Skip to main content

|चाफा|

लेखक सरीवर सरी यांनी शुक्रवार, 04/06/2021 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा प्राची ताईचा चाफा तुझी आठवण नागचाफा सळसळत केशर अत्तर मन माझे मोहणारा तुझी आठवण गुलाबी चाफा प्रीतधारा बरसवणारा रंगाने सदैव मोहवणारा तुझी आठवण कनकचंपा डुलत डुलत कर्णिकार मधाळ सुंगधी झंकारणारा तुझी आठवण देव चाफा रेशम निशा वेळी तेज:पुंज रोजच उजळणारा

प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 04/06/2021 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ आपली संयमी फलंदाजी तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले हीच ती शोएब अख्तर जिच्या शोधास मन आसुसले काय तिची ती अदा वर्णावी, बॉल टाकते गदागदा सेहवाग

"राज" आणि "सिमरन": एका प्लॅटफॉर्मची गोष्ट

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 04/06/2021 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या रेल्वे जंक्शनवरचा प्लॅटफॉर्म. अनेक लोक तिथे येऊन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत असतात. धावत पळत प्लॅटफॉर्मवर येतात आणि ट्रेनमध्ये बसतात आणि पुढे जातात. परंतु ही गोष्ट केवळ रेल्वे स्टेशनावरच घडत नाही. आयुष्यामध्ये असे असंख्य जंक्शन्स आणि असंख्य प्लॅटफॉर्म्स असतात. प्लॅटफॉर्म हे एक माध्यम आहे ज्यामधून पुढच्या दिशेने आणि पुढच्या मार्गाने जाता येतं. कधी शाळा हा प्लॅटफॉर्म असतो आणि विद्या ही ट्रेन असते. कधी दु:ख हे प्लॅटफॉर्म असतं आणि तिथे मिळणारं शहाणपण आपल्याला पुढे घेऊन जातं. असाच एक प्लॅटफॉर्म म्हणजे जीवन आहे. ज्ञानी लोकांनी जीवन ही एक युनिव्हर्सिटी आहे असं म्हंटलंय.

कुंदापूरा चिकन घी रोस्ट

लेखक केडी यांनी शुक्रवार, 04/06/2021 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
img1 ह्या रेसिपी चा ईजाद ५० वर्षांपूर्वी, कुंदापूरा मधल्या शेट्टी लंच होम मध्ये झाला असे म्हणतात). कुंदपुरा मंगळूर पासून साधारण ९० किमी वर आहे म्हणून बहुदा ह्याला मंगलोरी घी रोस्ट पण म्हणत असावे. ह्यात खरी मज्जा आहेत ती अर्थात तुपाची आणि त्या लाल रंगाची.

अकुपार : ध्रुव भट्ट

लेखक अन्या बुद्धे यांनी गुरुवार, 03/06/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
अकुपार : ध्रुव भट्ट रसग्रहण फळांचं फ्रुटसलाद करतात ही झाली इन्फो. ते स्वतः करणं अनुभवणं हे ज्ञान. टोमॅटो हे देखील फळच आहे हेही अधिक स्पेसिफिक ज्ञान आणि माहिती. पण तरी ते फ्रुटसलाद मध्ये वापरायचं नसतं ही काही न शिकता आजीवगैरे लोकांना *जाण* होती. अमुक प्रकाश असेल की कितीवर अपरेचर ठेवायचं? शटरस्पीड किती? वगैरे शिकवता येतं पण फ्रेम कोणती सिलेक्ट करायची? छायाप्रकाश काय परिणाम करतात? हे शिकवता येत नाही. त्यासाठी जाण लागते. जगाकडे बघायचा एक विशिष्ट नजरिया आपल्या सवयीचा झाला आहे. तो अत्यन्त उपयोगी आहेच.

