Skip to main content

झुंज त्याची व्यर्थ गेली

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 05/12/2008 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
लाख दिवे विझु नये त्याने स्वताचीच वात केली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली नभी चंद्र्मा खेळ्तो खाली माझा रवी तळपे हा सार्‍या दगड्-धोंड्यात माझा एक तारा झळके हा घाव सोसले सोसले त्याने ह्रद्याची ढाल केली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली वीर गती मिळे त्याला डोळा पाणी का आणावे पण लाख मेल्या मनांसाठी एक त्याने का मरावे? तरी झुंजला झुंजला त्याने वाद्ळाला मात दिली तुंम्ही दिवस पाहिला त्याची कायमची रात झाली हार्-फुले फिके शब्द सारा क्षणाचा देखावा धग चितेची तशीच खेळ सत्तेचा पहावा आज माझा रवी मावळला उद्या तुमचा जाइल आज बैल सत्तेवर उद्या राज्य रेड्या
Taxonomy upgrade extras

पुरे झाले चंद्र सूर्य!

लेखक केदार केसकर यांनी शुक्रवार, 05/12/2008 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, ही माझी नवीन कविता. कशी वाटतेय ते नक्की सांगा. एका स्त्रीचे मनोगत रेखाटण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय? कशी सुचली हे नंतर सांगेनच.

व्यायाम हराम आहे!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 05/12/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
सर्दी-पडसं किंवा मध्यमवर्गीयांच्या दृष्टीनं तत्सम पातळीच्या गंभीर आजारावरच्या औषधासाठी एका डॉक्‍टर मित्राकडे गेलो होतो. मित्र या माणसाला काही पाचपोच नसावी, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यानं ते वचन सार्थ केलं. सर्दी-पडशावरचं औषध राहू द्या, त्यानं माझ्या आकारमानालाच हात घातला. "लेका, केवढा केंडासारखा वाढला आहेस?'' मित्रानं बॉंब टाकला. तोही साक्षात सहधर्मचारिणी सोबत असताना! "बघा, मी तुम्हाला सांगत नव्हते? खाण्यावर काही कंट्रोल नाही. व्यायाम करायचा नाही.

अहिंसावाद प्रश्नोत्तरे आणि उहापोह

लेखक कोलबेर यांनी शुक्रवार, 05/12/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो हे मान्य असुनही काही गोष्टींचा खुलास करणे आवश्यक वाटल्याने हा प्रपंच. हिंसा/अहिंसा ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाचा मी अभ्यासक नाही. मला ह्या दोन्हीविषयी जे अर्थ अभिप्रेत आहेत त्यातुन इथे लिहित आहे. गालावार डास बसलेला जाणवत असताना तो एका फटक्यात मारुन न टाकता उडुन जायची वाट बघणे असा काहीसा अहिंसावादाचा जो नेभळट अर्थ लावला जातो आहे तो मलातरी हास्यास्पद वाटतो. हिंसावादी असो अहिंसावादी असो कुणीही पटकन तो डास मारुनच टाकणार. असल्या शुल्लक घटनांमधुन कसल्याही तत्त्वाचा/विचारसरणीचा शिक्का कुणावरही लावता येणे शक्य नाही.

अनुत्त्तरीत प्रश्न

लेखक जयेश माधव यांनी शुक्रवार, 05/12/2008 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच ताज ओबेराय वर जो अतीरेकी हल्ला झाला,त्यात पोलीस तसेच आर्मीचे जवान शहीद झाले,त्या शहीद झालेल्या सर्व जवाना॑ना मानाचा मुजरा! पण पुढे झालेले राजकारण बघुन काही प्रश्न अनुत्तरीत रहातात ते असे---- १..पोलिस आणि आर्मीचे जे जवान शहिद झाले त्या शहीदा॑वर राजकारणी लोका॑नी लाखो॑ करोडो रुपये ओवाळुन टाकले पण...पण..रोज बोर्डरवर मरणार्या शहीद जवाना॑साठी कोण काय देतो? २..ताज ओबेराय या प॑चतारा॑कीत होटेला॑वर हल्ला झाला म्हणुन गळा काढुन रडणारे सीने तारे आणि तारका मुलु॑ड,घाट्कोपर तसेच अन्य ठिकाणी झालेल्या बोम्ब हल्ल्यात कीतीतरी सामान्य माणूस मेले तेव्हा कुठे होते? जयेश अ.माधव

गांधीवाद्याची थप्पड

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 05/12/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

पॅनिक डिसऑर्डर.....

लेखक नाम्या झंगाट यांनी गुरुवार, 04/12/2008 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर..... पॅनिक डिसऑर्डर काय असते??? त्याचि कारणे, लक्षणे, उपचार, टेस्ट, काळजी कशी घ्यावी??????

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

लेखक सुनील मोहन यांनी गुरुवार, 04/12/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.