Skip to main content

एक क्षण निसटू गेला..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 04/08/2008 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
एक क्षण निसटू गेला.. . हिरव्यागार पानाच्या टोकाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र स्पार्टेक्सवर.. साचलेल्या पसाभर पाण्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. पाण्यात आणि मनात! एकाच वेळी!! क्लिक!!! अल्बम मध्ये लावण्याजोगी, अजून एक आठवण.. लगोलग आत गेले.. वाट बघत बसलेले रंग गोंजारले.. हळूच कुंचले मोकळे केले.. आणि गेले.. रंग ओले करण्यापुरतं पाणी आणायला.. तो थेंब तो क्षण!!! तेव्हड्यात वाहून गेला.. छ्या!!! जाऊदे! मूड नाही आज! म्हणताच कागद कोरा राहिला... एक क्षण निसटू गेला.. ====================== स्वाती फडणीस.............. २९-०७-२००८

(नेहमीच ... तुझ्यामुळे)

लेखक केशवटुकार यांनी सोमवार, 04/08/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्रातः स्मरणीय सदगुरु केशवसुमारांना वंदुन ही आजची टुकारी. आमची आजची प्रेरणा परममित्र बेसनलाडु यांची नेहमीच ... तुझ्यामुळे तिन्ही त्रिकाळ खाई मिसळ नेहमीच ... तुझ्यामुळे वृत्तातले घोळ शब्दांचे ते खेळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे अनुभव .. आत्मचरित्रं (होते हसं!) नेहमीच ... तुझ्यामुळे कविंचा जाच कविंना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे प्रतिसादांना धार प्रतिसादांचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे मालकाचा वीट भांडायचा धीट नेहमीच ...

सज्ञान मुली व बायकांबद्द्ल ठिक आहे हो! पण अल्पवयीन मुलांचे काय?

लेखक क्रिष्णा यांनी सोमवार, 04/08/2008 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
मिनल ताईंनी बायकांच्या सिगारेट दारु बद्दल लिहले होते, त्याच संदर्भाने आणखी काही. अगदी परवाचीच गोष्ट, सदाशिव पेठेतील भावे हायस्कुलच्या बाजुने चाललो होतो. एक अगदी १२/१३ वर्षचा मुलगा ऐटित धुर सोडत होता. आणि गुटखा तर जणु सर्वमान्यच झालाय. एवढ्या छोट्या वयात हि सगळी व्यसन योग्य आहेत काय? आपण काहीच करु शकत नाही? याला पायबंद बसावा असे मला वाटते. आपल्याला काय वाटते? क्रिष्णा (जनसामान्य)

नेहमीच ... तुझ्यामुळे

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 04/08/2008 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ संध्याकाळ नेहमीच ... तुझ्यामुळे मेंदूतले घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे ओठांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे ओले घसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे ओळींना धार ओळींचे वार नेहमीच ... तुझ्यामुळे जगायचा वीट जगतोय धीट नेहमीच ... तुझ्यामुळे मरणाशी भेट कविताच थेट नेहमीच ... तुझ्यामुळे

||ओम नमः शिवाय ||

लेखक मृगनयनी यांनी सोमवार, 04/08/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमन माझे तुला नटवरा.. हे शिवशंभो, भोळ्या शंकरा.. कृपासिंधो तू, हे गौरीहरा.. प्रसन्नवदन तू , कर्पूरगौरा.. तांडव करुनि, तु ब्रह्मांड पेलिसी.. प्राशुनि हलाहल, नीलकंठे मिरविसी.. फासुनि विभुती, तू हिमालये वससि.. उमापती शिव, हस्ती त्रिशूल घेसी.. मस्तकी तुझिया चंद्र विराजे.. हाती डम डम डमरू वाजे... तुझ्या जटा-मुकुटातुनि वाहे मुक्त मंदाकिनी.. सर्प-भुजंग खेळति देहावरी, तू शूलपाणिनी.. मुंडक-माला धारिसी तू, चिता-भस्म विलेपुनि, विश्वजननी महामाया , असता तुझी अर्धांगिनी.. महेश्वर तू, महादेव तू, धन्य धन्य देवी सती.. पुन्हा मिळविण्या तुज भूपती, जन्मली ती पार्वती.. अनाथांचा नाथ असुनि, निराकार तू, नि:स
Taxonomy upgrade extras

