Skip to main content

सत्य

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 30/05/2021 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? असा प्रश्न कुणाच्या मनात कधी आला असेल का? माहीत नाही. पण माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही.

हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी रविवार, 30/05/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद मध्ये कोणी दहावा तेरावा करणार पंडित माहीत आहे ? ५ दिवसाआधी आजी ( आई ची आई एक्स पायर झाली ,गावाकडे , तिचा मुलगा ,माझा मामा ३ वर्ष आधीच गेला तिचा माझ्यावर जीव होता ,त्यामुळे मला दहावा व तेरावा करायचा आहे पण मी हैदराबाद मध्ये अडकलो आहे कोणी मदत करू शकेल ? संपादक मंडळ यांशी ,हा धागा प्रशोंत्तरे सदरात टाकायला पाहिजे पण गाम्भीर्य आणि लगो लगता म्हणून येथ टाकत आहे समजून घ्यावे

मौसमी....एक दुखरी सल (भाग २)

लेखक OBAMA80 यांनी शनिवार, 29/05/2021 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
.....ती रात्र मला अजून लख्ख लक्षात आहे. माझा पहिलाच दिवस. माझा मित्र अविनाश मुलांना शोधायला गेला होता आणि मी त्या तिकीट खिडकी जवळ आमची सामानाची बॅग सांभाळत उभा होतो.

दिठी- एक अनुभूती.

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 28/05/2021 14:11 या दिवशी प्रकाशित केले.

दिठी, एका सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणा-या सुखदु;खाची गाथा सांगणारी एक छोटीशी गोष्ट. अतिशय तरल, सुंदर, भावनांचा कल्लोळ, मनात निर्माण होणारे असंख्य विचार, सतत हिंदकळत राहावेत अशी एक उत्तम कलाकृती. एखादी सुंदर कथा, कादंबरी, वाचून झाल्यानंतर किंवा एखादं गाणं डोळे मिटून ऐकत राहावे, पुस्तक छातीवर उपडं करून त्या कथेत, संगीत मैफलीत रमून जावे त्यातून बाहेर पडूच नये असा आनंद देणारी कथा म्हणजे 'दिठी' मराठी चित्रपट.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे. तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्‍यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता.

शहर सोडताना..

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 28/05/2021 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांत जास्त काय वाईट? सवय..! जागेची माणसांची झाडांची रस्त्यांची बारची वाईन शॉपींची पानटपऱ्यांची थिएटरांची जगण्याची.. शहर सोडताना अवघड जातं मग शहर काही वाईट नसतं.. पण नाही जमत एखाद्याला मूळं रूतवायला किंवा झगडायची उमेद खलास होत जाते हळूहळू आणि कळतं की आता जावं लागेल.. निरवानिरव करावी लागते मग दूधवाला गॅसवाला पेपरवाला आवराआवर बांधाबांध भांडी गाद्या चादरी पडदे कपडे बॅगा सगळंच.. बडवायजरच्या साचलेल्या कॅन्सची विल्हेवाट ॲशट्रेचा कधी नव्हे तो मोकळा श्वास रिकाम्या कपाटांच्या तळाशी कसल्याशा जीर्ण पावत्या बिलं नाही नाही म्हणता म्हणता काय काय जमवलेलं असतं ह्या डायऱ्याही संध्याकाळी नदीत सोडून दिलेल्

वामकुक्षी की जाम कुक्षी?

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दुपारी झोपावे की जागे राहावे हा प्रश्न आम्हाला करोना पर्वात रोज पडत आहे. या निशा सर्व भूतानां तस्याम् जागर्ति संयमी! असे भगवंत गीतेच्या कुठच्याश्या अध्यायात कुठल्या तरी श्लोकात म्हणतात. (येथे त्या अध्यायाचा आणि श्लोकाचा क्रमांक शोधून काढून तो येथे लिहून, आम्हाला भगवद्गीतेचे किती सखोल ज्ञान आहे हे वाचकांना वरवर दाखवून छाप पाडण्याचा मोह होत होता. परंतु आम्ही पडलो कमालीचे विनम्र आणि प्रामाणिक! त्यामुळे तसे केले नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी! लोभ असावा!!) जेव्हा सामान्य भूत मात्रांची रात्र असते (आणि ते झोपलेले असतात) तेव्हा संयमी जागा असतो असा त्याचा भावार्थ आहे.

गेल्या सहस्त्रावधी वर्षांत हिंदुस्थानमध्ये लागलेल्या होळ्या!!

लेखक Sumant Juvekar यांनी गुरुवार, 27/05/2021 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या होळीला मला आठवल्या त्या राजपूत स्त्रियांनी केलेल्या जोहारच्या होळ्या पृथ्वीराज, संभाजी महाराज, राजा दाहीर यांनी केलेल्या सर्वस्वाच्या होळ्या, नंतर इंग्रजांबरोबर स्वातंत्र्ययुद्धात अनेक वीरांनी केलेल्या आपल्या संसाराच्या होळ्या. जन आला दिन होळीचा, उधळीत विविध हे रंग आसेतु-हिमाचल राष्ट्र, होलिका स्वागता दंग ! उत्साह खरोखर मोठा, पक्वान्ने घर घर बनती पण मज या हर्षोल्हासी, वेगळ्या होलिका स्मरती! भूपाल सिंध प्रांताचा, आठवतो मज दाहीर ज्याने पहिला या देशी, झेलला यावनी वार! कोणी न सहाय्या आला, आर्यावर्तातुनि वीर धन, दासी, पत्नी, कन्या, वृक लुटून गेले पार! (वृक=लांडगा) सिंधची जाहली होळी,

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 27/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.