Skip to main content

सिलींडर ३

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 21/07/2021 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ३ ( विशेष सूचना: या कथेतील मी ,सिलिंडर व टेम्पो वगळता,इतर पात्रे व प्रसंग पूर्णपणे काल्पनिकआहेत) सरळ चाललेला टेम्पो ,अचानकतालखेड गावाकडे वळला.'अरे हे काय'?इकडे कशाला,सरळ जायचंय नं?'मी विचारले.' "तालखेडला सामान खाली करायचंय आणि एक भाडं आहे वकील साहेब,जास्त वेळ नाही,दहा पंधरा मिनिटं लागतील.''दात विचकत त्याने टेम्पो पुढे दामटला.मी दात खात बसलो. टेम्पो गावात शिरला. आधी एका दुकानावर सामान  उतरवले.आता फक्त सिलिंडर राहिले.

उठो द्रौपदी, वस्त्र संभालो, अब गोबिंद ना आयेंगे|

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी मंगळवार, 20/07/2021 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
एका कथा स्पर्धेत मी भाग घेतला होता. आयोजकांनी पहिल्या काही ओळी दिलेल्या होत्या त्या तशाच्या तशा सुरवातीला वापरून पुढे कथा रंगवायची अशी स्पर्धा होती. शब्दांचीही मर्यादा होती. कथेचं शीर्षक आपणच ठरवायचं होतं. अटलजींच्या एका सुरेख कवितेचं नाव मी शीर्षक म्हणून वापरलं आहे. सुरवातीच्या बोल्ड इटॅलिक्समधल्या ओळी आयोजकांनी दिलेल्या होत्या. दुसरं बक्षीस मिळालं त्या अर्थी कथा बरी जमली असावी. ही तुमच्यासाठी . . . .

तिची वारी

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 20/07/2021 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
मानसीची बदली होऊन ती नवीन गावी आली होती.ऑफिसचा पहिला दिवस होता.शाखाधिकारी कडून काम समजून घेऊन मानसी लगबगीने तिच्या केबिनमध्ये शिरली.प्रसन्न दरवळ खोलीभर पसरला होता.समोर मोगऱ्याची फुले एका फुलदाणीत सजवली होती.हळू हळू मानसी कामात व्यस्त होऊ लागली. तोच आवाज आला “चहा की कॉफी?काय आणू madam?” मानसीने समोर पाहिले .तीस वयोगटातील एक सामान्य अंगकाठीची, गुलाबी गणवेशाची साडी नेसलेली,कपाळावर मोठी टिकली ,गळ्यात तुळशीची माळ घातलेली सावळी मुलगी उभी होती. ”चहाच चालेल,पण तुमच नाव?”मानसीने प्रश्न केला. “नंदा ,मला सगळे नंदा मावशीच म्हणतात इथे.आता आणते चहा” असे म्हणून नंदा बाहेर गेली. नंदा तिथली मदतनीस होती.चुणचुणी

सिलींडर २

लेखक नीलकंठ देशमुख यांनी मंगळवार, 20/07/2021 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर २ सुरुवातीचा प्रवास साधारण रितीने,ब-यापैकी झाला. म्हणजे टेम्पो आपला,आपल्या गतीने  चालला होता.टेम्पोचा वेग लक्षात घेता 'चालला'होता म्हणणेच योग्य.अंदाजे अर्ध्या तासानंतर,रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पटकाधा-याने हात दाखविला.टेम्पो थांबला.म्हणजे ड्रायव्हरने थांबवला.पटकाधा-याला जवळच्या  गावाला जायचे होते.तो एकटा नव्हता.सोबत दोन शेळ्या होत्या. ड्रायव्हरने उदार अंतःकरणाने त्या सगळ्यांना टेम्पोच्या मागील भागात सामावून घेतले.आणि आपल्या खिशात काही नोटाही.टेम्पो पुढे निघाला.वाटेत मधून मधून लोक हात दाखवत .ड्रायव्हर  टेम्पो थाबंवे.ड्रायव्हर आणखी कांही पॅशींजरना सामानासहीत टेम्पोमधे,

विठ्ठल नाम

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 20/07/2021 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
अभंगाची गोडी चिपळाची जोडी विठ्ठल नाम माळी भक्ती फुले भाबडी... अगम्य भिंती तोडी शरीर झोला सांडी चराचर चैतन्य बहू मना सुख जोडी... वेल वाढती वाकडी शोधे आधार बापुडी नाही बांडगुळ हे जाण तू बांध नामाची झोपडी... वाट पाहून थकली येईल मोक्ष कावडी रोज रोज का मग डोळ्यांत सूर्य बुडी... -भक्ती

विठुराया.....

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 20/07/2021 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
विठुराया.... तुझ्या प्रेमामृताच्या वर्षावात नित्य न्हाऊनही, कोरडीच राहिली काया.... मन विषयी गुंतले निरंतर, सोडवेना कधी माया... क्षणामागून क्षण संपले, जीवन जातसे वाया... पश्चात्तापे मन तप्त, लाभो तुझी छाया... आता लागो तुझे ध्यान, पडतसे मी पाया... नको दूर लोटूस मजला, विनविते तुज विठुराया...!! जयगंधा.. ९-११-२०१४.

आयुष्याचा परिघ समजून घेताना

लेखक चंद्रकांत यांनी सोमवार, 19/07/2021 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात. आयुष्याचा विस्तार काही आपल्या हाती नसतो, पण त्याचा परीघ समजून घेणं शक्य असतं. त्याची लांबीरुंदी किती असावी हे आपल्या हाती नसलं, तरी कोण्या नजरेला अधोरेखित करता येईल एवढी खोली देता येणं संभव आहे.

सिलींडर १

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 19/07/2021 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर १ अंदाजे चाळीस वर्षे झाली असावीत.किंवा एकोणचाळीस.कदाचित एक्केचाळीस पण. नक्की आठवत नाही. नुकताच वकील होउन बीडला वकिली सुरू केली होती.आईवडील गावी असत.मी अविवाहीत.बीडला काकांकडे होतो.

स्वप्नं

लेखक Gayatri Gadre यांनी सोमवार, 19/07/2021 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी अजून दोन फेरीवाले येऊन गेलेत, स्वप्नं विकायला. आठवड्यातले चौथे फेरीवाले. या सगळ्या फेरीवाल्यांना माझा पत्ता कोण देतंय याचा शोध घेतला पाहिजे. आजकाल प्रमाणाबाहेर वाढलेत. स्वप्नं तशी बरी होती, ताजी नव्हती. पण आजकाल ताजं स्वप्नं मिळतंय कुठे म्हणा. सगळी शिळीच, नवेपणाचा लेप चढवलेली, नवीन रंग किंवा सुगंधाचा फवारा मारलेली. आणि क्वचित कधी ताजं स्वप्नं आलंच बघण्यात तर लगेच मनात शंका दाटून येतात, ते विकणारा फसवत नाही कशावरून? एकंदर काय, स्वप्नांचा व्यवहार दिवसेंदिवस कठीणच होत चाललाय. डोळ्यात तेल घालून चिकित्सा करावी लागते. नाहीतर पदरचा वेळ खर्च केल्यावर लक्षात येतं फसवणूक झाली म्हणून.

डोक्याला शॉट [षष्ठी]

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 17/07/2021 02:49 या दिवशी प्रकाशित केले.
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!