Skip to main content

दादा विल नॉट बी बॅक अगेन

लेखक टारझन यांनी बुधवार, 08/10/2008 00:25 या दिवशी प्रकाशित केले.
दादा वोंट बी बॅक अगेन
मित्राने आत्ताच सांगितलं .. आपला दादा निवृत्त होणार .. त्यानेच अधिकृत घोषणाही केली .. आणि एकदम कसंसंच झालं.. आपण मरणार हे प्रत्येकाला माहीत आहे.. पण एकदा कळलं .. की अमुक अमुक दिवशी मरणार .. त्यावेळी जशी अस्वस्थता व्हावी . तसंच .. दादा च्या कारकिर्दीचा अंत झाला आहे हे तर कळूनच चुकलं होतं .. पण त्याने घोषणा केल्यावरच अशी उदासिनता का यावी ?

जुन्या आठवणी

लेखक mina यांनी मंगळवार, 07/10/2008 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मेरा भारत महान.. pujab1947-the dead 

train to pakistan-india 1947 सहजच फोटोंचे जुने कलेक्शन बघत होते आणि हे फोटो दिसले.म्हटलं आपल्या मित्रपरिवाराला हे फोटो दाखवु.

पुन्हा एकदा आमचे मित्र श्रीयुत "मी, माझे, मला"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 07/10/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा आमचे दोस्त श्रीयुत."मी,माझं,मला" एका कार्यक्रमात भेटले.कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो.वाटेत इतर काही गप्पा झाल्यावर मी त्यांना सहज विचारलं, "सध्या कसला विषय डोक्यात घोळतोय?" माझा प्रश्न संपतो न संपतो तोच मला हे आमचे दोस्त म्हणाले, "आता विचारलंत तर चला मी काय ते सांगतो.जवळच्या गुरूप्रसाद रेस्टॉरंट मधे बसून गप्पा मारुया." मनात म्हणालो, "कुठली झकमारली आणि ह्या गृहस्थाना हा प्रश्न केला" आता काय करणार स्वभाव भिडस्त पडला, नाही म्हणता येई ना.म्हटलं चला, कॉफीची ऑर्डर देऊन झाल्यावर कसला ही विलंब न लावता ते म्हाणाले, "ज्यावेळी माझं मलाच समजलं,की मला अजून तेव्हडं बुद्धिचातुर

भडकमकर मास्तरा॑चे हार्दीक अभिन॑दन !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 07/10/2008 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
आपले परमप्रिय मिपकर 'भडकमकरमास्तर' उर्फ डॉ. म॑दार जोगळेकर आजपासून 'बाप माणूस' झाले आहेत! आजच त्या॑च्या पत्नी प्रसूत होऊन त्या॑ना (प्रथम) कन्यारत्न प्राप्त झाले आहे! त्या॑चे, त्या॑च्या पत्नीचे व कुटुम्बीया॑चे मनःपूर्वक अभिन॑दन!!

माझाही अनुभव ....(तो प्रसंग कधीच विसरु शकलो नाही...)

लेखक राम दादा यांनी मंगळवार, 07/10/2008 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो..तुमचे अनुभवाचे लेख वाचुन मला माझ्याही जीवनातील एक प्रसंग आठवला..तेव्हा मी लहान होतो...माझी आई मला नेहमी सांगायची कि आपण एखाद्याला मदद करावी..पण मी लहान होतो..जास्त लक्ष देत नव्हतो.पण आईचे संस्कार अंगिकारले होते.. ....दहावीची परिक्षा जवळ आली होती ..फक्त एकच दिवस बाकी होता..आदल्या दिवशी मी दिवसभर घराबाहेर निघालो नाही..काही महत्वाचे मुद्दे वाचुन काढ्ले..डोक्यामध्ये फुल टेन्शन्..परिक्षेचा पहिला दिवस उजडला..आईने सकाळी लवकर उठवले..बाहेरच्या चुलीवर मस्तपैकी पाणी गरम केले..छान आंघोळ केली..पहिला पेपर मराठीचा होता..त्यामुळे जादा दडपण नव्हते.. हायस्कुल घरापासुन बरोबर ६ किमी अंतरावर

