गुलाबी कागद निळी शाई
पूर्वी पत्रं "लिहिली" जात...
आता "आठवली" जातात.
गेल्या १०० शंभर वर्षांचा विचार केला तर जलद संदेशासाठी आणि दीर्घ संवादासाठी दळणवळणाची वेगवेगळी साधने होती .
ह्या १०० वर्षांचे तीन भागात विभाजन केले तर पहिल्या भागातील काळात जलद संदेशासाठी तारयंत्राचा वापर म्हणजे तार संदेश होते आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्राची सोय पोस्ट सेवेत होती. मधल्या काळात जलद संदेशासाठी फोन आले आणि दीर्घ संवादासाठी पत्र हेच माध्यम राहिले. वर्तमान काळात जलद संदेशासाठी आधी काही काळ pager मग मेसेजिंग आणि आता whatsapp आणि दीर्घ संवादासाठी हस्तलिखित पत्र नामशेष होऊन e पत्र व्यवहार सुरु झाला.
मिसळपाव