
ह्या रेसिपी चा ईजाद ५० वर्षांपूर्वी, कुंदापूरा मधल्या शेट्टी लंच होम मध्ये झाला असे म्हणतात). कुंदपुरा मंगळूर पासून साधारण ९० किमी वर आहे म्हणून बहुदा ह्याला मंगलोरी घी रोस्ट पण म्हणत असावे.
ह्यात खरी मज्जा आहेत ती अर्थात तुपाची आणि त्या लाल रंगाची. दिसायला एकदम जाळ पण चवीला मात्र अतिशय सुंदर!
साहित्य
चिकन मॅरीनेट
५०० ग्राम चिकन तुकडे करून
४ चमचे घट्ट दही
१ चमचा लिंबाचा रस
१/२ चमचा लाल तिखट (काश्मिरी)
१/२ चमचा हळद
१/२ चमचा मीठ
१०/१२ ब्याडगी लाल सुक्या मिरच्या
२ चमचे धने
१ चमचा जिरे
१ चमचा बडीशेप
१०-१२ काळीमिरी
४-५ लवंग
१०-१२ लसूण पाकळ्या
१ छोट्या लिंबाच्या आकाराची चिंच
१/४ वाटी तूप (घरचं असेल तर उत्तम)
१५-२० कढीपत्त्याची पानं
चवीनुसार मीठ
कृती
चिकनला तिखट, हळद, दही, मीठ लावून किमान १ तास मुरत ठेवावे.
मंद आचेवर तव्यावर आधी लाल मिरच्या, आणि मग इतर खडे मसाले जळणार नाहीत असे २/३ मिनिटे भाजून/शेकवून घ्यावे.
मिरच्या आणि खडे मसाले, लसूण आणि चिंचे सोबत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे, लागेल तसे पाणी वापरून.
पॅन मध्ये तूप गरम करून, त्यात चिकन १०/१२ मिनिटे (५०% शिजेल इतपत) परतून घ्यावे.
चिकन चे तुकडे बाजूला काढून त्याच तुपात आता वाटलेला मसाला घालून तो परतून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटत आलं की पॅन मध्ये चिकनचे तुकडे घालून पुन्हा परतून घ्यायचा आहे, चिकन शिजेपर्यंत. (लागलं तर थोडंस पाणी घालावं, पण ह्याला रस्सा नसतो त्यामुळे खूप पाणी नको). चवीनुसार मीठ घालून, मग एक चमचा तुप गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं घालून ती फोडणी/पानं वरून घालावी..
गरम पोळी किंवा भातासोबत मस्त लागतं.

प्रतिक्रिया
कातिल
कहर
वाह !
धन्यवाद सर!
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्तच
पाकृ आणि सादरीकरण
धन्यवाद!
In reply to पाकृ आणि सादरीकरण by वामन देशमुख
@केडी
In reply to धन्यवाद! by केडी
चिंचेचा कोळ नाही चिंच घालायची
In reply to @केडी by वामन देशमुख
खूपच छान
क्काय!!
मस्तच!
तोंपासूपाकृ
पाहुनी चिकनच्या पाककृती,
प्लीज ट्राय
In reply to पाहुनी चिकनच्या पाककृती, by अत्रुप्त आत्मा
छान पाककृती