Skip to main content

अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती

लेखक mina यांनी सोमवार, 24/11/2008 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला विचार आवडले म्हणुन मिपावर देत आहे.आपल्या काय वाटते लेखिका जे.के.रोलिंगच्या विचारांबाबत?माझ्या ब्लागवर हे विचार वाचकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत.
'हॅरी पॅटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे.के.रोलिंग यांनी जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 'अपयशाच्या'फायद्यावर प्रकाशझोत टाकुन विद्यार्थ्यांना एक नवा कानमंत्र दिला..हा कानमंत्र प्रत्येकासाठी बहुमोल ठरणारा आहे.म्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहे.पदवी घेतल्यानंतर लेखिकेचे सात वर्षे ही महाप्रचंड अपयशाची होती..त्याबाबत सांगतांना त्या

--- ओढ वादळी ...(सवंगलता छंद) ---

लेखक केशवटुकार यांनी सोमवार, 24/11/2008 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल प्रातःस्मरणीय नित्यवंदनीय गुरुवर्य केशवसुमार स्वप्नात आले, म्हणाले "आंद्या शिंच्या अरे झोपतोस काय ? उठ भाड्या .. मोठ्या विश्वासाने तुमच्या खांद्यावर काही जबाबदारी टाकली होती .. तुम्ही पार चिंध्या केल्या रे विश्वासाच्या !!" ... गुरुवर्याचा क्रोधित स्वर ऐकुन अंमळ घाबरलोच .. गुरुबंधु रंगारावाला फोन लावावा म्हटला तर गुरुदेव कडाडले .. "थांब जरा !! .. आज आलोच आहे तर हा द्वंद .. सॉरी छंद शिकुन घे !" .. त्यांनी शिकवला तो सुरेख असा "सवंगलता छंद" ...

ओढ वादळी ...(लवंगलता छंद)

लेखक मनीषा यांनी सोमवार, 24/11/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
नको मज हे विसावे शुभ्र चांदण्याचे साद देती मार्ग मला तप्त या धुळीचे | पाउलांना ओढ माझ्या निळ्या आभाळाची नजरेत सामावली रेघ क्षितिजाची | घोंघावती दरीतूनी अनावर वारे तेजाळती त्या गगनी लक्ष लक्ष तारे | नभास या गवसणी गिरीशिखरांची सौदामिनी उजळती कडा काजळीची | उधाणल्या या वार्‍याची गाज मनी राही वादळी ही ओढ अशी उमलते देही | गुंजन हे गोड नको भोगी भ्रमरांचे साद द्यावी त्याने, ज्याचे पंख गरुडाचे |

भटकंती - हरिहरेश्वर (१)

लेखक मिंटी यांनी सोमवार, 24/11/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं. ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं.

बालकवी

लेखक जयेश माधव यांनी सोमवार, 24/11/2008 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे बालकवि या॑च्यावीषयी काही माहीति आहे काय?

रविन्द्र केळेकर यांना ज्ञानपीठ

लेखक अभिरत भिरभि-या यांनी सोमवार, 24/11/2008 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणी साहित्यिक रविन्द्र केळेकर यांना वाङमय क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ जाहिर झाला आहे. लोकसत्ताच्या आजच्या अंकातला हा एक लेख. केळेकरांना कोकणीसाठी मिळाला तरी त्यांचे लेखण मराठीत ही होत असते. त्यांच्या साहित्याचा हा अल्प आढावा. केळेकरांच्या साहित्याविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल. आणि केळेकरांच्या ह्या मताविषयी साधकबाधक चर्चा व्हावी असे वाटते.

श्रद्धा आणि सबुरी!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 24/11/2008 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
विधानसभा निवडणुकीचे नगारे जोरजोरात वाजू लागले होते. जागावाटप यशस्वीरीत्या पूर्ण झालं होतं. मतभेद मिटविण्यातही विलासरावांची कृष्णशिष्टाई यशस्वी ठरली होती. विलासरावांची तर या दिवसांत फारच धावपळ झाली होती. सकाळचा नाश्‍ता मुंबईत, दुपारचं जेवण दिल्लीत, संध्याकाळचा चहा मंत्रालयात, तर रात्रीचं जेवण कुणा समर्थकाच्या घरी, अशी गडबड सुरू होती. कॉंग्रेसची बहुतांश ठिकाणची प्रचाराची तयारी पूर्ण झाली होती. फक्त उमेदवार ठरायचे बाकी होते. "कार्यावर आधारितच उमेदवारी' हा निकष असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, अगदी अर्धा तास बाकी असतानाही कॉंग्रेसची उमेदवारांची यादी जाहीर झाली नव्हती.

दुसर्‍याच्या नेत्रातून जीवन पहावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 24/11/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आम्ही आमच्या आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत जायचो.आजगावला आमचा ब्राम्हणांचा एक वाडा होता.

पदर

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 23/11/2008 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे दोन महिन्यापुर्वीची घटना. संध्याकाळी ७ वाजता मोबाईल वाजला. दुस-या टोकाला एक मुलगी. आवाजावरुन काहीतरी किचकट प्रकरण आहे हे लक्षात आले. त्यांना लगेच भेटायला बोलवले. अर्ध्या तासात दरवाजावर आई आणि मुलगी हजर. आईचे डोळे तांबारलेले. बायकोने पाणी देउन भाजीच्या निमित्ताने पळ काढला. सर्व संभाषणात आई गप्प होती. इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या त्या मुलीने सर्व कर्मकहाणी सांगितली. हे प्रसिद्ध घराणे. वाडा जाउन मोठी बिल्डींग बांधलेली. शेवट्च्या मजल्यावर १५०० फुटाचा ब्लॉक. घरात आजी आणि आजोबा. आजोबा दशग्रंथी ब्राम्हण. थोडक्यात सांगायचे म्हटले तर शुभं करोती संस्काराचे घर.