Skip to main content

मिसळ पाव मिसळ पाव

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 01/11/2020 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ पाव मिसळ पाव खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव मटकीची उसळ तिची करा मिसळ उसळीत घातला शेव कांदा त्यात पिळला लिंबू अर्धा रस्सा टाका त्यात चांगला पावाबरोबर खाऊन टाका मिसळ पाव मिसळ पाव झणझणीत तर्री अर्धी वाटी ओता त्यात होईल खाशी नाकातोंडातून येईल धुर मग दह्याने बदला नूर असली मिसळ अन दहा पाव खाऊन तर पहा राव मिसळ पाव मिसळ पाव एकदाच खा अन ढेकर द्या उगाच नंतर जेवायचे काम नाय नको ते इडली सांबर पुन्हा घ्याल का पराठे नंतर? मिसळीत आहे सारे गुण एकदा खाल तर व्हाल टुन्न हातावरचे अन पोटावरचे एकच झाले मिसळीवरचे केवळ नाव तुम्ही घ्याल मिसळ खाल मिसळ खाल मिसळ पाव मिसळ पाव - पाषाणभेद ०१/११/२०२०
काव्यरस

हसरतों का ज़नाज़ा..!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 31/10/2020 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
हसरतों का ज़नाज़ा...! लुटा रही थी खुशियाँ, मैं तो सारे जहाँ में, सौगात कोई गम की, मुझें भीख दे गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. दिल की मुराद लिखने, बैठी थी नाजुक कलम से, बेवफ़ाई की स्याही, कोई उनपे गिरा गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. लिखे थे मैंने इम्तेहाँ, बड़े लगनों-इमान से, सफ़ल उन्हीं में मगर, कोई गैर हो गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. जुड़ी थी साँसे जिनसे, मेरी ही जिंदगी की, चुराके मुझसे उनको, कोई मौत दे गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. मुझे मुहब्बत थी जिनसे, जाँ से भी ज्यादा, वो शख्स भी तो मुझसे, रुठकर चला गया । हसरतों का मेरी, ज़नाज़ा निकल गया.. मिलने से

चमन के फुल

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 31/10/2020 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
अति मधुर मधुर..    -गाणी ऐकायची सवय  फार जुनी । एकोणीसशेसाठ ते सत्तर,चे दशकाच्या आसपासचा,पन्नास।साठ वर्षापूर्वी चा काळ । ।हा काळ ,हिंदी चित्रपटांचा सांगितिक सुवर्णयुग मानले जाते। त्या काळातअनेकसंगीतकार ,गायक, गायिका  ,गीतकार यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने , गीत संगीताचे जे  अक्षर,अतुट.अतुलनीय,रेशमी ,मधुर ,मायाजाल विणले आहे, त्याच्या बंधनामध्ये अजुनहीसंगीत प्रेमी गुंतलेले ,आहेत।बाहेर यायला तयार नाहीत।   आपल्या आयुष्यातले अनेक  क्षण , त्या  अविस्मरणीय गाण्यांनी भारुन टाकलेे सुख दु:खाच्या प्रसंगात सोबत केली । त्या सुवर्णकाळातील अनेक संगीत कार  आपल्य

जननीचा दुर्ग

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 30/10/2020 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
शिवछत्रपतींची तब्बल वीस वर्ष राजधानी असलेल्या राजस दुर्ग राजगडाच्या संरक्षणासाठी आजुबाजुला गडांचा घेरा असणे आवश्यक होता. तसा तो आहे देखील. पश्चिम बाजु तोरण्यासारख्या बलदंड गडाने रोखून धरली तर उत्तर बाजु सिंहगडाने सांभाळली.पुर्वेला पुरंदर सर्व आक्रमणे आपल्या पोलादी छातीवर झेलण्यासाठी समर्थ होता. राहिली दक्षीण बाजु. या बाजुला तुलनेने दुय्यम गड असले तरी तीन गडांची एक साखळी असल्यामुळे एक भक्कम फळी निर्माण झाली आहे. यातील आग्नेयेला रोहिड खोर्‍यातील रोहिडा उर्फ विचित्रगड खडा आहे, तर गोप्या घाट, वरंध घाट आणि सुपे नाळीवर देखरेख करण्यासाठी कावळ्या किल्ला नजर रोखून बसला आहे.

