Skip to main content

दुपारच्या कविता.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 14/10/2008 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
टच् टच वाजती जोडवी किण् -किणती काकण माडीवर कशी येऊ आई दारात राखण. ****** कशी उठू कशी बसू दाराआड उभी सासू चाळ -पाखड करून कसं सैलावलं नेसू. ******* वही नको बुकं नको नको आता उजळणी तीळ मोजून संपले पुरे झाली शिकवणी. ******
Taxonomy upgrade extras

कोजागिरी

लेखक धुमधडाका यांनी मंगळवार, 14/10/2008 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
धुमडाक्याचा धुमधडाक्यात नमस्कार !! अहो, तुम्हाला कोजागिरी निमित्त मनापासुन शुभेच्छा !! मिसळ पाव मस्तच मेजवानी आहे बरका,खुप छान आहे हे सगळ॑, मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.

मला मुम्बईत रहायचय..........!!!!!!!!!

लेखक नुसताधिन्गाना यांनी मंगळवार, 14/10/2008 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय मित्र्-मैत्रिणिनो, ही माझी पहिलिच वेळ आहे, माझी स्वताहाची एखादि कविता कोणासमोर तरी ठेवायची. मला जराशी भीती ही वाटते आणी उत्सुकताही. मी मुम्बईत जन्माला आलो आणी कापड गिरण्या बन्द पडल्या म्हनुन लहान्पणीच गावाकडे गेलो. एक जिद्द होती मुम्बईत यायची. नोकरी मिळवायची. मी एका मोठ्या कम्पनीत २ वर्षान्पासुन कामाला आहे . कायम स्वरुपी नोकरी आहे माझी. आता गरज आहे एका घराची. माझ्या हक्काच्या घराची.
Taxonomy upgrade extras

ती संध्याकाळ...

लेखक nishad यांनी मंगळवार, 14/10/2008 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ८. ३० ची वेळ होती. मी असाच ऑफिस मध्ये कामाच्या गडबडित होतो. तसा इतक्यात नेहमीच ऑफिस मढ़ना घरी जायला उशीर व्हयाचा. काम भरपूर होत. ती दिवसभर माझ्या सोबतच असायची. आम्ही दोघ एकाच मॉड्यूल वर आणि एकाच कंप्यूटर वर काम करायचो. तिच लग्न नुकताच झाला होत हे मला माहीत होत पण तरीही एक अनामिक ओढ़ आमच्यात होती. ती नेहमी म्हणायची की " मी तिला जरा उशीरा भेटलो" मी कामात गुंग असतांना ती माझ्यासाठी काफी आणायची. आम्ही रात्री बर्याच वेळ पर्यंत गप्पा मारायाचो. नंतर मी तिला रात्री तिच्या घरी ड्राप करायचो. तीन चार महीने कसे गेलेत कळलच नाही. दिवस असेच धुंदीत चालले होते.

उच्चार आणि भाषा : GHOTI and FISH

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 14/10/2008 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी भाषेत उच्चाराचे अनेक नियम आहेत तसेच त्या प्रत्येक नियमाला अपवादही आहेत. उदा वर्णाक्षर "G" नन्तर E I हे स्वर आले तर त्याचा उच्चार ग असा न होता ज असा करावा. उदा General आय पहिल्या अक्षरानन्तर आले तर तो उच्चार ई असा न करता आय असा करावा Wine तसेच TI हे जोडुन आले तर त्याचा उच्चार श असा होतो उदा ट्युशन GH हे अक्षराच्या शेवटी आले तर त्याचा उच्चार फ असा होतो उदा Rough या सगळ्या नियमांची माहिती घेउन मार्क ट्वेन ने एक गणीत/ तर्कट मांडले . GHOTI या शब्दाचा उच्चार फिश असा होऊ शकतो. किंवा फिश हा शब्द GHOTI असा लिहीता येईल. थोडे स्पष्टीकरण GH = F O = I ( as

