Skip to main content

कॉर्न भेळ

लेखक स्नेहश्री यांनी शुक्रवार, 05/12/2008 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक छानस डाएट फुड आहे. त्यात तुम्ही तुम्हाला हवीतशी व्हेरिएशन्स करु शकता. खर तर आत्ता भाज्या छान असतात त्यामुळे मस्त मजा येते करायला पण आणि खायलापण. साहित्यः- ३ वाट्या कॉर्नचे दाणे वाफवुन ३ वाट्या मोड आलेले मुग वाफवुन ३ कांदे बारिक चिरुन लाल,पिवळी आणि हिरवी भोपळी मिरची प्रत्येकी १ बारिक चिरुन ३ गाजर किसुन ३ टोमॅटो बारिक चिरुन १-१+/२ कोथिंबीर बारिक चिरुन १ वाटी हिरवी चटणी ( पुदिना+कोथिंबीर+लसुण+आल+लिंबु+मिठ+मिरची) १+१/२ चमचा जिरे खमंग भाजुन+१ चमचा काळ मीठ एकत्र करुन घ्यावे १+१/२ चमचा पाणीपुरी मसाला. डेकोरेशन साठी: चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला, डाळींबाचे दाणे ,आणि बटाटाची लाल सळी( "डाएट फुड" लोकाना नको.) वरिल सर्व साहित्य आयत्यावेळेस एकत्र करुन त्यावर चिंगु चटणी , जिरेपुड, पाणीपुरी मसाला,डाळींबाचे दाणे , आणि बटाटाची लाल सळी घालुन खायला द्यावे.

वाचने 8820
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सळी चिवडा असतो ना तोच. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

चटपटीत आणि पौष्टीक. करून बघीन. रेवती

In reply to by रेवती

करून बघीन.
आणि तुमचं बघून झालं की अफ्रिकेत पार्सल करा ... पत्ता नंतर देतो .. :) - टारेवडी

मस्त आहे दुपारच्या चहाच्या सोबत खायला... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by बहुगुणी

अहो चिंगु म्हणजे चिंच गुळाची चटणी. चिंच आणि गूळ पाण्यात भिजत घालून ठेवावे. चिचेचा कोळ काढून घ्यावा. आणि मग तो कोळ आणि गूळ मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्यावे. त्यात मिठ आणि थोडे लाल तिखट घालावे. झाली चटणी तयार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कॉर्न हे डायट फूड ?