कोजागिरी

लेखक VRINDA MOGHE यांनी शुक्रवार, 30/10/2020 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
*कोजागिरी* पुनवेचा चंद्र उगवता चांदणे निथळते भूमिवरी, आली शरदाची पौर्णिमा, आनंदभरली हि कोजागिरी !! आबालवृध्द सारे जमूनी, पुजन ध्यान लक्ष्मीचे करती लक्ष्मी बसूनी विमानी, पुसते, "कोजागर्ती" "कोजागर्ती" ? !! एकत्र सारे खेळ खेळूनी, गाणी गाऊनी, फेर धरूनी.. आनंदे जागवा रात्रीला, बदाम केशराचे दुध आटवूनी, नैवेद्य दाखवा चंद्राला !! केशर दुधाने भरूनी प्याले, चंद्रकिरणं त्यात पडूद्या, आरोग्यदायी शितल दुध, चवी चवीने रिचवून घ्या !! अशी आनंदी कोजागरी, साजरी होईल ज्या ठिकाणी, लक्ष्मी वसेल सुखाने, नांदेल कायम त्या ठिकाणी !! -©सौ वृंदा मोघे *कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा*

महारास

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 30/10/2020 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
महारास..!! इतकी वर्ष झाली आता, थांबव लपंडावाचा फार्स, नटून थटून आलेय मी, दिसतेय एकदम क्लास, जन्मभर वाट बघतेय, संपले घड्याळाचे तास, कृष्णा, खेळशील माझ्याशी रास..? खूप वर्ष रेटला रे हा, भातुकलीचा संसार बास, आयुष्याच्या सांजवेळी, कधी होई मन हे उदास, दमल्या थकल्या ह्या जीवाचा, निरवी संसार त्रास, गोविंदा, खेळशील माझ्याशी रास..? क्षणोक्षणी संपत जाती, माझे जीवन श्वास, हिरा नसे तरी ह्या कोळशा, मारशील का रे तास, वेड्या माझ्या स्त्री हट्टाला, खुशाल मनोमनी हास, मुकुंदा, खेळशील माझ्याशी रास..? विषय विकार अन् अहंकाराचा, अलगद सोडव फास, किती अवघड तुझ्या परीक्षा, होईन ना मी पास,

कुणीतरी, केव्हातरी, कधीतरी, कुठंतरी ...

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 29/10/2020 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाच्या सावलीत सावलीतल्या उन्हात कधीतरी वेडं मन भिजतं ना? गप्पांच्या नादात नादावल्या जगात कुणीतरी गोलगोल फिरतं ना? चहाच्या कपात कपातल्या चहात काहीतरी गोडगोड घडतं ना? मनातल्या प्रश्नाचं मनातलं उत्तर केव्हातरी कुठंतरी मिळतं ना? कसंतरी कुठंतरी कुणीतरी केव्हातरी कधीतरी प्रेमात पडतं ना? पडतं ना?

अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 28/10/2020 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक.

जीवन के सफर मे

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 28/10/2020 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन के सफर मे राही जीवन के सफर मधे चालताना ,कुठे ना कुठे कुणी ना कुणीभेटतच असते।आपण विसरून ही जातो । बिल्लू बाल्मिकी ,असे नावधारण केलेला,उत्तराखंड मधील मसुरीच्या  रस्त्यावर दोनच मिनिटे भेटलेला माणूस आठवणीत राहाण्याचे काही कारण नाही। पण राहिला ।त्याची ही, म्हटलं तर ,गोष्ट। हिमालयाच्या कुशीतील सगळी ठिकाणं काय किंवा निसर्गाने निर्माण केलेली कुठलीही ठिकाणे  नुसती पाहाण्या पेक्षा, निवांतपणे अनुभवायची आहेत,हे अनुभवांती पटलंय। दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर च्या तिसऱ्या आठवड्यातअतिशय आल्हाददायक निवांत वातावरणात, रमणीय स्थळांमधे उत्तराखंडात । पण गावे निवांत नव्हती। कारण, स्थानिक स्वराज्य