Skip to main content

जीभ घसरली......की सटकली....

लेखक सुहास. यांनी बुधवार, 14/01/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझ्या तिर्थस्वरूपाच्या मुखातुन "सत॑रज्या अ॑थरा"च्या एवजी "अथर॑ज्या सथरा"असे शब्द भर लग्नात बाहेर पडले होते... आणी एक मित्र "चाळ्लेली वाळू"एवजी "वाळ्लेली चाळू" म्हटला होता... कोणाकडे असे मजेदार प्रस॑ग असल्यास सा॑गा... वेळ्खाउ(फालतू)

संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा...!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 14/01/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक ढकल पत्रा द्वारे आलेलि कविता मजकूर काढून टाकला आहे, क्षमस्व! कृपया हे वाचावे व सहकार्य करावे अशी कळकळीची विनंती.. -- मुख्य प्रशासकीय अधिकारी, मिसळपाव डॉट कॉम.
Taxonomy upgrade extras

पं. उल्हास कशाळकर

लेखक मोहन यांनी बुधवार, 14/01/2009 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
पं. उल्हासजींना या वर्षीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचे आजच्या नभोवाणी बातम्यांतून समजले. ग्वाल्हेर, आग्रा, व जयपूर गायकीचा नितांत सुंदर मिलाफ त्यांच्या गायकीत आहे. पं. राम मराठे, पं. गजाननबुवा जोशी, पं. राजाभाऊ कोगजे या गुरुंची परंपरा उल्हाजींनी समर्थपणे पेलली आहे. भारतीय अभिजात संगीताला लोकाभिमूख करण्यातले त्यांचे योगदान खुपच मोठे आहे. उल्हासजींच्या मैफिलींना असलेला युवा वर्गाचा प्रतीसाद पहाता त्यांचे अभिजात संगीतातले दिपस्थंभा सारखे स्थान लक्षात येते.

माहिती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
मला tomato सुप करण्याची पद्धत हवी आहे

माहेती

लेखक प्राप्ती यांनी बुधवार, 14/01/2009 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला महिला कोणता व्यवसाय करु शकतात वि़षयी माहेती हवी आहे

च्या मारी धरून फटॅक्... :) ....(मिपावरील प्रतिक्रिया-सम्राटांना च्यायलेंज्)!

लेखक झेल्या यांनी बुधवार, 14/01/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
"च्या मारी धरून फटॅक्" ही एक अलीकडील गाजलेली ऐकलेल्या गाण्यावरील उत्स्फूर्त प्रतिक्रिया... वेगवेगळ्या प्रकारची (आनंदी, उडती, बुडती, कुढ्ती, कुंथती...रडकी, पडकी...सुरेल, बेसूर्...शुद्ध, अशुद्ध, बेशुद्ध इ. इ.) गाणी ऐकून आपण कोणकोणत्या/कशाकशा/कायकाय (!?) प्रतिक्रिया द्याल.....कृपया इथे नोंदवा... "फक्कड्..तंगडीतोड्-हुक्काओढ झालं गाणं.."(कशी वाटली?) तर अशाच काही भन्नाट प्रतिक्रियांचा संग्रह करूया....! घ्या देवाचं नाव आणि करा सुरू.. हर हर महादेव...!

पायी प्रवासातली मजा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 14/01/2009 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
"मला हळू हळू लक्षात आलं,की जे दुसर्‍याला देतात तेच लोक दुसर्‍याकडून घेतानाही त्यांचा सन्मान ठेऊन घ्यायला शिकतात.त्यांच्या चेहर्‍यावरून ते त्याबद्दल ऋणी आहेत आणि आभारी आहेत हे प्रदर्शीत होत असतं " श्रीधर केळकर बरीच वर्ष इंग्लंडमधे राहत होते.आता निवृत्त झाल्यावर परत ते भारतात कायमचे राहायला आले.इंग्लंडमधे असताना त्यांना मैलो- मैल पायी प्रवास करायची संवय होती.इथे आल्यावर त्यानी तेच करायचं ठरवलं.प्रथम प्रवासाचा मोठा पल्ला घेण्याऐवजी त्यानी मुंबईहून कोकणात आणि पुढे गोव्यात पायी प्रवास करायचं ठरवलं. केळकर म्हणाले, "इंग्लंडमधे राहात असताना कामावर जायच्यावेळी कुणाची ना कुणाची लिफ्ट मिळायची.त्यामुळे

संक्रांत कशासाठी

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 07:36 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.

लालजी देसाईंचे (पु लंच्या रविवार सकाळ मधले गायक) निधन

लेखक मिसळपाव यांनी बुधवार, 14/01/2009 06:39 या दिवशी प्रकाशित केले.
मित्राकडून बातमी मिळाली की लालजी देसाई गेले. पु लंच्या 'रविवार सकाळ' मधे अतिशय बहारदार गाणं असायचं त्यांचं. थोड्याशा भीमसेनांच्या ढंगात ते 'उगीच का कांता' असं काही सुरेख रंगवतात की व्वा! श्रीकांत मोघेने थोडा वात्रटपणा केल्यावर लालजी, 'कांSSS ता SSSSSS' अशी नाजुक हरकत घेतात नी श्रीकांत मोघेंची 'अग आई ग' अशी दाद जाते !! कींवा 'धरणीSSSSS' म्हणून ठासून दाखवतानाचा आवेश, कानडी ढंगात गायला सुरूवात केल्यावर त्याच 'धरणीSSSSसंग'ला 'वा..वा..वा' अशी श्रीकांत मोघेंची मॅचिंग दाद.....छे.