Skip to main content

"जीवन मे एक बार आना वेगुर्ला."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 09/09/2008 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ "वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले". वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते" प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी.

मलेशियातील माझ्या घरचा गणेशोत्सव

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 09/09/2008 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
भारतातून मलेशियात येताना लवकर परत न येण्याची खात्री असल्यामुळे,टिटवाळ्याला जाऊन फायबरची सुबक,सुंदर गणेशमूर्ति विकत घेऊनच(गणपतिची किंमत पैश्यात करणे अशक्य म्हणून सांगत नाही) विमानांत बसलो.मलेशिया मुस्लिम देश असल्यामुळे थोडी भीती वाटत होतीच.पण त्या गणेशानेच सारे कांही निभावून नेले.कस्टम अधिकार्‍याने आमच्याकडे लक्षसुध्दा दिले नाही.उलट टॅ़क्सी मिळवून दिली.गणेशकॄपा !

श्यामसखा.

लेखक सौरभ वैशंपायन यांनी मंगळवार, 09/09/2008 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी नसावे दुरवर परी, श्यामसखा जवळी असावा, श्रावणधारांसवेच अलगद, श्यामसखा बरसुनी जावा - १ श्यामसख्याच्या निळाईत अन मग, गौरतनु हे रंगुन जावे, वेणु त्याने लावताच ओठी, सप्तसुरात दंगुनी जावे - २ श्यामसखा असा बरसता, चंद्र लाजुनी चुरुन जावा, सैलावल्या केसात अन मग, स्पर्श जरासा उरुन जावा - ३ - सौरभ वैशंपायन(मुंबई).

कथा कढईभर शिऱ्याची!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 09/09/2008 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
खाण्याशी सख्य लहानपणापासूनच जडल्यामुळे आणि कुणी मखरात बसवून आवडीचे पदार्थ करून खायला घालण्याची शक्‍यता नसल्यामुळे मुदपाकखान्यात स्वतःचं कौशल्य आजमाविण्याविना पर्याय नव्हता. उपाशी राहायला लागणार नाही, एवढा स्वयंपाक इयत्ता नववीत असल्यापासूनच यायला लागला होता. दहावीत असताना तर त्यावर कडीच झाली. तेव्हा रत्नागिरीत राहत होतो. दहावीचं महत्त्वाचं वर्ष होतं. वर्षभर थेटरात जाऊन चित्रपट न पाहण्याचं पथ्य वगैरे (आई-वडिलांच्या धाकामुळे का होईना,) पाळलेलं. अभ्यासाचं "शिवधनुष्य' पेलताना खांद्याचे पार वांधे झालेले. त्यातून नेमकं फेब्रुवारी का मार्च महिन्यात आत्तेबहिणीचं पुण्यात लग्न ठरलं.

लार्ज हॅड्रॉन कोलायडर - अर्थात सर्वनाश नव्हे

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 09/09/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी इजाभौंनी माझ्या ज्ञानात भर पाडली, ती ही इथे पहा. आणि वर मला म्हणाले की यावर थोडं जास्त लिही. म्हणून जरा घाईघाईत चार शब्द खरडत आहे. घाई अशासाठी की जर हा लार्ज हॅड्रॉन कोलायडर जर उद्या सुरू झालो आणि "तेज" बातम्यांप्रमाणे जर आपण सगळे मेलो तर कळलं पाहिजे ना आपल्याला कसे मेलो ते! (हे पण इजाभौंचेच विचार.) मी ही माहिती उचलली, माझ्या दोन मित्रांकडून आणि एक नेहेमीचा मित्र विकीपीडियाकडून. अधिक, परीपूर्ण माहीती तिथे आणि तिकडच्या लिंक्समधून मिळेलच.

