घरात एकटा मी, रविवारचे दुपारचे १२ वाजत आलेले, कालच्या थोड्याश्या तापाने प्रकृति नरम-गरम, म्हणून बाहेर जाऊन काही खायची किंवा घरात काही कष्टपूर्वक काही मसालेदार करायची हिंमत नाही, तेंव्हा काहीतरी सोपं, पचायला हलकं असं करावं म्हणून भाज्या बघायला फ्रिज उघडलं...आत फक्त कांद्याची लुसलुशीत पात...म्हंटलं चला मुगाच्या डाळीचा तडका देऊन काही करता येतंय का पहावं.