Skip to main content

श्रीगणेश लेखमाला २०२० - कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो)

लेखक चौथा कोनाडा यांनी शुक्रवार, 28/08/2020 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
1 जुलै महिन्यात श्रीगणेश लेखमाला २०२० या विशेषांकासाठी सहभागी होण्यासाठी आवाहन केलं गेलं, आणि वाटलं आपणही सहभागी व्हावं. २०१४ साली दिवाळी अंकाच्या निमित्ताने तलकाडू : एक प्रवास हा भटकंती लेख लिहिला होता, त्यानंतर विशेषांकासाठी लिहिणं काही जमलं नव्हतं. विशेषांकाच्या 'आठवण

श्रीगणेश लेखमाला २०२० - माळवा परिसर : काही आठवणी, काही चित्रे

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 28/08/2020 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
1 माझा जन्म आणि पहिली २६ वर्षे इंदुरात गेली. हा प्रांत इतिहासात ‘माळवा’ या नावाने ओळखला जातो. मल्हारराव होळकर (१६९४ - १७६६) हे माळवा सुभ्याचे पहिले मराठी अधिपती.

तळणीचे मोदक - मैदा न वापरता

लेखक देवीका यांनी गुरुवार, 27/08/2020 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
तळणीचे मोदक, कोकण सोडून इतर भागात ज्यास्त करतात. कोकणात करतच नाही असे नाही पण, तांदूळ मुबलक प्रमाणात असल्याने तांदूळाचे उकडीचे मोदक करतात. पण आजकाल, असा प्रश्ण नाही, ज्याला जे आवडेल, जमेल तसे त्याने करावे. बहुतेकदा, मैदा वापरूनच करतात. पण मैदा प्रकृतीला चांगला नाही, तेव्ह हि कृती मी माझ्या, आईची मैद्याशिवाय मोदक कसे करावे ती देत आहे. १ वाटी रवा, १/२ वाटी कणीक, १ टेबलस्पून तांदूळाचे पीठ. होय. ह्या पीठाने मस्त खुसखुशीतपणा येतो. दुसरं म्हणजे, तेलात न तळणे हि एक खासियत आहे. तेल पित नाहित. रवा छान मळला की, मोदक छान क्रिस्पी रहातात तर कणीकेने अतिशय कडक होत नाहीत.

कथा - पोट

लेखक केदार पाटणकर यांनी गुरुवार, 27/08/2020 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
हरीश उठला. आज त्याच्या घरी कोणीच नव्हते. आईबाबा दूरच्या नात्यातल्या लग्नाला गेले होते. हरीशची तिथं फार ओळख नव्हती. तो नाही आला तरी हरकत नाही, असं म्हणून फक्त आई-बाबाच लग्नाला गेले. आता हरीशपुढे अख्खा दिवस होता. त्याने रेडिओ मिर्ची लावली. स्वैपाकघरात गेला. हरीशचं घर बैठं. स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरची बांधकाम सुरु असलेली इमारत दिसत होती. हरीशच्या घराचं कुंपण ओलांडलं की रस्ता. काही अंतर सोडून इमारतीचं काम. आज तिथे सामसूम होती. विटा, सिमेंटची पोती असं साहित्य पडून होतं. आज कामगारांना सुटी दिली की काय, असं हरीशला वाटलं. तेवढ्यात मिलिंदचा फोन वाजला. “मॅच ठरवली आहे रे. ये लवकर.

श्रीगणेश लेखमाला २०२० - काही धमाल किस्से शाळा आणि कॉलेजचे

लेखक दुर्गविहारी यांनी गुरुवार, 27/08/2020 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
1 शाळा! बहुतेक सर्व जणांच्या मनाचा हळवा कप्पा. आयुष्याच्या घडणीची महत्त्वाची साधारण दहा ते बारा वर्षे इथे जातात. (काहींना अधिक व्यासंग करायची इच्छा असल्यामुळे थोडी जास्त वर्षे घेतली जातात ;-) ). अर्थात बालपणाची हूड वर्षे याच कालखंडात येत असल्यामुळे साहजिकच शालेय जीवनात धमाल किस्से होतात. अगदी अनेक वर्षे त्या आठवणी मनात ठसलेल्या असतात.