भाली नावाचा असाच एक सडेफटिंग

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 08/09/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
खरं म्हणजे आम्ही त्यांना भाली म्हणत असलो तरी त्यांच खरं नांव भालचंद्र रेडकर.भाली तसे दिसायला स्मार्ट होते.तरतरीत नाक,गोल चेहरा, गुबगुबीत शरिरयष्टी अणि अतिशय लाघवी स्वभाव त्यांचा.आयुष्यभर भाली ब्रम्हचारी राहीले. आणि त्याला एक कारण होतं.गावात जेव्हा देवीची लागण होती तेव्हा भालीच्या नशिबी आजारपण आलं.सर्व आंगावर देवीचे व्रण उठले आणि त्यांचा चेहरा त्या व्रणानी भरला.त्यामुळे एखाद्दया पितळीच्या अथवा तांब्याच्या कळशीवर जशी ठोकणं दिसतात अगदी तशीच ठोकणं त्यांच्या चेहऱ्यावर आली होती.आणि " ह्या विद्रुप चेहऱ्याच्या मला कोण मुलगी देणार?

राज ठाकरेंवर पत्रकार परिषद घेण्यासही बंदी ?

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/09/2008 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर मराठीजनहो! आत्ताच कानी आलेल्या बातमीनुसार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता दि ७ ऑक्टोबर पर्यंत दादर कोर्टाने पत्रकार परिषद घेण्यासही बंदी घातली आहे! भाषणबंदी तर त्यांच्यावर या आधीच घालण्यात आलेली आहे! परंतु आता पत्रकार परिषद घेण्यावरही बंदी??

ड्रिम जॉब !!!

लेखक टारझन यांनी सोमवार, 08/09/2008 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्यांदा रामराम लोकांनो ... आज पुन्हा नविन टॉपिक आणलाय चर्चेसाठी ... आमच्या बागायती डोक्यात नेमीच कायबी इपरीत चालू आसतय... तर झालं आसं ... परवा आमच्या प्रॉजेक्टची मिटींग झाली हो .. जाम राडा ... मेलामेली .. हा त्याला तो ह्याला .. नुसता ब्लेम गेम ... हत्त्च्च.. च्यायला इट आला बघा सगळ्याचा .... आम्ही सॉफ्टवेअर वाले . १२वी झाल्यावर एका ओढ्यात वाहिल्यासारखे कंप्युटर इंजिनियरींग ला आलो. चुकुन इंजिनियर झालो .. अजुन थोडी चुक झाली आन् जॉब पण लागला. ऍडमिशन घेताना ... काय काय स्वप्न पाहिलेली सगळ्याचा पार चुराडा .. मस्त एसी रुम असेल . आपला एक क्युबिकल असेल,लठ्ठ पगार असेल.. परदेशवारी ... विमान ..

पानगी

लेखक वैशाली हसमनीस यांनी सोमवार, 08/09/2008 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
१_ ६ यमीताई, खास आपल्यासाठी पानगीची कृति देत आहे.साहित्य- २-४ केळीची पाने,२वाट्या तांदूळाची पिठी,३-४ वाट्या दूध,पाव वाटी तूप,चवीपुरते मीठ,हवा असल्यास पाव वाटी गूळ. कृति-तांदूळाच्या पिठीत तूप व दूध घालून ,मीठ घालून सैलसर भिजवून घ्यावे.(फार सैल किंवा घट्ट नको)डावेने घालता येइल असे असावे.केळीच्या पानाचे लहान तुकडे करून एका तुकड्यावर २ वाट्या पीठ घालावे.त्यावर पानाचा दुसरा तुकडा ठेवून तव्यावर खरपूस भाजावे.पानगी तयार झाल्यावर दोन्ही पाने आपोआप सुटू लागतात.पाने काढून टाकली की पानगी तय्यार!

आशा भोसलेंना मानाचा मुजरा...!

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 08/09/2008 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या अखंड मेहनतीने, जिद्दीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अक्षरश: हुकुमत गाजवणार्‍या, सूरालयीवर विलक्षण प्रभूत्व असणार्‍या, आश्चर्याने चकित व्हावं अशी गळ्याची फिरत लाभलेल्या, या मराठमोळ्या अवलिया गायिकेला समस्त मिसळपाव परिवारातर्फे ७५ व्या वाढदिसानिमित्त मानाचा मुजरा....! आशाताई, जियो....! तात्या.