मानसिक भितीने ग्रासलेला गुरुनाथ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
"बाहेर पडल्यावर वाईट गोष्टीना पण तोंड द्यावं लागतं.पण माझा विश्वास आहे की न जाण्याने याचाही पेक्षा वाईट गोष्टीना सामोरं जावं लागतं" मी एकदा माझी कार रिपेअर करण्यासाठी एका कारखान्यात टाकली होती.मोटर कारखान्याच्या मालकाने मला एक भली मोठी लिस्ट दिली आणि म्हणाला, "ह्या लिस्ट मधले पार्टस तुम्ही अमूक अमूक दुकानातून आणा.हे पार्टस स्पेशल आहेत आणि आम्ही ते ठेवत नाही." ती लिस्ट घेवून मी त्या दुकानाच्या पत्त्यावर दुकानात गेलो.दुकानाच्या कॅबिन मधून आतून येणारा आवाज जरा परिचयाचा वाटला.म्हणून कौन्टरवरच्या त्या माणसाकडे जरा चौकशी केली की ते कोण बोलत आहेत.तो म्हणाला, "ते आमचे मालक गुरुनाथ आजगावकर" माझ्या चट

(नूर)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
कुमार जावडेकरांची 'नूर' गजल पाहून कोणे एके काळी आमचा बदललेला 'नूर' पुन्हा एकदा आमच्या आठवणीत आला! दारावरुन गेली, पाहून हूर आलो आता इथेच होती, शोधीत दूर आलो! जाऊन बारमध्ये ना घेतली कशी मी (पाहून तेथला मी आनंद-पूर आलो) ही फौज बेवड्यांची, पाहू कशास आता भेटीस 'पेजथ्रीं'च्या येथे चतूर आलो... 'तो भाग' शेकला पण ना बोललो कुणाला घालून शेपटी मी काढून धूर आलो थोडाच वेळ होतो, मी थांबलो तिथे, पण- भलताच मैफिलीचा पाहून 'नूर' आलो चतुरंग

प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी मी दिल्ली एअरपोर्टवर फ्लाइट चुकली म्हणून निवांत दुसरी फ्लाइट मिळेपर्यंत वेळ काढत बसलो होतो.माझी एक खूर्ची सोडून दुसर्‍या खूर्चीवर-व्हिलचेअरवर- एक सदगृहस्थ बसले होते.सायंटिफिक जगतात ते विषेश नावाजलेले होते.त्यांची विषेश गोष्ट अशी होती की त्यांना स्नायू हळू हळू क्षीण होण्याचा एक व्याधी झाला होता.तरीपण ते आपल्या कामात नेहमी व्यग्र असायचे.त्यांच्या बाजूला एक गृहस्थ बसून ते जे काही बोलत होते ते तो लिहून घेत होता. लेट फ्लाइट बद्दल आमचा विषय निघाला आणि दोन तास इथं बसून राहण्याला पर्याय नव्हता.मीच त्यांच्याशी जास्त जवळीक आणून त्यांची चौकशी करू लागलो होतो. त्यांची ही परिस्थिती पाहून मीच त्य

बंधने

लेखक स्नेहश्री यांनी रविवार, 03/08/2008 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
झुगारुन टाकावीशी वाटत आहेत ही बंधने काहीतरी शोधत आहेत माझ्या मनाची स्फंदने काहीतरी बोजड घेऊन चालते आहे उगीच कोणाच्यात तरी मन गुंतवत आहे तुझ ते scapbook मला अस्वस्थ करतय आणि एकीकडे मात्र माझ मन तुझ्यासाठी झुरतय गुंतत आहे फक्त तुझ्यासाठीच पण मनात येत आहे,काय करायच त्या "scap"च माझच मला कळत नाही की नक्की आता काय करायच तुझ्या बरोबर आयुष्य काढायच का तुला विसरुन जायचा...???