गुलखंड
मिपाच्या पाककृती विभागाचा शुभारंभ गोडाने करते.
दसर्याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन घरात रहायला गेलो. चोहीकडे सामान!त्यातून हवे ते वेळेवर मिळाले तर मग आणि काय हवे? जायफळ/वेलदोडे कोणत्या बरणीत/डब्यात आहेत हे १०,१२ डबे उचकून पण सापडेनात म्हणून मी वैतागले तर इकडे दिनेशने गुलकंदाच्या बरणीतून(ती कुठून मिळाली त्याला,कुणास ठाऊक?) गुलकंद काढून त्यात घातला! आणि गुलखंड असे बारसे करुन आम्ही खाल्ले.
साहित्य-
५०० ग्राम स्पाइझं क्वार्क ४०%फॅटवाला / केफिर चीज्(लेबनी)/ क्राफ्टचे फिलाडेल्फिया क्रीम चीज किवा अर्थातच चक्का
२५०/३०० ग्राम साखर,
२ टेबल स्पून गुलकंद,बदाम/काजूतुकडे १टेबल स्पून
इथे speisequark नावाचे जे दही मिळते त्याला आम्ही "जर्मन चक्का" असे नांव दिले आहे!
स्पाईझं क्वार्क मध्ये साखर मिसळा,बदाम/काजू तुकडे घाला.गुलकंद घाला. गुलखंड तयार!
हा क्वार्क पुरणयंत्रातून काढावा लागत नाही.
पण चक्का असेल तर नेहमी श्रीखंड करतो तसेच करा परंतु स्वादाला गुलकंद घाला.
पोळी/पुरी बरोबर खा.वेगळी चव छान लागते.सध्याच्या उन्हाळ्यात गुलकंदाने गारवा येईल,:)
वाचन
7892
प्रतिक्रिया
0