Skip to main content

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 18/06/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
लूज कंट्रोल... २००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक.. लेखक : हेमंत ढोमे दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे निर्मिती : समन्वय पुणे. या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी.. नाटकाचे कथासूत्र... तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०...

तु

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 18/06/2008 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
!!! पहीला प्रयत्न !!! ( दि.१८/११/१९९७ रोजी लिहीलेली आयुष्यातली पहीली-वाहीली कविता ..) प्रेमाच्या धुन्दीत जेव्हा अविट होता गोडवा, रात्र होती चान्दणी , आणी मस्त होता गारवा !! फुलात राहतो गन्ध , तशीच तु मनी सदा, तुझेच चित्र काढतो, हाच आहे छन्द मना !! हसरा चन्द्रमणी भाव तुझा लाजरा, म्रूदुला कुन्तलातही , माळीलास तु मोगरा !! हसलीस तु गोड जेव्हा हा निसर्ग ही लाजला, रात्र होती चान्दणी अन मस्त होता गारवा !!
Taxonomy upgrade extras

सात वारांची कथा

लेखक वैशाली हसमनीस यांनी बुधवार, 18/06/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
सात वारांची कथा. सोमवारी नाही कशालाच वेळ अभ्यासाचा जमत नाही मेळ, मंगळवार असतो थोडा आळशी पण तेव्हा मिळते उपासाची लापशी बुधवार असतो कंटाळवाणा मी होतो अभ्यासाने दीनवाणा गुरुवार तसा असतो थोडा व
Taxonomy upgrade extras

झुंज

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 18/06/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची. कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो. जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी. लढण्यासाठी जन्म आपुला, हेच मजला ठाव असे हार्-जीत तर चालायाचीच, मजला त्याचे गम्य नसे. संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा. चाकोरीत राहुनी मी, डाव कधी ना मांडला फेकले तिथेच फासे जेथे, अद्द्याप कुणी ना जिंकला. वळुनी मागे अतीत बघता, माझेच मजला वाटते भय फिरुनी आगीत चाललो मी, आगीचीच मला सवय.

काह्ही केल्या आवडतच नाही! :)

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 18/06/2008 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो! तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो. पण... यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं! :) हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे.

बटाटवडा- वडापाव!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 17/06/2008 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
जमिनीतून वाफा काढणारा टळटळीत उन्हाळा चालू असता॑नाच दुपारी चारच्या सुमारास एकदम वळीव येतो..काळेकुट्ट ढग चाल करून येतात.. ओल्या मातीचा धु॑द सुग॑ध..गार वार्‍याची झुळूक अ॑गावर शहारा आणते, विज कडाडते आणि सरी कोसळू लागतात.. लाईट जातात.. घरातली लहान मुल॑ गच्चीत पळतात तर कानटोपी सरसावत आजोबा खिडकीत उभे राहतात..

एक छोटीशी सकाळ

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 17/06/2008 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो.

सरकार राज .. वैताग सिनेमा !

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 17/06/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला. अहो, तो चित्रपट पाहून इतका वैताग आला आहे, की जरा मित्रमंडळींसमोर बडबड करुन मन हालके करावे या हेतूने इथे लिहित आहे. ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून..

मोबाईल

लेखक विकास यांनी मंगळवार, 17/06/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोन्स वापरण्यात भारतात सर्वत्रच आणि विशेष करून शहरात, त्यातही तरूण वर्ग बराच पुढे आहे. वर्षानूवर्षे दूरध्वनी क्रमांक मिळण्यासाठी तिष्ठत राहावे लागलेल्या भारतात आता मोबाईल तरी लगेच मिळू शकतो आणि जगाबरोबर दुहेरी संवाद सहजसाध्य होतो. अर्थात त्याच बरोबर शाळा-कॉलेजात मोबाईल्स आले त्याचे दुष्परीणाम, नंतर मोबाईल मधे असलेले कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा यांचे वाईट उपयोग आदी सुरू झाले. पण अशा गोष्टींना आळा घालणे शक्य असते. आज मात्र म.टा. मधे खालील (सारांशाने दिलेली) बातमी वाचली.