पायनॅपल मँगो सालसा

लेखक केडी यांनी गुरुवार, 03/06/2021 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
Image1 खरतर उन्हाळा संपत आलाय पण सध्या हापूस ऐवजी इतर प्रकारच्या आंब्यांचा सिझन सुरू झाला आहे म्हणून ही झटपट होणारी आणि जराशी वेगळी म्हणून टाकतोय मी ह्यात तोतापुरी, केसर आणि मालगोवा (मालगोबा) ,आंबे वापरले आहेत, ह्याने जरा वेगळी चव येते अननसाच्या आणि आंब्याच्या फोडी करायच्या (सालं काढून).

मी बिचारा एक म्हातारा

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी बिचारा एक म्हातारा ती गेली देवाघरी आज बैसलों हसत एकटा या हास्यकट्ट्यावरी माती सरत चालली होती तरी जीव थकला नव्हता आजही थरथरत्या हातांना ओला स्पर्श हवा होता रोज यायची नटून थटुनी दिसायलाही होती बरी म्हाताऱ्याला हात पुरे तो कशाला हवी आता परी मी देखील नित्यनेमाने दात काढुनी हसायचो तिला हसताना बघून मात्र गुलाबी स्वप्नं बघायचो कधी कुलू तर कधी मनाली बेत ठरायचे मनात हसता हसता तिच्या कवळ्या पडल्या सर्व बेत गेले मसनात ========================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

शिकून काय झाले

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यास केला पण भोकात गेला शिकून काय झाले मोठ्या मोठ्या पदव्या मिळूनही ओझे तसेच राहिले लहानपणी मी खिडकीतून मुले खेळताना बघितली हाती पुस्तक धरूनही वीतभर फाटत राहिली साहेब साहेब करूनहि माझे कल्याण नाही झाले पुस्तक माथी मारूनही माझे बालपण हरवले आज छकुला निरागसपणे अहोरात्र खेळत राहतो मी मात्र इथं कामावरती दिवसभर चोळत राहतो चोळण्यासाठी जन्म नव्हे हा हे कळतेय मजला आज स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी अंगी असावा लागतो माज ============================= सिद्धेश्वर विलास पाटणकर

'माया': एक झुंजं संसाराशी!-अंतिम भाग

लेखक सुहास चंद्रमणी बारमासे यांनी गुरुवार, 03/06/2021 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
.........मायाचा छोटा भाऊ 'प्रभाकर' आयुर्वेदामध्ये 'डॉक्टर' होता. त्याला आपल्या दाजींचे दारूचे व्यसन माहित होते. त्याच्याकडे दारू सोडवण्यासाठी काही जालीम औषध होते. 'प्रभाकर' माया ला भेटायला आला आणि औषधाबद्दल मायाला सांगितले. "पण हे औषध द्यायचं कसं दादू?" मायाने विचारले."औषधांच्या गोळ्याची भुकटी करायची आणि खाण्याच्या पदार्थामध्ये द्यायची! जेव्हा दाजी दारू पितील तेव्हा दारूसोबत या गोळ्यांची रासायनिक प्रक्रिया होते आणि उलट्या सुरू होतात. असे दोन-तीनदा झाले की दारू पिणारा माणूस दारू प्यायला घाबरतो.

बुडता आवरी मज (ऐसी अक्षरे...मेळवीन -३)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 03/06/2021 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक :बुडता आवरी मज लेखक:सुरेंद्र दरेकर . जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते.आणि खरोखरच बुडता आवरी मज हे पुस्तक माझ्या वाचनाला समृद्ध करणारे खासच ठरले .निर्मोही अध्यात्म,तत्वज्ञान,विज्ञान,मानवी संवेदना व अनुभवांची कथेद्वारे सांगड या माझ्या आवडत्या सर्वच बिंदुना हे पुस्तक लिलया स्पर्शून जाते. पुस्तकामध्ये ‘बुडता आवरी मज’ आणि 'पॉईज’ या दोन दीर्घकथा समाविष्ट आहेत.दोन्ह