Skip to main content

जागतिक पर्यावरण दिन

लेखक मनस्वी यांनी गुरुवार, 05/06/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी फुले बहरती फुलपाखरे वर भिरभिरती स्वप्नी आले काही.. स्वप्नी आले काही.. एक मी गाव पाहिला बाई.. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.. झाडे लावा झाडे जगवा.

पहिल्या पावसात भिजायचे?

लेखक श्रीमंतपेशवे यांनी बुधवार, 04/06/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस !!! तो ही पहिला !!! वाह क्या बात है !!! काल पुण्यात या मोसमातला पहिलावहिला पाऊस पडला आणि मन अगदी सैरभैर झालं. पहिल्या पाऊसाची गंमतच काही वेगळी असते नाही ? लहानपणी अशा पावसात आईची नजर चुकवून भिजायचे. आता नवय्राची नजर चुकवुन का होईना पण पहिल्या पावसात भिजतेच . कोणाकोणाला पहिल्या पावसात भिजायला आवडते बरे? की आमच्या यांच्यासारखे विजांना घाबरुन घरात कोंडुन घेतात?
Taxonomy upgrade extras

पाऊस - स्पर्श पहिला

लेखक स्वप्निल मन यांनी बुधवार, 04/06/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
मयूर मी व्हावे मन प्रान्गणी असे नाचावे वेशीपल्याड त्याने यावे मृद् गन्धाने मी ओळखावे गावातून घराघरान्वरून अन्गणी माझ्या हळूच उतरावे नयनान्वरी माझ्या हात ठेवावे कळत नकळतसे बरसावे उससण्या आधीच हळूवार स्पर्शावे पहिल्या स्पर्शाने अन्तर्बाह्य भिजवावे नहालेल्या वाफाळलेल्या माझ्या केसान्वर मोत्यान्ना उधळावे पहिल्या वहिल्या भेटीने असे पिसार्‍यावर हिरे पाचू बरसवावे
Taxonomy upgrade extras

निषेध, निषेध गडकरी रंगायतन - ठाणे येथे बॉम्बस्फोट

लेखक श्री यांनी बुधवार, 04/06/2008 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज गडकरी रंगायतन - ठाणे येथे नाटक सुरु होण्या अगोदर बॉम्बस्फोट झाला. आतापर्यन्त ५ जण जखमी झाल्याची बातमी आहे.

गरिब बिच्चारे पुरुष

लेखक १.५ शहाणा यांनी बुधवार, 04/06/2008 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
बस म्ध्ये जा एक रांग महिलांसाठि राखीव आसते उभ्याने प्रवासाचा मक्ता फक्त पुरषांचा महिला कोठेही जागा अडवु शकते व याचा फायदा युवतीच जास्त घेतात रांगेत पुरुष तासंतास थांबतो व बाई? (मुली) १० मि. काम उरकुन बाहेर . ५०% मते जर महिलांची तर कशाला पाहिजे ३३ % आरक्षण (कदाचीत स्वताहाचे मत नसावे)

पूर आठवणींचा

लेखक जयवी यांनी बुधवार, 04/06/2008 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणी साचलेल्या काळजात ओथंबलेल्या आठवणी पेटलेल्या होरपळून निघालेल्या आठवणी भरजरी मखमली पेटीत जपलेल्या आठवणी हळूवार अलगद हातांनी वेचलेल्या आठवणी पहिल्या स्पर्शाच्या नकळत लाजलेल्या आठवणी मीलनाच्या हृदयात साठलेल्या आठवणी पावसाच्या मनात कोसळणार्‍या आठवणी सरींच्या चिंब चिंब भिजवणार्‍या आठवणी थंडीतल्या उबदार कुशीतल्या आठवणी पहाटेच्या गार गार वार्‍यातल्या आठवणी विरहाच्या पिळवटून निघालेल्या आठवणी भेटीच्या मोहरून निघालेल्या आठवणींचे मोहळ भावनांचा कल्लोळ आठवणींचे वादळ अनावर तो कोसळ आठवणींचा वावर ओला गहिवर आठवणींचा आसरा मनाचा गाभारा जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

मिपा वरील नाती गोती...

लेखक फटू यांनी बुधवार, 04/06/2008 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नुकताच आमच्या मयुर येलपलेंनी लिहिलेला रायगडावर लिहिलेला लेख वाचला... हे मयुर येलपले आम्ही आमच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याखाता म्हणून काम करत होतो तेव्हाचे आमचे विद्यार्थी... आजही आम्हाला ते "सर" असंच म्हणतात (अगदी आमची औकात माहीती असुनही... :D ) आमचे दुसरे रायगड प्रेमी स्नेही चेतन हे आम्हाला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक वर्षाने वरिष्ठ होते... तुम्हीही सांगुन टाका तुमची मिपा वरील नाती गोती... तसं मिपा हेच एक छान कुटुंब आहे... अगदी इथेही काही कारटी नाठाळ आहेत... असो. पण आम्हाला तुम्ही मिपाकर होण्याआधीची नाती गोती अपेक्षित आहेत... तर मग लिहुन टाका...

संस्कृत शिक्षण

लेखक ऋचा यांनी बुधवार, 04/06/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
माझं १० पर्यंत पुर्ण संस्कृत होतं. मी त्या नंतर शास्त्र शाखा निवडून १२वी केलं. आता मी M.Sc.(computer scince) करुन software developer म्हणून काम करत आहे. पण आता मला पुढे नविन काहीतरी शिकायची इच्छा आहे. मी संस्कृत भाषेत पुढे शिकावं असा विचार करत आहे. परंतु मला काही कळत नाहीय कि सुरुवात कुठुन करु. कोणी ह्या बाबतीत मला मार्गदर्शन करु शकेल का????