युट्यूब फीडमध्ये अचानक "गोत्र" या निरर्थक कल्पनेवर काही व्हिडीओ दिसू लागले आहेत. सर्व व्हिडीओंमध्ये वैज्ञानिक सत्याचे शक्य तेव्हढे विकृतीकरण करून या गोत्र कल्पनेचे पुनरुज्जीवन करायचा हास्यास्पद खटाटोप केलेला दिसतो. समाजाची रचना झाली तेव्हा तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे केवळ काही सोईस्कर कल्पनांच्या उथळ साधर्म्यामुळे गोत्र संकल्पनेला शास्त्रीय बैठक आहे असे दाखविण्याचा आटापीटा करणे हे अतिशय हास्यास्पद आहे.

"मी, मी आणि माझं राजकारण: दुर्बोध तऱ्यांच्या विचारांचा सागर"

लेखक महिरावण यांनी शनिवार, 18/01/2025 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
बोटीवरच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटा आनंददायी संगीत देत होत्या, आकाश निरभ्र होतं, आणि आम्ही सारे प्रवासी या अनुभवाचा आनंद घेत होतो. पण त्याच वेळी, एका कोपऱ्यातून एक कर्कश गाज ऐकू येत होती. हा आवाज होता दुर्बोध तऱ्यांचा, ज्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे "मी" आणि त्यांची सगळीकडून असलेली असहिष्णुता. दुर्बोध तऱ्यांचा दिनक्रम अत्यंत सोपा आहे: उठल्यापासून झोपेपर्यंत स्वतःचं महानत्व सिद्ध करणं. ते म्हणाले, "अहो, मला या समुद्राबद्दल सगळं माहित आहे. मी समुद्राच्या तळाशी पोहून जाऊन आलोय. खरं तर, मी नसेन तर हे जहाजही चालणार नाही." त्यांचं बोलणं सुरू झालं की सगळ्या गोष्टी एका वर्तुळात फिरत.

निवडणूक: एका मतदान केंद्र व्यवस्थापनाचा पक्षांचा खर्च किती येतो

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 15/01/2025 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूकीच्या दिवशी मतदाता मत देण्यासाठी मतदान केंद्रावर जातो. मतदात्याने मतदान केन्द्रावर जाऊन आपल्या पक्षासाठी मतदान केले पाहिजे यासाठी प्रत्येक राजनीतिक पक्षाला यंत्रणा राबवावी लागते आणि त्यासाठी मनुष्यबळ ही लागतो आणि त्यासाठी पैसा ही खर्च करावा लागतो. लोकसभा निवडणूकीच्या वेळी दोन्ही पक्षांचे बूथ प्रमुख माझ्या समोरच लहानचे मोठे झाले होते. त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती आधारावर हा लेख. लेखात बूथ व्यवस्थापकाचे नाव मी सचिन ठेवले आहे. सचिनच्या शब्दांत: सचिन मला म्हणाला, विवेकजी, निवडणूक आयोगाने निवडणूक घोषित केली.

जॉन अब्राहम (भाग ३)

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 15/01/2025 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन अब्राहम १ ==> जॉन अब्राहम २ शेवटी दुसर्‍या दिवशी १५ एप्रिलला सकाळी ७:२२ वाजता लिंकन यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले . . . अब्राहम लिंकन अब्राहम लिंकन अब्राहम लिंकनचा जन्म फेब्रुवारी १२, इ.स.