`स्लमडॉग मिलेनिअर' ला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. रेहमानलाही. हा भारतीय संगीतकाराचा पहिला बहुमान.
पण गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी आधी कुणी भारतीय चित्रपट पाठविल्याचं किंवा स्पर्धेत असल्याचं ऐकिवात नाही. `स्लमडॉग' भारतीय चित्रपट नाही. त्याला म्हणूनच तिथे प्रवेश मिळाला का?
कारण आत्तापर्यंत कुठलाही भारतीय चित्रपट गोल्डन ग्लोब साठी स्पर्धेत असल्याचं ऐकलेलं नाही. या पुरस्कारासाठीचे निकष कोणते, भारतीय चित्रपट त्या स्पर्धेत आधी होते का, नसले तर का नाही, याबाबत कुणी अधिक माहिती देऊ शकेल काय?