बुंदीचे लाडू ....
बुंदीचे लाडू हा आमचा आवडीचा लहानपणापासूनचा सवंगडी :)
सध्या कोरोनामुळे बाहेरच खाण टाळत रक्षाबंधनासाठी घरीच लाडू केले . लहानपणी जवळ जवळ बऱ्याच लग्नात बुंदी किंवा बुंदीचे लाडू सगळ्यांच्याच खाण्यात आले असतीलच, आताशी लग्ना मध्ये वेगवेगळ्या मेनुच्या गर्दीत बुंदी न बुंदीचे लाडू जणू हद्दपारच झालेत असो .
विराणी- गझल
गझल एक संवेदनशील काव्यप्रकार ! ज्याची मोहिनी जितकी गझलकाराला असते तितकीच तिचा आस्वाद घेणाऱ्याला असते. जेव्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करायचं ठरलं तेव्हा खुपच जुजबी माहिती होती. म्हणजे गझलेत प्रामुख्याने विरोधाभासी प्रतिकांचा वापर केला जातो. उदा.भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुगंधी जखमा,लाघवी खंजीर यांसारख्या. पण अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी गुगलुन बघितलं तर ब्रह्मांडच हाती आलं.
गझल इतकी तंत्रशुद्ध असते याची कल्पनाच नव्हती. गझलेत पाच ते सतरा द्विपदी असतात. त्यातील पहिल्या द्विपदीला मतला असे म्हणतात तर बाकीच्यांना शेर.
अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले..
देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली..
अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे..
नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या..
!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.
संपला फ्रेंडशिप डे......
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!!
‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!
मिसळपाव