Skip to main content

लोकसभा निवडणुका २००९: पुढे काय?

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 09/03/2009 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्या निवडणुक निकालाच्या अंदाजाविषयीच्या लेखमालेचा पुढचा आणि अखेरचा भाग म्हणजे राज्याराज्यातील अंदाज एकत्र करून पूर्ण देशात काय परिस्थिती असेल हे बघणे. अर्थात मतदान होण्यासाठी सुमारे काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन महिन्यांचा कालावधी आहे. या काळात अनेक बदल होऊ शकतात.तेव्हा सद्यकालीन परिस्थितीचे माझे जे काही आकलन आहे त्यानुसार बांधलेले हे अंदाज आहेत. राज्याराज्यातील अंदाज एकत्र करून मी ते एका एक्सेल शीटमध्ये मांडले. सध्याच्या राजकिय परिस्थितीमध्ये जे पक्ष ज्या आघाडीत आहेत (यु.पी.ए/एन.डी.ए/प्रस्तावित तिसरी आघाडी आणि इतर पक्ष) त्यानुसार वर्गवारी केली.

कधी येणारगं तू सखये

लेखक अडाणि यांनी सोमवार, 09/03/2009 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी वारा वाहता मेघदूत नी गारा होत्या मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये झाडावरचा राऊ मजला हळुच घालतो शीळ स्वरांची जाणुनबुजूनी माझ्याभोवती आठवण करीतो तुझ्या सुरांची रवीराज तो गहीवरलेला सांजवेळी बहरत होता मुक्तहस्ते तळ्याकिनारी तुझा रक्तिमा वाटत होता कोपरावरच्या वळणावरती मोगराही बहरलाय माझ्या वेड्या जिवाबरोबर तो ही तुझ्यासाठी आतुरलाय एक नभ जो जाई सुसाट वाटे तयावर स्वार होउनी मी यावे ऊडीनी अलगद कुशीत तुझया एक क्षणिक सरूनी जाते संध्याकाळ तुझ्या आठवणित नकळत मन माझे मग काहूरते कधी येणारगं तू सखये - अडाणि.
Taxonomy upgrade extras

लेक होती घरामध्ये--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 09/03/2009 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेक होती घरामध्ये दारी गजबज होती लेक सासरी गेली अन सुनी झाली ही ओवरी लेक नटते थटते हौस पुरविते आई आत्ता संक्रांतीची मेंदी कशी रंगतच नाही गौर पुजतसे माय जणु लेकच साजिरी दोन दिवस पाहुणी लेक येतसे माहेरी बाप कणखर मोठा जीव गुंते लेकीपाशी सारा मानमरातब ठेवी लेकीच्या दाराशी लेक सुखात सासरी सुखी माहेरी माउली काय भाग्य त्या लेकीचे सासरी आईची सावली
Taxonomy upgrade extras

मी जगतो आहे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 09/03/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी झुंडी बरोबर जगतो आहे, झुंडी बरोबर तडजोड करतो आहे, दुस-याशी जुळवुन घेण्यासाठी, अ़खंड धडपडतो आहे....! मी जसा आहे तसा कुणी च स्विकारत नाही मला, म्हणुनच दुस-यांना पाहिजे तसा..
Taxonomy upgrade extras

एक विचार

लेखक दशानन यांनी सोमवार, 09/03/2009 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
आपण मिपावर अनेक पुस्तकांचे परिचय वाचतो व त्यावर आलेले प्रतिसाद ही वाचतो, मग असे वाटते की यार हे पुस्तक वाचावयास हवे आहे, पण जे माझ्या सारखे आपल्या प्रदेशापासून दुर आहेत त्यांची हेलपाट होते, मग कधी तरी प्रदेशवारी झाल्यावर घेण्याच्या लिस्ट मध्ये ते पुस्तक पण जमा होतं पण काही ना काही कारणाने ते पुस्तक वाचायचं राहून जातं ! असं काही करता येईल का ..

आणि म्हणे मी लिंबूटिंबू!!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 09/03/2009 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी!!! आज तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. मी बरेच दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणत होतो पण आमच्या त्या खड्डूस मालकांनी (म्हणजे मालक आमचे, तुमचे पिडांकाका!!!!:)) कधी संधीच मिळू दिली नाही. "तू अजून पुरता तयार झाला नाहियेस" हे त्यांचं पालुपद!! तेंव्हा आत्ता कुठे तुमच्याशी जरा बोलायची मोकळीक मिळाल्येय, तिचा फायदा घेतोय!!! "अरे पण तू कोण, कुठला, ते तरी सांग मिपाकरांना!", डांबिसकाका "म्हणजे? त्यांना अजुन काही पत्ताच नाही?" "पत्ता कसा असेल? अरे तू म्हणजे काय "अनुष्का" आहेस का की मिपावरच्या समस्त सभासदांना तुझी समग्र माहिती!!!

करी ऑफ कॉन्स्पीरसी.

लेखक रामदास यांनी सोमवार, 09/03/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
करी ऑफ कॉन्स्पीरसी उर्फ कटाची आमटी कटाची आमटी ही नाजूक पाककृती आहे.सरावानी जमते.बिघडली तर गुळवणी होते.या आमटीचा किचनमधून येणारा सुगंध आणि दरवळ हेच या आमटीचे आयएसओ ४१००० प्रमाणपत्र आहे.सौ.रामदास यांच्या सौजन्याने ही पाककृती येथे देत आहे. साहीत्य : मसाल्यासाठी-जीरं ,लवंग ,दालचिनी,तेजपत्ता. भिजवलेले कच्चे शेंगदाणे, खोबर्‍याचे पातळ काप खोबर्‍याचा तुकडा (भाजण्यासाठी) काजू तुकडा (ऐपतीप्रमाणे),कढीपत्ता, तेजपत्ता, हिरव्या मिर्चीचे तुकडे,कोथींबीर, लिंबाएव्हढी चिंच,थोडासा गूळ. कृती : कट काढणे : पुरणासाठी चण्याची डाळ शिजवून घेताना त्यावर पांढरा फ