Skip to main content

आमची मुंबई

लेखक वृषाली यांनी रविवार, 31/08/2008 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची मुंबई असे शहर जेथे सारे काही शक्य आहे खासकरुन अशक्य. येथे carbon-dioxide हा oxygen पेक्क्षा जास्त आहे. येथे रस्त्यां नाच कचरापेटी म्हणुन गनले जात आहे. येथे मनुष्य गोळी घेतल्या खेरीज रात्री झोपु शकत नाही. येथे दुरध्वनीचे बिल माणसाला जगू देत नाही. येथे प्रत्येकजण स्वत:ला star समजत आहे. येथे सायकल सूद्धा कार पे क्षा जलद गतीने धावत आहे. येथे sky-scrapers मान उंचावून slum कडे पाहत आहेत. येथे पावसाळ्याचे आगमन होताच घरे कोसळत आहेत. येथे मनुष्य पहिल्यांदा कॄती करत आहे आणि मग विचार क

चायनीज टॉर्चर

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 31/08/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
चायनीज टॉर्चर मध्ये कैद्याला एका खुर्चीवर बसवतात. हातपाय बांधतात. कोणत्याही हालचालीची शक्यता अशी खबरदारी घेतात. एका बालदी मध्ये पाणी भरुन डोक्यावर टांगली जाते. डोक्यावर एकावेळी एकच थेंब पडेल एवढ भोक पाडतात. डोक्याचं पूर्ण मुंडण करतात. पुढचा थेंब केव्हा पडेल ह्याची कैद्याला खात्री नसते. १२ ते २४ तासात कैदी शरण येतो. असेच काही तरी आजकालच्या शिक्षक जमातीचे होत असावे. शिस्त मोडणार्‍या मुलांची संख्या वाढते अशी कायमची तक्रार शिक्षक मंडळी करतात. बरं शिक्षा करावी तर कुठला पालक नेमका चॅनेल वाल्याना घेउन उभा राहील ह्याचा नेम नाही. लहान सहान शिक्षेला मुले भिक घालत नाहीत. वर्गात गोंधळ कायम.

अथ काकापुराण.

लेखक रामदास यांनी रविवार, 31/08/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली "हे आणि रीटायर?" "करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ." बोलता बोलता जीभ चावली खरी .... पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता.

नायागारा धबधब्याजवळील फोटो

लेखक धनंजय यांनी रविवार, 31/08/2008 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात नायागारा येथे गेलो होतो. नायागारा नदीची खोल दरी कॅनडा आणि संयुक्त राज्य(यू एस) यांना विभागते. तरी या दरीवर अनेक बळकट टिकाऊ पूल आहेत. इंद्रधनुष्य (रेनबो) पूल इंद्रधनुष्य (रेनबो) पूल दरीत धबधबा अशा काही कोनात पडतो की कॅनडाच्या तीरावरूनच त्याला पूर्णपणे एका नजरेत बघता येते.

आठवणी

लेखक मनीषा यांनी रविवार, 31/08/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
(हे पद्य नाही... तरीही मी ते असे लिहिले आहे कारण , ते असे वाचले असता जास्तं परिणामकारक वाटेल असे मला वाटते )
ओथंबलेलं आकाश बरसतच नाही कधीचं मनात दाटलेलं मळभ पसरत राहतं आभाळावर संध्याकाळच्या कृष्णछाया पसरतात घरावर घराच्या या भिंती माझ्या एकांताच्या साक्षी सारे भोग ..... सा-या वेदना जपल्या आहेत त्यांनीच हळुवार होणारं मन सावरलं आहे त्यांनीच कसं सांगु?

प्रो.देसायांच्या नातवाचं तत्वज्ञान

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 30/08/2008 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
"पण अलिकडे मला वाटू लागलं की देवाची जरूरी आहे.मी मानतो की सायन्समुळे विश्वकर्त्याची जरूरी भासत नाही पण हे एक त्याचे रूप असावं." आज जरा गम्मतच झाली.आज प्रो.देसाई आपल्या नातवाबरोबर तळ्यावर फिरायला आले होते.रोजच्या ठिकाणी मी भाऊसाहेबांची वाट पहात बसलो होतो. गम्मत झाली हे म्हणण्याचे कारण, आजोबा आणि नातू तावातावाने बोलत येत होते.दोघांचा कोणत्या विषयावर वाद चालला होता,ह्याचं मला जरा कुतुहल होतं.ते जवळ आल्यावर त्या दोघानां उद्देशून मी म्हणालो, "भाऊसाहेब,तुमचा नातू आपल्या दोघांनाही वादात हरवणार ह्याची मला खात्री आहे.अहो,पुढची पिढी नक्कीच जास्त इंटिलीजंट असते असं मी कुठेतरी वाचलंय.हा तर आपला नातू म्

