Skip to main content

हॅप्पी न्यू इयर....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शुक्रवार, 26/12/2008 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील एक संध्याकाळ.... विन्या, मध्या, रम्या आणि अन्या आपआपले बियरचे ग्लास घेऊन बार मध्ये बसले होते. त्या शहरातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे हे चौघेही विद्यार्थी. चौघेही तसे हुशार होते पण अगदी ओवाळून टाकलेले. टगेगिरी करण्यात सगळ्यात पुढे. त्यातल्या विन्या आणि रम्याचे पिताश्री आमदार आणि मध्या आणि अन्याचे बाप मोठे उद्योगपती. या दोघा उद्योगपतींनी पक्षाला पैसा पुरवायचा. आणि त्या बदल्यात दोघा आमदारांनी त्यांना सर्व सोयी सवलती पुरवायच्या असा जणू अलिखित करारच होता. त्यामुळे ही चारही पोरे अगदीच मोकाट सुटली होती. रॅगिंग करणे हा तर त्यांचा अगदी आवडता विषय.

मी शतजन्म घेतले

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/12/2008 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
मी शतजन्म घेतले मिस्किल हास्यावर तुझ्या ,मी फिदा जाहले, ते बोलणे ऎकता ,कसे रे मंत्रमुघ्ध झाले तुझ्या प्रेमात साजणा ,मी वाहुन गेले तुझ्यासाठीच साजणा ,मी शतजन्म घेतले स्वप्नात रोज माझ्या ,कोण भेटुन गेले? कोण अशी वेडी ,चुट्पुट लावुन गेले.. अधरावर कोण ,प्रेमगीत लिहुन गेले? ते गुणगुण्या साठीच, मी शतजन्म घेतेलेले स्मरता आपली भेट, अंग अजुनहि शहारलेले, मीळता नजरेस नजर, श्वास माझे थांबलेले सुर बासरीचे तुझ्या,मनांत माझ्या रेंगाळलेले ते ऎकण्या साठी साजणा,मी शतजन्म घेतेलेले आठवणींचे देहात, लक्ष सागर उसळले आठवता छबि तुझी, नाजुक तनु उन्मळे कुठे शोधु तुला,मीच तुझ्यात हरवले शोधण्यास रे मी शत जन्म घेतलेले
Taxonomy upgrade extras

मुखर्जीसाहेब कॄती केली पाहीजे , पण ...

लेखक बामनाचं पोर यांनी शुक्रवार, 26/12/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यापासून भारताचे सर्व नेते हे पाकिस्तानला धमकी देण्यात आणि " ओ , हे ऐकत नाहीत बघा " असे रडगाणं अमेरीकेसमोर गाण्यात फार व्यस्त आहेत. प्रणव मुखर्जी हे नुकतेच म्हणाले " बडबड नको कॄती करा ". मुखर्जीसाहेबांचे अगदी बरोबर आहे कॄती केली पाहीजे , पण ती पाकने नव्हे तर आपण ...आपल्या देशातली घाण साफ करण्याची कॄती .. या हल्यानंतर अगदी मच्छीमार संघटना ते पार रॉ पर्यंत सगळयांनी जे एकमेकांवर आरोप केले ते अगदी घृणास्पद होते. प्रत्येकाचे हेच म्हणणे होते " आम्ही इशारा दिला होता , त्यांनी ऐकलं नाही " ..

व्हाईट हाऊस समोर मिसळपावचा झेंडा...

लेखक खादाड_बोका यांनी शुक्रवार, 26/12/2008 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो ...मध्यंतरी माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना घेवुन "वॉशिंटन डि. सी."ला गेलो होतो, तेव्हा "व्हाईट हाऊस" समोर काढलेले फोटो.

ती शाळा,तो बाक व ते शिक्षक

लेखक विनायक पाचलग यांनी गुरुवार, 25/12/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, माझा १ सप्टेबरच्या सकाळ मध्ये आलेला माझ्या शाळेवरचा लेख येथे पुनर्प्रकाशित करत आहे.
आणि ज्या माझ्या शाळेबद्दल मी हे सर्व लिहिले ती ही माझी शाळा प्रायव्हेट हायस्कूल ...माझी शाळा ..माझा अभिम

हरवलेली ख्रिश्चन माणसे

लेखक एकलव्य यांनी गुरुवार, 25/12/2008 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
एकलव्याची तिरंदाजी ०९
आजच्या या सुप्रभाती सर्वांना नाताळच्या शुभेच्छा! काल रात्रीच सांटाने लालभडक मोज्यामध्ये माझ्या मुलीसाठी एक गोड फ्रॉक आणि एक सुंदरसे खेळणे आणून ठेवले आहे. Thanks Santa! She really is a sweet girl!! साखरझोपेतून घर जागे व्हायच्या आधी काही आठवणी मनात आल्या त्या निसटून जायच्या आत घाईघाईने येथे मांडतो आहे. मी किती बरे ख्रिश्चनांच्या सहवासात आलो... म्हटले तर बर्‍याच. पण तसे बघायचे झाले तर यातील अनेकांना मी ख्रिश्चन म्हणून पाहिलेच नाही.

भगवान श्रीराम मांसाहारी होते काय ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 25/12/2008 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान श्रीराम हे मांसाहारी होते काय ? बरेच दिवस माझे आमच्या टोळक्यात ह्या विषयावरुन वाद विवाद सुरु आहेत. रामायणात तसा उल्लेख आहे का नाही ह्यावरुनही वाद सुरु आहेत.

कतला फ्राय

लेखक पांथस्थ यांनी गुरुवार, 25/12/2008 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः * तुमच्या आवडत्या माश्याच्या तुकड्या (नेहेमीप्रमाणे उभ्या कापा अथवा बंगाली पध्दतीने कापुन - मी कतला वापरला आहे) * हळद * मीठ * मोहरिचे तेल कृती: १. माश्याच्या तुकड्यांना हळद आणि मीठ चोळुन ठेवावे (~ ५-१० मिनीटे) २. पसरट (आणि शक्यतो नचिकटणार्‍या) भांड्यात मोहरिचे तेल गरम करावे ३.