बटाटा हाईट्स

लेखक अरुण वडुलेकर यांनी मंगळवार, 07/10/2008 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिबंदर यायला तीनच स्टेशनच राहिली, तसा, लिमयेचा आवाज कानावर येऊन आदळला, " लिखित्या ऊठ रे. डाऊनच्या लोंढ्यात मरायचंय का? च्यायला! लिखित्या, लेका झोप कशी रे लागते एवढ्या गर्दीत." खरंच आज झोप अगदी अनावर झालेली होती. मुंबईतील महानगरपालिकेतील चांगली नौकरी आणि भरभक्कम पगार केवळ या दोनच दोन जमेच्या बाबी वगळता सध्याचे बाकी सारे जीवन जीवघेण्या धकाधकीचे होते. चांगल्या नौकरीचा प्रश्न मुंबईने सोडवला होता तरी निवासाचा प्रश्न खर्डी सारख्या दूरवरच्या गांवात येऊन सुटला होता. प्रवासातच रोज जाऊन येऊन किमान तीन तास जात होते. विश्रांतीही जेमतेमच होत होती. त्यातून वाचनाचे व्यसन लागलेले.

(जाणिव)

लेखक राघव यांनी मंगळवार, 07/10/2008 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जाणिवेचा प्रेरणास्त्रोत - जाणिव
कुठेतरी पोट माझं कण्हत राहतं थंड सुस्कारांना वाट देत राहतं जेवण ओरपलेलं चवीनं ''जाणीवे''च्या टोकांनी बोचत राहतं नेहमीच आधी केला विचार अधिकाचा समोर नसलेलं सारं जणु माझंच होतं प्रत्येक घासासवे उदराचा घेर वाढलेला आणि सफाईसाठी नको तिथे बोळं अडलेलं असतं नजरांचे ते असंख्य वार अन मुठीतल्या नाकांचे वेडगळ दृष्य सहन करून, अवघडलेलं पोट गुरगुरत राहतं आता कसली तक्रार आणि चिंता कशाची? "ईनो" घेतल्यानंतर जे व्हायचं ते होऊनच जातं "यातनां"नी मात दिली माझ्या "

धनाढ्य एकवीशी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 07/10/2008 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
धनाढ्य एकवीशी (प्रेरणा- हनुमान चालीसा) जय धन मान सकळ सुखसागर माया वसत त्रीखंडी निरंतर पैसा पैसा पैसा पैसा दिसतो ऐसा, आहे कैसा? लपविला जर टॅक्सची खासा काळा शार बने मग पैसा भरता सरकाराऽचे देणे शुभ्र धन नांदे अभिमाने हिरवा रंग नोटांचा तुमच्या नयनी दिसे झणी लोकांच्या काळ्या नोटा, दिली सुपारी लाल रंग मग धन ते धारी रंगबिरंगी अती पैसा वरचा परीटाकडून शुभ्र करायचा पैसा अपुला रोड भासतो दुसऱ्याचा तो लठ्ठ जाहतो खोटी नाणी, चपळ फ़िराई तांब्याची मोडीत विकाई पेटीत ठेवून कोऱ्या नोटा तुकडेवाल्या जोडून वाटा पैसा नश्वर, आरोप खोटा! शाश्वत आहे प्लास्टीक नोटा उधारीचा तो पैसा प्लास्टीक जपून ठेवती पैसा बॅन
Taxonomy upgrade extras

अमेरिकास्थित भारतीय वंशाच्या कुटुंबातील हत्याकांड

लेखक मुक्तसुनीत यांनी मंगळवार, 07/10/2008 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
सीएनएन मधील बातमी : http://www.cnn.com/2008/CRIME/10/06/california.murder.suicide/index.html बातमीतील महत्त्वाची वाक्ये :
महिनोन् महिने नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यातून लॉस एन्जल्स भागातल्या "सान फर्नांडो" या सधन लोकवस्तीत रहाणार्‍या माणसाने आपली सासू , पत्नी व तीन मुले यांची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने आत्महत्या केली. ..... ...... कार्थिक राजाराम या ४५ वर्षे वयाच्या माणसाचे हे कृत्य आहे असे सकृद्दर्शनी दिसते. ... .... मृतांमधे एका १९ वर्षे वयाच्या मुलाचा समावेश आहे.

माझी कविता

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 07/10/2008 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेवर नाही संस्कार भाषेच्या व्याकरणाचा, प्रतिभा अलंकारांचा, तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा. कुणाला तरी आई म्हणाव इतका संस्कार आईग! म्हणायला पुरेसा आहे, कुणाला तरी बाप म्हणाव इतका संस्कार बापरे!! म्हणायला पुरेसा आहे कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव इतका संस्कार अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे आईग! बापरे!! अरे देवारे!!! इतक आणि इतकच माझ्या कवितेच आयुष्य बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे ते अनुभूतिच विश्व......!