Skip to main content

दे दे लिंक दे !!

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 21/12/2020 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी काही माहिती सांगायला लागलं कि "लिंक दे" कुणी काही मत मांडले रे मांडले कि "लिंक दे" एखादा विचार मांडायला लागलं, कि (त्याच्या पुष्ट्यर्थ) "लिंक दे" ह्यात ज्ञानोपासनेचा भाग असेलही बापडा !! पण मला पुष्कळ वेळा ऐकू येते ते असे "तुला काही नवीन मुद्दा सापडलाय का , त्याला पुष्ट्यर्थ काही लिंक नसेल तर तू , तुझं बोलणं आणि तुझा मुद्दा व्यर्थ ..." किंवा मग "तु कुणाला काही उद्धृत करू पाहतोयस का ? मग तुझी वायफळ बडबड बंद कर आणि ज्याने कुणी ते मुळात काय म्हटलं आहे ते साल्या तू कुठून वाचलं ते आधी सांग. मी माझं स्वतंत्र बघून माझं मत मी बनवीन.

तळ कोंकण २०१८ : भाग १

लेखक गोरगावलेकर यांनी सोमवार, 21/12/2020 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिलचा शेवटचा आठवडा. अचानक ठरलेल्या तळ कोंकण सहलीसाठी आम्ही दोघे व सोबत स्नेही मंडळीपैकी एक जोडपे असे चौघेजण रेल्वेने पनवेलहून रात्री दोन वाजता सावंतवाडीकरिता निघालो. कोंकण रेल्वेचा प्रवास पूर्वी केला असला तरी तो सर्व रात्रीचाच होता. यावेळी मात्र रत्नागिरीपासून उजाडले होते. वाटेत नदी-नाले ओलांडण्याकरिता बांधलेले पूल, हिरवेगार डोंगर, बोगदे बघत व कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्टेशन मागे टाकत सकाळी साडे अकराच्या सुमारास सावंतवाडी रोड स्टेशनला पोहचलो.

योगेश्वर...

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 20/12/2020 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
योगेश्वर.... अज्ञानी जीव, होई वेडापिसा.. तयाचे समाधान, योगेश्वर. मनी असे नित्य, प्रश्नांचे आवर्त.. तयाचे उत्तर, योगेश्वर. भवनदी माजी, आशेचा भोवरा.. रक्षी तो सोयरा, योगेश्वर. देहाच्या ममत्वे, दु:ख निरंतर.. आनंद निधान, योगेश्वर. मानवी जीवन, वृत्तीचा पसारा.. तयासि निवृत्ती योगेश्वर. दासाचि इच्छा, चुको गर्भवास.. तयासि मुक्ती, योगेश्वर. साधकासी लागे, स्वरूपाची आस.. निजरूप त्याचे, योगेश्वर. भक्ती, ज्ञान, योग, मार्ग जरी भिन्न.. परब्रह्म एक, योगेश्वर. जयगंधा.. २४-११-२०१७.

मिया आणि व्हाईट लायन --प्राण्यांच्या प्रेमात भारावलेली मुलगी

लेखक Bhakti यांनी रविवार, 20/12/2020 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिया आणि व्हाईट लायन(२०१८) तोत्त्तोसारखीच मिया ही एक चिमुकली आहे.आईवडिलांबरोबर दक्षिण आफ्रीकाला ते वास्तव्यास येतात.त्यांच्या जंगली प्राण्यांचा एक फार्म असतो .तेव्हा १० वर्षांच्या मियाचा आणि छोट्याशा चार्ली या नष्ट होत चाललेल्या पांढऱ्या सिंहाची मैत्री होती.ती इतकी घट्ट असते की मिया त्याच्याशिवाय चार्ली मियाशिवाय वेगळे राहूच शकत नाही. मियाला जेव्हा शाळेत दूर टाकतात,तेव्हा ती त्याला इतकी मिस करते की थेथून पळून पुन्हा फार्मवर येते.चार्लीतर खूप दिवसांनी तिच्या हातूनच धुध पितो...इतक खास नात असत त्यांच.चार्लीमुळे मिअयाच्या वडिलांचा प्राण्यांची सफारी व्यवसाय तेजीत असतो.पण चार्ली या बंदिस्त वातावरणा

"रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" - पुस्तक परिचय

लेखक MipaPremiYogesh यांनी शनिवार, 19/12/2020 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता. कट २ - अचानक काही दिवसापूर्वी "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" ह्या डॉ. जयंत वडतकर लिखित पुस्तकाबद्दल वाचण्यात आलं. बरेच दिवस झालेले नवीन पुस्तक घेऊन, म्हणून पटकन हे पुस्तक मागवलं . ३ दिवसात पुस्तक घरपोच आलं आणि एका बैठकीमध्ये वाचून काढलं .

ज्ञात अज्ञात पंढरपूर ३ रोकडोबा वेस/ हरिदास वेस

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 19/12/2020 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ३ रोकडोबा वेस/ हरिदास वेस मनुष्याने जमाव करून राहताना चोर, दरवडेखोरांच्या पासून आणि वन्य श्वापदांपासून संरक्षणासाठी गांव वसवून राहणे मानवाला आवश्यक वाटले म्हणून गांवे निर्मीली गेली. पण तिथेही वन्य श्वापदांचा अन् दरवडेखोरांच्यां त्रासाची भिती होतीच. ग्राम संरक्षणासाठी गाव म्हटले की गावकुस आलेच. गावकुस असले की वेस हवीच. पंढरपूराला अशा तीन वेशी अस्तित्वात होत्या. पैकी सर्वात मोठी होती ती महाद्वार रस्त्यावर कवठेकरांचे दुकान आणि अकरा रूद्र मारूती जवळची महाद्वार वेस. तिला दोन्ही बाजूला प्रशस्त देवड्या ज्यात बसून रक्षक ग्रामाच येणाऱ्या जाणारेवर देखरेख ठेवू शकतील अशा.

गावाकडच्या गोष्टी

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 19/12/2020 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णू सहस्त्रनाम गावात,ब्राम्हणांची वीस बावीस घरे.देशमुख गल्लीतली देशमुखांची पंधरासोळा;पाटील गल्लीत जोशांची चारपाच,जहागिरदार ,कुलकर्णी,देशपांडे, पुराणिक यांची एकेक.वर्षभरातील  नेहमीचे कुलाचार,सणवार प्रत्येक घरी, आपापल्या परीने होत असत.उन्हाळ्यात ,विष्णू सहस्त्र नाम सप्ताहाचे निमित्ताने मात्र सर्वजण एकत्र येत. या विश्वाची उत्पत्ती,स्थिती,आणि विलय,ज्याच्या लीलेने होतो त्या परमेश्वर श्रीविष्णूला,वेदकाळा पासून ,पुराण काळापर्यंत ,ज्या ज्या नावांनी संबोधिले गेले त्या एक हजार नावांचे संकलन असलेले हे संस्कृत श्लोक भिष्माने युधिष्ठीराला सांगितले.महाभारतातील 'अनुशासन पर्वात 'याचा उल्लेख आहे.यात

बेंगळुरूचा कार्तिक -३

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शुक्रवार, 18/12/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
आज कुंदलहल्ली येथील नागलिंगेश्वर मंदिरातील यंदाच्या तसचं गेल्या वर्षीच्या पूजेची छायाचित्र पाहु. नागलिंगेश्वर हे तस थोड जास्त वर्दळ असणारं मंदिर. मंदिरातील शिवलिंग जवळपार पाच फुट उंचीच आहे. लिंगावर पाच फण्यांचा नाग आहे म्हणुन हा नागलिंगेश्वर. गेल्या वर्षी कार्तिक महिन्यातल्या चारी सोमवारी पूजेसोबत रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असत- शास्त्रीय संगती, भरतनाट्यम्, कुचिपुडी इत्यादी. ह्या वर्षी फक्त पूजाच झाल्या.