श्रीगणेश लेखमाला २०२० - रंगीत चित्रं

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 27/08/2020 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
1 रंगीत चित्रं? शीर्षक वाचून थोडंसं गोंधळल्यासारखं होईल खरं. पण ते तसंच आहे. कुठलं तरी एखादं चित्रं म्हणजे ते रंगीत असणारच, असंच आपल्या डोक्यात असतं. अगदी पूर्णपणे नाही, पण बरंचसं. सध्याच्या काळात तर नक्कीच. सध्या तर त्याचा विस्फोट झाला आहे.

माझा अनुभव

लेखक सुमेरिअन यांनी गुरुवार, 27/08/2020 02:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, गेली ८ वर्षे मी मिपावर वाचनमात्र आहे. पहिल्यांदाच लिहितो आहे. साधारण ३ वर्षांपूर्वी मी पुण्याहून ह्यूस्टन (टेक्सास, USA) ला शिफ्ट झालो. माझे इकडे आल्यानंतरचे अनुभव इथे मांडतो आहे. हा लेख तुम्हाला थोडा तुटक वाटण्याची शक्यता आहे. यातल्या काही गोष्टी तुम्ही अगोदर ऐकल्या असतील, पण काही निश्चितच नवीन असतील. हि नवीन माहिती थोडीशी वेगळी आहे(इथे राहणाऱ्या लोकांसाठी पण). ती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल असं मला वाटतं, म्हणून हा पहिला वाहिला लेखप्रपंच. मिपावर एकाहून एक जबरदस्त लेखक आहेत.

कथा - पिवळा गुलाब

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 26/08/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
पिवळा गुलाब रवी कॉलेज पोर्चमधे पोचला. पोचताक्षणी कोप-यावरच्या गुलाबांनी रवीला वातावरणाची जाणीव करून दिली. कोप-यातल्या टेबलवर गुलाब विकायला एक तरूण बसला होता. रवी मुख्य आवारात पोचला. पहिला तास सुरु झाला. दुसरा संपला, तिसराही संपला. तासांना त्याचं लक्ष नव्हतं. आज वर्गात ब-यापैकी गर्दी होती. सगळे तास संपले. आज जेव्हा रवी वर्गात शिरला तेव्हा मनालीने त्याच्याकडे पाहिलं होतं. रवीनेही तिच्याकडे पाहिलं होतं. प्राध्यापक कॉमन रुममधे गेले. मुलंही बाहेर पडली. सगळ्यांची गर्दी त्या गुलाब विकणा-या माणसापाशी झाली. मुलं येत होती, गुलाब घेत होती.

अभिनय जुगलबंदी - एक दृष्टिक्षेप

लेखक केदार पाटणकर यांनी बुधवार, 26/08/2020 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
अंदाज हा चित्रपट १९४९ मधे प्रदर्शित झाला. त्यात राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. अभिनयाची जुगलबंदी चांगली रंगली. या चित्रपटाला सत्तर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त, दोन दिग्गज अभिनेत्यांची जुगलबंदी असलेल्या काही मोजक्या चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप. हिंदी चित्रपटांना चांगल्या अभिनयाची परंपरा आहे. एकापेक्षा एक तगडे अभिनेते रुपेरीनगरीत होऊन गेले. काही चित्रपट असे आहेत की, त्यात दोन उत्तम अभिनेत्यांची समोरासमोर जुगलबंदी रंगलेली आहे. अंदाज मधे राजकपूर व दिलीपकुमार एकत्र होते. राजकपूरला शोमन म्हणून ओळखले जाते. महान अभिनेता असे त्याचे नाव घेतले जात नाही.