Skip to main content

एजीओजी

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 08/11/2007 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

भाईकाका, हॅपी बर्थडे टू यू...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 08/11/2007 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम भाईकाका, आज फार चांगला योगयोग जुळून आला आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस, शिवाय ८ नोव्हेंबर, तुमचा वाढदिवस..! त्यामुळे सकाळी सकाळीच तुमच्या सुंदर स्मृतींचं अभ्यंगस्नान आम्हाला घडलं! मी सर्व मिसळपावकरांच्या तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो.. तुमच्या लाडक्या पोष्टाचं चार रुपयांचं तिकिट डकवून ह्या पत्ररुपी शुभेच्छा पाठवत आहे, तेवढ्या गोड मानून घ्या... हॅपी बर्थडे टू यू...भाईकाका! तुमचाच, तात्या.

तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 06/11/2007 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
तसा चिकणा आहे, पण... (लघुतम कथा)
शेवटची बस चुकेल की काय म्हणून मी धावत चाललो होतो. तर पाठीमागून हाक आली - "ए डीजे, माझ्यासाठी बस थांबव!" मी आवाजाला उत्तर दिले - "ओके, नीना." पण मी ड्रायव्हरला काही सांगायच्या आत नीना बसच्या दाराशी होती. माझ्याशेजारी तिला जागा करून तिला म्हणालो, "इतका उशीर का करतेस ऑफिसात? ही शेवटची बस चुकली असती म्हणजे?" "वा रे वा! तू मोठा वेळेवर निघालायस." "नाही, म्हणतो की आधीच लुकडीसुकडी आहेस, अशी जेवणे चुकवशील तर वाळूनच जाशील." अशा प्रकारची वैयक्तिक टीका मुलींना चालते, असा माझा अनुभव आहे.

कुक्कुटधर्माचा मिसळपावला सक्रीय पाठिंबा

लेखक वात कुक्कुट यांनी मंगळवार, 06/11/2007 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
कुकूचकू मंडळी, थोडा उशीरच होत आहे. पण हे स्थळ बघून बहुत संतोष जाहला. नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार. मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्‍या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो.

काही चारोळ्या

लेखक शब्दवेडा यांनी मंगळवार, 06/11/2007 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी बान्ध भावनान्चे अचानक फुटतात पण अश्रू मात्र पापण्यान्तच गोठतात... अचानक येणारा पाऊस आणि नकळत येणार्या आठवणी सरता सरत नाहीत दोघेही चिम्ब भिजवून जातात शरीराला अन मनालासुद्धा... प्रेम व्यक्त करायला का असतात, शब्दान्ची बन्धने ?? पुरेशी नसतातच का कधी तुझ्या-माझ्या ह्रदयाची स्पन्दने ??
Taxonomy upgrade extras

दिवाळीच्या संगीतमय शुभेच्छा

लेखक विसुनाना यांनी मंगळवार, 06/11/2007 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
पं. विश्वमोहन भट आणि त्यांचे सुपुत्र शिष्य श्री. सलील यांच्या मोहन वीणा वादनाचा कार्यक्रम ऐकण्याची सुवर्णसंधी ३ नोव्हेंबरला मिळाली. दिवाळीआधीच दिवाळी साजरी झाली. अहाहा! त्या स्वर्गीय आनंदाचा लाभ थोडासा का होईना सर्वांना मिळावा ही इच्छा! (चित्रफीतदर्शनातील दोष यूट्यूबचा आहे.

बोलायाचे कितीक आहे पण....

लेखक पुष्कर यांनी सोमवार, 05/11/2007 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही थरथरणार्‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव-भावना स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही दहा दिशांच्या रिंगणातुनि क्षितीज सुद्धा उल्लंघिन मी एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही रंग उषेचे हातामधुनि उधळित जाईन पानोपानी घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी मन्मनात जे आता आहे अंतरातुनि बरसत नाही उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बो

मायदेशी जाताना..

लेखक प्राजु यांनी रविवार, 04/11/2007 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
यु.एस. ला आल्यानंतर दर ११ महिन्यानी कंपनी (नवऱ्याची) एकदा भारतात जाण्यास परवानगी देते. तशीच आम्हालाही मिळाली. आणि त्यातून नणंदेचे लग्न ठरले आणि मी आत्याही झाले. भावाला मुलगा झाला. म्हणून आम्ही तिच्या लग्नाला आणि भाच्याच्या बारशाला पोहोचू अशा दृष्टीने बेत ठरवले. दिर-जाऊ कॅनडातून निघणार आणि आम्ही न्युअर्क वरून. पण काही कारणाने नवऱ्याला आमच्यासोबत यायला जमणार नव्हते. तो नंतर ८-१० दिवसांनी निघणार होता.

मी पाहिलंय...

लेखक प्राजु यांनी रविवार, 04/11/2007 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
इथे आजकाल 'फॉल' (पानगळ) वर खूप कविता येत आहेत. म्हणून वाटले आपणही ही कविता प्रकाशित करावी.
Taxonomy upgrade extras