कविता
मनमोहन कृष्ण येतो स्वप्नी
मधुर पावा मनात गुंजतो.
होते मी हि राधा वेडी.
अंगणी चाफा डोलू लागतो !!
चाफ्याच्या मधूर सुगंध लहरी ,
दरवळती दूर दूर रानी वनी
गंधाने त्या वेडा होऊन
कृष्ण येतो माझ्या स्वप्नी...!!
चाफा माझा सोनसळी
सुगंध अनुपम जगात ,
जीवा शिवाची भेट घडवतो,
राधा कृष्णाच्या रूपात !!
-वृंदा
सामान्य माणूस....
सामान्य माणूस...
वर्गात लोकं म्हणती स्कॉलर,
जपतो आमची स्वच्छ कॉलर,
सहसा नशिबी नसतात डॉलर,
खिशात फक्त ओंजळभर चिल्लर...
रांगोळीत आमच्या सजते,
आकांक्षांची नक्षी,
स्वप्नांच्या झाडावर रोज,
नव्या इच्छांचे पक्षी...
मनातल्या नकाशावर,
आयुष्याची रूपरेखा,
वाळूत काढतो रेषा,
ते आम्ही पांढरपेशा...
सुख दुःखाच्या प्रसंगी,
आम्हा सोडत नाही चिंता,
डोळ्यासमोर सतत फिरतो,
महागाईचा वरवंटा..
कोणतीही असो दशा,
आम्ही सोडत नाही दिशा,
कर्तृत्वाला झळाळी देते,
आमच्या मनातली आशा..
गरजा कंठशोष करून सांगतात,
तू क्षणभर नको थांबूस,
छातीवरलं बिरुद अभिमानाने मिरवतो,
"मी सामान्य माणूस"....!
जयगंधा...
१०-१२-२०२०.
अक्षयपात्र
स्वतःशी कणभर असताना
दोन्ही हातांनी मणभर द्यायची इच्छा असते
तेव्हा तो भेटतो.
कणभराने तृप्त होतो.
अक्षयपात्र तिच्या काळजाचं झालेलं असतं .
खळाळत उधळत वाहतो प्रेमाचा झरा
आटत नाही.
लाघवी हसरा चेहरा डोळ्यात तेवत राहतो
विझतच नाही.
अव्यक्ताचं हे महाभारत पेलायला पुन्हा
कृष्णसखाच लागतो.
कृष्णसखा भेटतो.
फक्त त्यासाठी त्या अनवट वाटेवरची
द्रौपदी व्हावं लागतं .
शेतकरी आंदोलन, मागण्या आणि वस्तुस्थिती
सध्या आपण काही दिवसांपासुन शेतकरी आंदोलन आणि त्याविषयी माहिती घेतच आहात. मला आंदोलन का सुरु झाले? त्यात कोण पुढाकार घेत आहे, कोण आपल्या फायद्यासाठी कोणाचा वापर करीत आहे यापेक्षा यात शेतकरी वर्गाच्या मागण्या किती व्यवहारीक आणि सरकारने दिलेला प्रतिसाद यावर चर्चा अपेक्षित आहे.
शेतकरी नेतृत्वाने सरकारने मागील महिन्यात केलेले तीनही शेतीसुधारणा कायदे रद्द करावे ही पहिली मागणी केली. त्याला सरकारने नकार दर्शविला आणि त्यात सुधारणा करु. त्यात नवीन दुरुस्ती करणे शक्य आहे असे सांगितले. त्यानंतर आज काही मागण्या घेउन गृहमंत्री यांच्या सोबत बैठक निर्णयापर्यंत आली नाही.
हजारो ख्वाहिशें ऐसी - २०० किमी BRM भाग २
२८ तारीख उजाडली. सकाळी सगळ्यांनी आपल्या आपल्या सायकली आणून आमच्याकडे लावून ठेवल्या. १० वाजता गाडी घेऊन बाबा आले. सायकल चढवून बांधून गाडी पुढे गेली. मागून आम्ही ५ जण एका गाडीत बसून निघालो. वाटेत शैलेश पेठे भेटला. खेड तालुक्यातून तो आणि पाटणे अशा दोघांनी नाव नोंदवलं होत. मग त्यालादेखील बरोबर घेऊन प्रवास सुरु झाला. चहा, वडापाव ब्रेक घेत सावंतवाडी गाठली . सायकल उतरवून चेक करून घेतल्या. थोडंफार ग्रीसिंग वगैरे करून सायकल तयार झाल्या. स्पर्धेचा आयोजक पुष्कर कशाळीकर हा देखील तिथे आला होता. त्याच्याशी ओळख झाली. थोडीफार आणखी माहिती झाली. रात्री जेवून सगळे झोपलो. सकाळी ५.
पुस्तक परिचय अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -
अंतिम भाग ४ - आग्र्याहून सुटका -
समापन
या पुस्तकात आग्र्याहून सुटकेच्या नव्या प्रमेयाशिवाय अशी बरीच माहिती संग्रहित केलेली आहे, जी इतिहासाच्या चाहत्यांना वाचायला व मनन करायला आवडेल. त्यांची ओझरती ओळख करून ह्या ग्रंथाचा परिचय आवरता घेतो.
लेखक इतिहास शब्दाची व्याख्या,(पान ९) इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी मांडलेली इतिहास अभ्यासकांसाठी थोडक्यात खालील मार्गदर्शक तत्वे सादर करून आपलाही दृष्टीकोन सांगतो.
१. कोणताही पुर्वाग्रह नको.
२. अस्सल माहिती मिळवल्याशिवाय लेखन हाती घेऊ नये.
३.काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय.....
वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन.....
######
जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती.
पुस्तक परिचय भाग ३ - आग्र्याहून सुटका - जुन्या धाग्यातील काही न दिसणारे फोटो घालून नव्याने सादर
भाग 3 आग्रऱ्याहून सुटका
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
१. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
२. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.
लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन, पुणे. मो . क्र. ९९२२४३१६०९
शिवाजी महाराज कसे निसटले ?
नव्या प्रमेयाप्रमाणे नजरकैदेतून सुटकेच्या दृष्टीने जून १६६६च्या अखेरीपर्यंत बऱ्याच गोष्टी घडवून आणण्यात शिवाजी राजे यशस्वी झाले होते.
१. राजांनी स्वतःच्या माणसांना परत जाण्याची परवानगी देऊन दूर केले होते. परवान्याअभावी राजांची ही माणसे रामसिंहाच्या डेऱ्याजवळ राहात होती.
२. रामसिंहाने दिलेला शिवाजी महाराजांबद्दलचा ‘जामीनकतबा’ औरंगजेबाने रद्द केला होता.
मिसळपाव