Skip to main content

आळस कसा टिकवावा?

लेखक येडा खवीस यांनी बुधवार, 03/09/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो मी आजपासुनच मिसळपाव चा सदस्य झालोय... सर्वसाधारणपणे "आळस हा माणसाचा शत्रु आहे" "आलस्यही मनुष्याणां शरिरस्य महारिपु..." इत्यादी इत्यादी फालतु सुभाषिते बरेचदा कानावर पडत असतात, पण आळस हा शरीरात लोणच्याप्रमाणे मुरुन रहावा....जाऊच नये यासाठी नेमकी काय उपाययोजना असावी असं तुम्हाला वाटतय?? एखाद्या मउशार गादीवर, डोक्याखाली दोन उशा घेऊन, पुस्तक चाळत चाळत, कसलाही विचार न करता...झोप आणि जाग यांच्यामधील सुवर्णमध्यात रहाण्याचे सुख कायम कसे मिळत राहील?

लालबागच्या राजाचा विजय असो...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 03/09/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मुंबईचा मानाचा बिंदू, मुंबईचं वैभव असणारा लालबागचा राजा या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदर्पण करत आहे. त्याकरता मी आमच्या "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा"चे समस्त मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो...! एकेकाळी राजाचं दर्शन अगदी सहज मिळायचं, परंतु आता आमचा राजा सेलिब्रिटी झाला आहे! :) मराठी माणसाला ज्यांचा अभिमान वाटावा असे हिंदी रजतपटावरील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितिन देसाई यांनी या वर्षी लालबागच्या राजाच्या सजावटीची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

गुगल क्रोम

लेखक विकास यांनी बुधवार, 03/09/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज (म्हणजे मंगळवारी २ सप्टेंबरला) गुगलने स्वतःचा इंटरनेट ब्राउजर १०० देशातील लोकांसाठी खुला केला. त्याचे नाव आहे गुगल क्रोम. आज संध्याकाळीच तो घरच्या संगणकावर वापरून पाहीला. फायर फॉक्स आणि इंटरनेट एक्स्प्लोररमधील बर्‍याच गोष्टी एकत्रीत केल्यात असे वरकरणी वाटले. अर्थात हे त्यांचे बेटा व्हर्जन आहे. काही साध्या साध्या सुविधा म्हणजे आपण कुठलेही पान उ.दा. मिपा, शॉर्टकट म्हणून क्विक लाँच मधे, डेस्कटॉपवर ठेवू शकतो.

ओंडका

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 03/09/2008 05:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओंडका =================== बुडवू पाहती कितीक लाटा.. "मी" तरी हा, बुडतं नाही!.. नाका-तोंडात पाणीच पाणी.. "मी" तरी हा, मरत नाही!.. पोहता पोहता थकली गात्रे.. "मी" तरी हा, गळत नाही!.. बनून हेंदकळे नाव सागरी.. बोट कुणाची बनत नाही!.. धरून राहतो हाती ओंडका.. "मी" तरी हा, तारत नाही..!!! =================== स्वाती फडणीस....... ०३-०९-२००८
Taxonomy upgrade extras

(इंडियन) अमेरिकन आई बाप

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 03/09/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई जरा खूष दिसले.त्यांच्या धाकट्या मुलीला मुलगी झाली होती. दोन एक महिने झाले असतील.मला ती बातमी त्यानी या पुर्वीच सांगीतली होती म्हणा.

मिपाचा प्रथम वर्धापन दिन आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा...!

लेखक सरपंच यांनी बुधवार, 03/09/2008 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, समस्त मिपाकरांना मिपाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आणि गणेशोत्सवानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा! केवळ अन् केवळ मायबाप मिपाकरांच्या सहकार्यामुळेच मिपाला गेल्या वर्षभराची वाटचाल करता आली. गेल्या वर्षभरात जे काही चांगलं झालं असेल, उत्तम झालं असेल ते सर्व मिपाकरांमुळेच झालेलं आहे आणि जे काही चुकलं असेल त्याकरता मी स्वत: जबाबदार आहे... या पुढेही मिपाकर सभासदांचा स्नेहाशीर्वाद मिपाच्या डोक्यावर अखंड राहो एवढीच श्री गजाननाचरणी प्रार्थना..! गणपतीबाप्पाची तुम्हाआम्हा सर्वांवर नेहमीच कृपादृष्टी राहो, हीच शुभकामना...! आपला, (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर. मिपाचे श्रद्धास्थान - लालबागचा राजा.

आपण यांना पाहिलंत का?

लेखक विकेड बनी यांनी मंगळवार, 02/09/2008 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D
आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का!

रावसाहेब ते राजसाहेब - एक वर्तूळ

लेखक सुनील यांनी मंगळवार, 02/09/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
"दुकानाचं बोर्डं ज्या भाषेत, ती त्या गावची भाषा", इती रावसाहेब. आता पुलंच्या रावसाहेबांच्या ह्या उक्तीची पार्श्वभूमी थोडी वेगळी असली, तरी दुकानदारांची मानसिकता त्यातून व्यवस्थित प्रकट होते. कोणीही दुकानदार आपले दुकान-धंदा सुरू करतो तो पैसे मिळवण्यासाठी. त्यासाठी गरज असते ती गिर्‍हाईकांची. गिर्‍हाईकेच दुकानदाराला पैसा आणि नाव मिळवून देत असतात. अर्थात गिर्‍हाईकांची कदर राखणे हे त्या दुकानदाराचे प्रथम कर्तव्य (याला काही सन्माननीय अपवाद आहेत, असे ऐकिवात आहे.