Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२०- आवाहन

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 18/07/2020 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! आषाढ संपत आलाय, आणि लवकरच श्रावण सुरू होणार आहे. श्रावण म्हणजे पाऊस, श्रावण म्हणजे हिरवळ, श्रावण म्हणजे सणांचा महिना, श्रावण म्हणजे गणेशोत्सवाची चाहूल... सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत प्रसिद्ध करतो. या वेळची थीम असेल - आठवणी. नॉस्टॅल्जिया! आठवणीत रमायला कोणाला आवडत नाही! शाळा सिनेमा बघताना आपण आपल्या शाळकरी वयात नकळत जातो.

वेडा (रहस्यकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 18/07/2020 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
वेडा (रहस्यकथा) शहराचा तो मध्यवर्ती भाग नेहमी गजबजलेला असे. महत्वाची कार्यालये, शाळा, बँका याच भागात असल्याने, हा सगळा परिसर गर्दीचा बनला होता. या गजबजलेल्या भागाच्या बरोबर मधून डांबरी रोड गेल्यामुळे, या भागाचे दोन विभाग पडले होते. एक दक्षिणेकडचा आणि दुसरा उत्तरेकडचा. उत्तरेकडच्या भागात एक मोठी खासगी शाळा होती. तिच्याच शेजारी एक राष्ट्रीयीकृत बँक होती. शाळा आणि बँक असल्याने तो भाग नेहमी वर्दळीने भरलेला असे. मोठी वाहने, जीप, रिक्षा, सायकली, हातरिक्षा, पादचारी यांच्या गजबजाटीने हा भाग नेहमी व्यस्त असे. शाळेच्या शेजारी एक मोठे वडाचे झाड होते.

पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग १ )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/07/2020 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
मौजे केर्ले-मार्गशीर्ष महिन्यातील एक निवांत दुपार. रब्बीची पेरणी होउन गाव तस निवांत झाले होते.गावकर्‍यांशी हवापाण्याच्या गप्पागोष्टी उरकून गावचा पाटील पारावर निवांत पसरला होता. डोक्याशी कुर्‍हाड ठेवून तो निवांत पारावर पसरला होता. भल्या पहाटे थंडीचे श्रम केल्याने त्याचा डोळा लागला इतक्यात गावच्या वेशीतून पोरेटोरे गलका करत चावडीकडे पळत आली. पोरांच्या दंग्याने जागा झालेला पाटील खेकसलाच,"काय कालवा लावला रे?". पोरं घाईघाईने बोलु लागली.पळाल्यामुळे धापा टाकता टाकता त्यांनी सांगितले कि उगवतीकडून एक फौज येत आहे. फौज ? पाटलाच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

पनीर टि(तिख्खा)क्का मसाला

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/07/2020 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर त्याचं झालं काय मंडळी, मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं तसं , सगळ्या पनीर रेसिपी करायला घ्यायच्या असं मनाने ठरवलं होतं. त्यामुळे ही पण रेसिपी पनीरची करायची असं ठरवलं. आता होममिनिस्ट्रीला आवडणारी दुसरी रेसिपी करावी म्हणून तिचा फेव्हरिट पनीर टिक्का मसाला युट्युब वर बघितला.पण त्यातही पुन्हा झालं तेच! आम्हाला पोथीनिष्ठा अशी मुळी मानवतच नाही ,याचा प्रत्यय घ्यायचा तो आलाच.

खिडकीबाहेरचं जग!

लेखक मन्या ऽ यांनी शुक्रवार, 17/07/2020 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीबाहेरचं जग! ती आपले पाणीदार डोळे किलकिले करुन खिडकीबाहेरच जग बघण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होती. शाळा-ऑफिसात जाणार्यांची गडबड,रस्त्यावरची वर्दळ, फेरीवाले हे सारं तिला एकदातरी जगता यावं. असं वाटे; पण बाहेरच्या दुनियेत मात्र तीच अस्तित्व नव्हतं.. ती आजही नेहमीप्रमाणे किरणची वाट बघत होती.

राजयोग-२१

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 17/07/2020 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग - २० *** बिल्वन परत येईपर्यंत राजाने कुकी जमातीच्या सैनिकांना परत जायला सांगितलं होतं. त्यांनी राज्यात मनमानी करायला सुरुवात केली होती. सैनिकांच्या टोळ्या विभागून टाकल्या होत्या. युद्धाची काहीही तयारी केली नव्हती.बिल्वनने परत येताच राजाला अथपासून इतिपर्यंत संपूर्ण प्रसंगाचे वर्णन केले. राजा म्हणाला, “ठीक आहे ठाकूर, मी आता निघतो.राज्य, धन हे सर्व नक्षत्रसाठी आहे.” बिल्वन म्हणाला, “असहाय्य लोकांना कुणा दुसऱ्याच्या हाती सोपवून तुम्ही पळून जात आहात.

मन राधा राधा होते...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 17/07/2020 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
सांजेच्या व्याकुळ वेळी का गोकुळ बाधा होते? आभाळ दाटते तेव्हा मन राधा राधा होते.. साहवे मला ना जेव्हा काहिली तनूची उष्ण, आवेग असा वा-याचा भासतो जणू की कृष्ण.. मिटताना डोळे माझे कुशीत मजला घेतो, रोज मला उठवाया पाऊस होउनी येतो.. घनघोर बरसतो वेडा दिवस असो वा रात्र, रुजवात सुखांची नवथर भिजवुनी सारी गात्रं.. (ही राधा खास रातराणीसाठी....:))

... And a forward shortleg

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 16/07/2020 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.

मोबाईलमधील डेटा क्लिअर कसा करावा?

लेखक वेलांटी यांनी गुरुवार, 16/07/2020 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे तीनचार वर्षे जुना सॅमसंग गॅलक्सी ऑनफाईव्ह आहे. मोबाईलमधे स्टोरेज स्पेस कमी आहे. मेमरी कार्डमधेच सर्व डेटा मी सेव्ह करते. मात्र internal storage अतिशय कमी राहिले आहे. एकही नविन अॅप किंवा मोठी फाईल डाऊनलोड होत नाही. Settings-->storage--> अशा पाथने गेल्यास कॅश डेटा आणि miscellaneous असे दोन टाईप्स दिसतात. त्यापैकी कॅश मेमरी डिलिट करता येत आहे आणि नंतर स्पेस वाढलेलीही दिसतेय. मात्र miscellaneous या ऑप्शनपुढे जवळपास 1 GB डेटा use केल्याचे दिसतेय मात्र त्यावर क्लिक केल्यास आतमधे एकही फाईल दिसत नाही. त्यामुळे काही डिलिट करताच येत नाही.