वसंतराव देशपांडे

लेखक व्यंकु यांनी मंगळवार, 14/10/2008 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रिय बंधू आणि 'मैत्रिणींनो' मी तसा मिपावर नवीन आहे त पहिल्यांदाच लिहीतोय तेव्हा सांभाळुन घ्या. तर सांगायचा मुद्दा असा कि माझ्याकडे वसंतरावांची एक अप्रतिम चित्रफित आहे पण भानगड अशी कि ती मला कोणत्याही संकेतस्थळावर टाकता येत नाहीए तेव्हा जर कोण मला आपला पत्ता देण्यास तयार असेल तर मी ध्वनिचित्रतबकडी पाठवू शकेनं. [एक विनंती- उत्तरे देताना शक्यतो मला अहो जाहो करू नका.] पुरवणी सुचना-ध्वनिचित्रतबकडी मोफत दिली जाईल. अगदी टपालखर्चही माफ.

विनायक प्रभू, एक समुपदेशक....

लेखक संजय अभ्यंकर यांनी मंगळवार, 14/10/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार, दि. १२.१०.२००८ रोजी प्रभू साहेबांनी माझ्या घरी येउन इ. १२वी तील माझ्या मुलासहीत काही विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या पद्धती विषयी समुपदेशन केले. प्रत्येक विद्यार्थी हा बुद्धिमत्तेत वेगवेगळ्या पातळीवरचा होता. प्रत्येक विद्यार्थ्याचे आकलन करुन त्यानुसार त्यांनी प्रत्येकास मार्गदर्शन दिले. त्यांचे समुपदेशन हे कोठेही क्रिप्टिक नव्हते. विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दात ते होते. उत्तम विद्यार्थी निवडुन त्यांच्या कडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेणारे मार्गदर्शक अनेक आहेत.

हिच जगाची रीत असावी

लेखक शर्मीला यांनी मंगळवार, 14/10/2008 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
हिच जगाची रीत असावी चंदनापेक्षाही झिजावे माझे-माझे म्हणावे अन त्या पिल्लांनी त्याच्या मोबदल्यात काय दयावे अनवाणी पायाने चालावे उन्हात तापावे पावसात भिजावे अन पिल्लांना त्याची झळ ना लागू दयावी पिल्लांना पंख फुटले की घरटे सोडून जावे
Taxonomy upgrade extras

सीमापाश

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 14/10/2008 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ार फ़ार पूर्वी, अगदी सुरवातीला. अमर्याद पसरलेले जंगल होते. सीमा अशी काहीच संकल्पना नव्हती. मात्र वाघ सिंहानी गजबजलेल्या भागात इतर प्राणी जाणे टाळत असायचे. सीमेची ही सुरवात असावी. बुद्धीची देणगी लाभलेली एक प्राणीजात जनावर जातीच्या सीमा सोडून मानवी झुंडीच्या सीमा बनवून राहू लागली. त्या सीमेला गुहा असे नाव पडले. पुढे जसजशा झुंडी वाढू लागल्या गुहेच्या अपुऱ्या सीमा आता टोळ्यांच्या सीमा झाल्या. त्या झाडापासून त्या ओढ्यापर्यंत ह्या किनाऱ्यापासून त्या पर्वतापर्यंत सीमा प्रस्थापित झाल्या. मानवाच्या सीमीत नजरेपासून दूर दूर मानवाला मापणेही शक्य नसलेल्या सीमेच्या पलीकडे त्रीमीती सिमांनी न बांधलेल्या ज

कुणी मला राग सांगेल का ?

लेखक केशवराव यांनी मंगळवार, 14/10/2008 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणे कोणत्या रागात आहे हे कुणी मला सांगेल का ? चित्रपट : ' हारीश्चंद्र तारामती ' सन : १९६२ संगीत : लक्ष्मीकांत - प्यारेलाल. गीत : ' मेघवा गगन . . . . .'