निर्धार

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 30/08/2008 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
चीनचा दौरा संपत आलाय. उद्या घरी परतणार. या दौर्‍यात नेहेमीप्रमाणे चावज्झौ होतेच. चावज्झाउ गेस्ट हॉटेल म्हणजेच ईंग बिंगवान ला उतरलो होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी साडे आठ ला नाश्त्याला मी आणि हुंग यान भेटणार होतो. सकाळी लवकतच जाग आली. आवरले आणि आवारात फिरायला निघालो. अचानक चार वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली. मी असाच कामानिमित्त आलो होतो. बरोबर माझा एक दाक्षिणात्य सहकारी होता, आपण त्याला रामू म्हणुया. दिवसभराचे काम संपले. साडेसातच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. सोडायला आलेल्या मंडळींनी विचारणा केली की आता इथेच जेवुन झोपणार की जरा फिरायला जाउया? वा! आणखी काये हवे?

बरटा

लेखक रेवती यांनी शनिवार, 30/08/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक उपवासाला चालणारे लिंबाचे झटपट लोणचे आहे. माझी आई हे लोणचे छान करते. साहित्यः एक लिंबू, गूळ, लाल तिखट, मीठ, भाजून केलेली जिरेपूड, आवडत असल्यास दाण्याचे कूट. कृती: लिंबू चिरून कुकरमध्ये उकडून घ्यावे. उकडताना दोन चमचे पाणी घालावे (जास्त नको). उकडलेल्या लिंबाच्या बिया काढून हाताने कुस्करून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे व चवीप्रमाणे गूळ, मीठ, लाल तिखट, जिरेपूड घालून कालवावे. लिंबू उकडल्यावरही त्यात थोडा कडसरपणा असतोच, तो ज्याना आवडत नसेल त्यांनी छोटा चमचा दाण्याचे कूट घालावे. साबूदाण्याची खिचडी / वडे, वर्‍याचे तांदूळ याबरोबर बरटा चांगला लागतो.

सप्तर्षि

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 30/08/2008 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सरनौबत प्रतापराव गुजरांनी शरण आलेल्या बहलोलखान पठाणाला धर्मवाट दिली. महाराजांना ही बातमी समजताच. त्यांनी टाकोटाक सरनौबतांना पत्र लिहीले - "स्वत:ला सरनौबत म्हणवता? तुम्ही तो केवळ शिपाईगिरीच केली! बहलोल इतुका बहुत वळवळ करीत आहे, त्यांस मारुनी फ़त्ते करणे अन्यथा आम्हांस तोंड न दाखविणे!". तीच चिड मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजरांनी नेसरी येथे अवघ्या सहा अंगरक्षकांसहीत बहलोलखान पठाणाच्या फ़ौजेवर हल्ला चढवला आणि अजुन एक खिंड पावन झाली --------------------------------------------------- काय घडविले? कसे म्हणावे सेनापती सुजाण? कुणा विचरुनी दिला सोडुनि, खासा बहलोल पठाण?
Taxonomy upgrade extras

देव कोण आहे?

लेखक सचिनकदम यांनी शनिवार, 30/08/2008 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी आज तुम्हांला असा प्र्श्न विचारणार आहे कि देव हा कोण आहे मला अस उत्तर नको कि तो माणसात आहे .मला हे सांगा कि तो दयाळु आहे कि सर्वशक्तिमान जर तो दयाळू आहे जर तो दयाळू आहे तर मग जगात दु:ख का आहे आणि जर तो दयाळू नाही तर तो देव नाही आणि तो जर सर्वशक्तिमान आहे तर तो ह्या दु:खाला थांबवत का नाही म्हणुन जर तो दयाळू आहे तर सर्वशक्तिमान नाही जर तो सर्वशक्तिमान आहे तर तो दयाळू नाही तुम्हांला काय वाटत ते सांगा