Skip to main content

सुवर्णप्रभा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 21/01/2009 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाल केशरात रंग खेळते पहाट खास दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस... तारकांत लोपली निशा उषेस पाठवून अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस... सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ... सागरात गाज आणि लाट जात उंच उंच गारवा हवेत आणि वेड लागते मनांस... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...
Taxonomy upgrade extras

बेलफास्ट---- मदत हवी आहे.......

लेखक मन यांनी मंगळवार, 20/01/2009 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो.... बेलफास्ट(नॉर्दन् आयलंड) या ठिकाणाबद्दल कुणाला अधिक माहिती आहे काय? तिथे प्रथमच पाठवण्यात येत आहे. आमच्या टीम पैकी अजुन तरी कुणीही तिथं गेलेलं नसल्यामुळं; कसं जावं, कुठं उतरावं ह्याची माहिती मिळाली तर फार बरं होइल. निदान चांगल्या B&B ची किंवा तात्पुरत्या निवासाची (सुरुवातीच्या काही दिवसांकरीता)माहिती हवी आहे. पोस्ट कोड BT13BT च्या जितक्या जवळ जागा मिळेल तितकं बरं होइल. आपलाच मनोबा....

हुरडा पार्टी!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/01/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
jamkhed trip 004 एका मित्राच्या निमंत्रणावरून शनिवार-रविवारी जामखेडला (जि. नगर) त्याच्या शेतात गेलो होतो.

संवाद दोघींचा

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 20/01/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
ओ राणी सरकार उठा उठा ६. ३० वाजले ! ए थांब ना प्रगती ! झोपू दे ना ५ मिनिटे अजून ! अजिबात नाही या तुझ्या अशा आळशीपणामुळे आजकाल तुला आवरायला रोजच उशीर होतो आणि मग शेवटी गडबड करत नीट न आवरता तशीच जातेस. घाणेरडी बरं बरं असू दे ! अगं असू दे काय राणी म्हणून मिरवतेस ना ? आम्ही तुझ्या मैत्रिणी बर्‍या म्हणायच्या तुझ्यापेक्षा हो बाई .बास कर तुझी वटवट. जाते मी आवरायला ! राणी आजचा दिवस लक्षात आहे ना ? का गं? आज आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो ! कुणाचा ? अग विसरलीस ? इंद्रायणीचा गं ! हो खरंच की ! बर झालं आठवण केलीस ते . नाहीतर रोजच्या सारखं लोणावळ्याला फक्त वडापाव घेऊन निघालो असतो दोघी.

बहर

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 20/01/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तुझ्या आठवणींचा बहर मजला पुरता वेढुन गेला भरदार फुललेला गुलमोहोर पावसान पुरा झोडुन गेला !! कळेल तुला त्या तेथे दुरवर आठवांचा पायरव वाजुन गेला आवरताना चांदणे हे शुभ्रतर रात माझी जागवुन गेला !! निनाद्ताना पावसाची सर मजला पुरता झींगुन गेला कधि ना तुला कळ्णार गंध तुझा हा वेडावुन गेला!! सुचेता सुळे
Taxonomy upgrade extras

सर्पाख्यान !

लेखक मऊमाऊ यांनी मंगळवार, 20/01/2009 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
घराच्या फाटकाजवळच मी एक कृष्णकमळ लावले होते. तेव्हाच कोणीतरी शेरा मारला होता की कृष्णकमळाजवळ साप येतात असा. पण एक तर मला त्या फुलांचा सुगंध मनापासून आवडतो अन भर वस्तीत कुठले आले साप बीप ? असे म्हणून मी आपले दुर्लक्षच केले होते. तसे नाही म्हणायला पाठीमागच्या शाळेच्या आवारात एक दोन वेळा एक मोठा साप दिसला होता पण किती तरी वेळा सांगूनही त्या शाळेच्या मुख्याद्यापकांनी दुर्लक्षच केले होते अन शिवाय तिथे एक मूंगूसही दोन चारदा दिसले होते. कशी छान गुण्यागोविंदाने नांदणारी जोडी होती तिथे. पण तो साप कधी इकडे तिकडे भटकलेला पाहिला नव्हता, त्यामुळे मी ही जास्त विचार केला नव्ह्ता त्या बाबतीत.

(पुनरागमनी अरे सुमारा...)

लेखक केशवटुकार यांनी मंगळवार, 20/01/2009 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल प्रातःस्मरणीय नित्यवंदनीय विडंबन भास्कर गुरुवर्य केशवसुमारांचे (परिकथेतील राजकुमारा ...)विडंबन प्रसिद्ध झाले अन आम्हाला त्यांनी इतके दिवस जोमाने दिलेल्या दिक्षेचा गृहपाठ दाखवण्याची घाई झाली !! :D पुनरागमनी अरे सुमारा स्थळे ती सारी बघशील का ? काय चालले आंतरजाली आग जरा विझवशील का ? त्या नावांचे गूढ इशारे बघ ते वाचून जाणून सारे स्वयंप्रकाशित जरी म्हणोनी, पुरी न भाजी देशील का? भोग नशिबा कुणी लावले ? सल्ला काकुस कुणीरे दिला ? त्या चर्चाची साक्ष अम्हाला, 'कशा'तुनही देशील का ? फसुन तुजला देती