कथाकाराची कैफियत!
अलिकडेच मिपावर 'अब्दुल खान' लिहीलं. चार भागात विखुरलेलं असूनही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक भागाची शेकडो वाचनं झाल्याची नोंद झाली. मिपावरच्या मित्रमैत्रिणींनी अगदी हातचं काही न राखता मनापासून कौतुक केलं. खूप खूप बरं वाटलं. काही वाचकांनी 'क्रमशः' बद्द्ल गोड तक्रारीही केल्या. पण त्या पुढचं वाचायच्या उत्सुकतेपोटी असल्याने त्याचं काही वाटलं नाही. एका नवोदित ललित लेखकाला सुरवातीच्या लिखाणालाच अशी शाबासकीची थाप पाठीवर पडली की त्याला किती हुरूप येतो हे शब्दांत मांडता येण्याजोगं नाही.
एकदा असाच, मला वाटतं तिसरा की चवथा भाग लिहीत होतो. विचारांची लिंक अगदी मस्त लागली होती.
मिसळपाव