Skip to main content

क्रिकेट शौकिनांच्या देवावर घाणेरडे आरोप?

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेली १९ वर्षे सातत्याने क्रिकेटचे नवनवे विक्रम करणारा , क्रिकेट शौकिनांच्या गळ्यातला ताईत असलेला सचिन तेंडुलकर घमेंडी आणि खोटारडा आहे , असं कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? मुळात कोणी असं बोलेल तरी का त्याच्याबद्दल ? तर हो , सचिन घमेंडी आणि खोटारडा असल्याचे त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि हा आरोप करणाराही कोणी भलता सलता नाहीये. हा महानुभव आहे सचिन विरुद्ध अनेक सामने खेळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी विकेट किपर अॅडम ग्रिलक्रिस्ट. गिलख्रिस्टच्या आत्मचरित्रात त्याने सचिनविषय़ी लिहिताना तो खोटारडा असल्याचे म्हटले आहे.

शांती अन् मुक्ता

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 24/10/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
ग्वेंडोलिन ब्रूक्स (१९१७-२०००) ही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमधील एक महत्त्वाची कवयित्री होऊन गेली. तिची कर्मभूमी शिकागो शहराचा दरिद्री आणि ओबडधोबड दक्षिण भाग. त्या परिस्थितीत पिचणारी, त्या परिस्थितीतही भोग भोगणारी, अशी माणसे तिच्या कवितांमध्ये उतरली आहेत.
Taxonomy upgrade extras

आता काँग्रेसवरच बंदी घाला !

लेखक सनातन यांनी शुक्रवार, 24/10/2008 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य परिस्थिती दाखवणार्‍या वृत्तवाहिन्यांची मुस्कटदाबी करणारी लोकशाहीद्रोही काँग्रेस ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर महाराष्ट्र पेटला. त्यांच्या अटकेचे पडसाद राज्यसभेतही उमटले. राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्रातील अराजकाला मनसेलाच कारणीभूत धरले. असे करून काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने स्वत:ची कातडी बचावण्याचा निष्फळ प्रयत्‍न केला. कोणतेही प्रकरण अंगाशी आले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचे नेते त्यांच्या सोयीप्रमाणे त्या घटनेतून अर्थ काढतात.

लिव इन रिलेशनशिप चा कायदा

लेखक तारका यांनी शुक्रवार, 24/10/2008 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
हा लिव इन रिलेशनशिप विषयी चा कायदा आहे तरी काय? दुसर्‍या स्री ला पत्नी चा दर्जा दिल्याने मूळ पत्नी चा दर्जा कमी होतो दुसर्‍या स्त्री ला पोटगी हा पत्नी चा आर्थिक तोटा नाही का? हा कायदा 'हिन्दु विवाह कायदा' ला छेद देत नाहि का?

लघुनिबंध स्पर्धा - "...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!" :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 24/10/2008 00:45 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजपर्यंत मिपावर अतिलघुकथा, पाककृती वगैरेच्या स्पर्धा झाल्या.सर्व मिपाकरांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, अंमळ मजा आली.. ते पाहून मिपाकरांमध्ये अजून एक लघुनिबंध स्पर्धा घ्यायची असे आम्ही ठरवले आहे. विषय - मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण. मोजून दहा ओळी.. निबंधाच्या शेवटी, "...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!" हे वाक्य येणे आवश्यक आहे... निबंधात, "शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य" हा शब्द एकदा तरी आलाच पाहिजे. "फाट्यावर मारणे.." या क्रियापदाचा वापर एकदा तरी करणे आवश्यक आहे. जसे, फाट्यावर मारले, फाट्यावर मारतो, फाट्यावर मारीन.. इत्यादी..!

भाजे लेणी

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 23/10/2008 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल. भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत. अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत. ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे) भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे. जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत. स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत. जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो.

दुखतामां?, दुखतालाचतां,दुखुकच व्होयां(दुखतंना? दुखणारच ते,दुखायलाच हवं)

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 23/10/2008 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांना त्यांच्या आयुष्यात दोनदा स्ट्रोक आला.एकदा त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी आणि नंतर दहा वर्षानंतर,म्हणजे पन्नासाव्या वर्षी.पहिल्या खेपेला ते लवकरच बरे झाले.एक तर ते तरूण होते,आणि स्ट्रोक त्यामानाने माईल्ड होता.त्यांची डावी बाजू पर्‍यालेसीसमुळे निकामी झाली होती.पण लवकरच बरे होवून ते कामावर जावू लागले होते. कामावर जॉईन होण्यापुर्वी त्यांची मेडिकल टेस्ट घेतली गेली.त्यांच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टरने त्यांना पेन उचलून उघडून द्यायला सांगीतलं .ते त्यांनी केलं पण देतांना उलट करून न देता पेनची बाजू डॉक्टरच्या हातात दिली.त्यामुळे त्यांचं फिझीकल आणि मेंटल काम कोऑर्डिनेट होत नाही असं अनमान का

आजतकचा कौल - आवाहन

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 23/10/2008 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आजतक या न्युज चॅनेलने इथे मनसेवर बंदी घालावी की नाही असा कौल सुरु केला आहे. त्यांना बहुदा उद्याची हेडलाईन बनवायला भातमीची भ्रांत पडली असावी, कारण बर्‍याच दिसात बच्चनला काय सर्दी झाली नाहिये अन एखाद्या सिनेतारकेच्या कुत्तरड्याला तापही भरला नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की आपण मराठी माणसाने तिथे जाउन दाखवुन द्यायला हवे की आपल्याला काय हवे आहे ते, नायतर उद्या त्यांना बोंबाबोंब करायला आहेच .." देखिये जनता की आवाज !! लोग चाहते है म न से पार पाबंदी लगे !" चला तर मग ..

भाषा - फ्रेन्चचा ढासळता बुरुज

लेखक सुनील यांनी गुरुवार, 23/10/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या महिन्यात एक घटना घडली. जगाच्या दृष्टीने म्हटले तर अगदीच क्षुल्लक वाटणारी. भारतातील वृत्तपत्रात तर शेवटच्या पानावरदेखिल तिला स्थान मिळाले नसावे. पण फ्रान्समध्ये मात्र त्या घटनेने मोठा गदारोळ उठला. अशी काय होती ती घटना? रवांडा हा अफ्रिकेतील एक टिनपाट देश. अधिकृत भाषा फ्रेन्च. पण गेल्याच महिन्यात रवांडा सरकारने इंग्लीश ही अधिकृत भाषा करण्याचे संकेत दिले. येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांत फ्रेन्चऐवजी इंग्लीश शिकविण्याचे ठरविले. आणि फ्रान्समध्ये हलकल्लोळ माजला! आपल्या भाषेविष्यी, जगातील तिच्या स्थानाविषयी फ्रान्स अतिशय हळवा आहे.