Skip to main content

आठवणी

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 02/03/2021 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य आहे तिथे त्याचे दुःखही आहे. माणसांच्या विविधते प्रमाणे त्याच्या दुःखांची श्रेणी आणि त्यांची कारणेही तितकीच अमर्याद. अपवाद फक्त एका गोष्टीचा. अब्जावधी श्वास जसे एका प्राणवायूने सुखावतात त्याप्रमाणे याच अब्जावधी मनांना बधिर करणारी समान जागतिक शक्ती म्हणजे आठवणी. विज्ञानाने सचित्र खुला केलेला विश्वाचा अफाट पसारा पाहताना आपण हरखून जातो. पण त्या प्रकाशाच्या मुक्त नृत्यालाही ज्याचं चित्ररूप अजून गवसलं नाही अशा मनात साठवल्या जाणाऱ्या आठवणींची तुलना फक्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाशी होऊ शकते.

(ठिपसे)

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 02/03/2021 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: १. ठिपसे असे एक आडनाव असते. २. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे. ३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको. ४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे. प्रेरणा.. पालिकेतले कळकट ठिपसे काळ्या मळक्या फाईलींच्या ढीगात घुसूनि हरवण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पण ठिपश्यांच्या साहेबाला, खात्यापित्या ज्यूनियरांना सहकार्याचा कंठ फुटेतो जरा बसूया मग बोलूया, अन् ठिपश्यांची मंजुरीही पाकीट पाहून विकांताच्या थोडी आधी जलदगतीने नीट मिळू दे मग थांबूया
काव्यरस

ठिपके

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 02/03/2021 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
शहरदिव्यांचे पिवळट ठिपके काळ्याकरड्या रस्त्यांवरच्या धुरात भेसुर चमचमण्याच्या थोडे आधी तिथून निघूया, पाखरठिपक्यांच्या नक्षीला भगव्यापिवळ्या मावळतीशी किलबिलणारा कंठ फुटेतो जरा थांबूया मग बोलूया, चांदणठिपक्यांची रांगोळी गारूड पाडून विस्कटण्याच्या थोडी आधी चंद्रधगीने जरा वितळू दे मग थांबूया.
काव्यरस

काल आणी आज

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 01/03/2021 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
पत्र नाही चिठ्ठी नाही कावळा ओरडतो फांदीवर चला चला गोडधोड करा पाव्हणा पोचला पांदिवर तोंडभरून आवातन चार दिस आदुगरच यायचं तेलच्या गुळवणी नळीचा पहुणचार घ्यायचां पाव्हणं तुमच्या बिगर जत्रा नाय आस सोयर धायर म्हणायचं वरमाई रुसली लाडाची सार गाव धावलं पोरीच्या आईबापाला जग भरून पावल आमंत्रण येत ऩव्हतं निमंत्रण लागत नव्हतं सुख दुखाःच्या वाटेवर माणुस माणसाला भेटत होतं जसा जसा काळ पुढ गेला तसा तसा मेळ कमी झाला माणुस सुधारला पण नात्याचा भाव मात्र वधारला ट्रिंग ट्रिंग फोन आला भेटी गाठी कमी झाल्या धडाधड माणूस खोट बोलू लागला ट्रिंग ट्रिंग हँलो हँलो येवू का आज आहात का घरी आज नको नंतर भेटू तब

तुलना नको!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 01/03/2021 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. "त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला." किंवा याच्या उलट "तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच?" हे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल?

भाषा : बोली आणि प्रमाण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/03/2021 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक २१ फेब्रुवारी ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने मुंबईच्या सामना वृत्तपत्राच्या रविवार ‘उत्सव’ पुरवणीत दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित झालेला निमंत्रित लेख आजच्या ब्लॉगवर.) : कोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो? एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो?