संगणकासाठी SSD वापरावी की HDD?
(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते. आता तुम्ही म्हणाल की कम्प्युटरच्या स्पीडचा आणि स्टोरेज याचा काय संबंध येतो? पण खरं पाहायला गेलं तर आपल्या कम्प्युटरचे स्टोरेज कुठल्या प्रकारचे आहे यावरही आपल्या कम्प्युटरचा वेग अवलंबून असतो.
टेम्पुरा टोफू आणि नुडल
टेम्पुरा टोफू आणि नुडल
साहित्य:
टोफू ( पनीर सारखा दिसणारा परंतु दुधाचा नाही , यात अगदी लिबलिबीत पासून ते घट्ट कोरडा असे प्रकार मिळतात , या पाकृ साठी मध्यम किंवा कोरडा वापरावा)
टेम्पुरा पिठी ( जपानी भज्यांचे आवरण , हे मैदा आणि मक्याच्या पिठी पासून बनवलेले असते त्यामुळे उपलब्ध नसल्यास हि दोन पीठे + मीठ + थोडी कालि मिरी घालूं घरी करता येते , भज्यांचे असे म्हणले परंतु याऐवजी नेहमीचे चण्याच्या डाळीचे पीठ वापरू नये )
कांदा, लसूण, हिरवी किंवा तांबडी ढोबळी मिरची, गाजर , लेटस , टोमॅटो , पातीचा कांदा
तयार झटपट नुडल व त्याचे मसाले ( मी इनोडोनेशियन पद्धतीचे वापरले आहेत त्यात मसाल्यात स्वतःचे तेल, त
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ४ )
या आधीचा भाग आपण येथे वाचु शकता
पावनखिंडीचा रणसंग्राम ( भाग ३ )
पौर्णिमेच्या रात्रीचा पहिला प्रहर उलटून गेला होता.सज्जाकोठीजवळ सहाशे बांदल सेना शस्त्रास्त्रांसह सज्ज होउन निघायच्या तयारीत होती.आज स्वराज्याचे प्राण त्यांना आपल्या खांद्यावर वाहून न्यायचे होते. आजच्या त्यांच्या कामगिरीवर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यलक्ष्मीच्या कुंकवाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. शिवरायांसाठी पालखीची व्यवस्था केली होती.
पाखरांचे बोल
झाडीत उठले पाखरांचे बोल
वारा पेरतो हिरव्या सुरांची ओल
पूर्व काठावर पाझरती सोनेरी कण
मुठीतला प्रकाश उधळीत आले लाल किरण
उतरली ऊन्हे नभाची उघडीत दारे
पिकात पसरलेल्या दवांचे झाले हिरे
धुक्यांच्या पुसून ओळी वृक्ष घेती आकार
खोप्यांतून उडाले चिमण्यांचे थवे चुकार
नवे रूप फुलवीत आली धरणी
हवेत झेपावले पक्षी मुखात घेऊन गाणी
काव्यरस
झोका
उंच उंच झोका जाई
निळ्या आभाळात ।
फिरी येता गोळा होई
जीव काळजात ॥१॥
शैशवात वाटे येई
कवेत आकाश ।
पाय लागता भुईस
कळे तो आभास ॥२॥
घेत झेप याैवनात
जमिनीस सोडी ।
वाऱ्यास जाई कापीत
गगनास जोडी ॥३॥
कुरकुर ही कड्यांची
आताशा जराशी ।
संधीकाली विसावली
लय पश्चिमेशी ॥४॥
त्रिकालातुनी विहार
हिंदोळा घडवी ।
अन् राधेची कृष्णावर
प्रीतही जडवी ॥५॥
आषाढाच्या एक दिनी
आषाढाच्या एक दिनी...
कुंद,सावळ्या वातावरणी
आषाढाच्या एक दिनी
हिरवा डोंगर झाकून जाई
पाऊसभरल्या मेघांनी
स्तब्ध तरूंवरी स्तब्ध पाखरे
लोकालयीही तीच स्तब्धता
वाराही जणू रुसून बसला
मनात भरवूनी उदासीनता
अशात कुठुनी चुकार बगळा
कापत जाई मेघांना
भेदरलेली चिमणी बसली
मिटून अपुल्या पंखांना
असाच काही काळ लोटला
अन् डोलू लागले वृक्षलता
वा-यासंगे जणू मिळाली
वर्षागमनाची वार्ता
झरझर,सरसर पडू लागल्या
धवल शुभ्र पाऊसधारा
उदासलेल्या चराचरावर
हो चैतन्याचा शिडकावा
शेतकरी आमचा बाप कधी राहिल टिपटाप ?
आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
मोठाले यापरी ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन
मिसळपाव