रूपक
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत
झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच .
मिसळपाव