Skip to main content

हतबल

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 08/06/2009 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका क्लायंटला भेटायला म्हणुन "द लीला" च्या लॉबीत वाट बघत बसलो होतो. समोरच्या कोचावर एक बापलेक बसले होते. बडी असामी असणार ! पोरगी बापाला म्हणाली "डॅडी, ये बॉयफ्रेंडभी छोडके गया मुझे! " मला धक्काच बसला. ती चक्क पित्याला सांगत होती ही गोष्ट. अजुन मोठा धक्का पुढे होता, बापाची प्रतिक्रिया होती, "सो व्हॉट?". पण आवाज जरी निर्विकार असला तरी डोळे काही वेगळंच सांगत होते. त्याचे डोळे पाहून जे सुचलं ते हे.... डॅड, आय लॉस्ट माय सिक्स्थ बॉयफ़्रेंड! ती थुलथुलीत षोडशा, वैतागलेल्या चेहेर्‍याने, आणि वाढलेल्या पोटाने ..... आपल्या बापाला सांगत होती ! सो व्हॉट डिअर? लिस्ट संपली का तुझी? माझ्या एच.आर.

बाप

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 08/06/2009 08:20 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, तुमचे आय्.टी बद्दल काय मत आहे?" मला एक पालकांनी विचारले. ह्यांच्या चिरंजिवाना १० वी त माझी मदत झाल्याने ९०% मार्क मिळतील अशी खात्री होती. " अहो, रिझल्ट लागु दे मग बघु." मी "मी त्याला आय्.टी डीप्लोमा ला वी.जे.टी.आय ला घालायचे ठरवले आहे. डीप्लोमा करेल आणि मग डीग्री ला जाईल. मग ददात नाही." पालक " हा निर्णय घेताना तुम्ही मुलाला विचारलय का"? मी "त्यात काय विचारायचे, बाप म्हणुन हा निर्णय मी घेतला आहे. आज जरा मंदी आहे म्हणुन आय्.टी डाउन आहे. पण येत्या सहा वर्षात परत वर येईल ह्याची खात्री आहे मला. तुम्हाला काय वाटते? " मी नॉस्ट्रॅडेमस नाही हो.

एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

लेखक ॐकार यांनी रविवार, 07/06/2009 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे. ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/ सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php प्रवेश - http://www.ejioji.com/ नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे.

बडीशोप सरबत

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 07/06/2009 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी बडीशोप ( कच्ची ) , २ वाट्या साखर , मीठ , पाणी. कृती: बडीशोप १ वाटीभर पाण्यात २ तास भिजत ठेवावी , साखर २ वाट्या पाण्यात विरघळवून घ्यावी. बडीशोप मिक्सर मधून वाटून घ्या (पाण्यासकट) पूर्णपणे वस्त्रगाळ करून घ्यावी. मग साखरेच्या पाण्यात मिक्स करावे. आणि सर्व्ह करताना १ भाग मिश्रणात ४ भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून सर्व्ह करावे.

असे पाहुणे येती, आणिक स्मृती ठेऊनी जाती...

लेखक सुबक ठेंगणी यांनी रविवार, 07/06/2009 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मि. पा च्या मेटामोर्फसिसच्या काळात हा लेख गहाळ झाला होता. तो आता प्रतिक्रियांसकट इथे चिकटवत आहे. आतापर्यंत किडे ही फक्त करायची गोष्ट आहे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण जपानला आल्यावर आपण आजपर्यंत करत आलो त्याला ’किडे करणे’ हे नाव किती सार्थ आहे हे कळून चुकलं एवढे विविध किडे पाहिले. इथल्या माणसांवरून इथल्या किड्यांच्या आकाराची कल्पना कृपया करू नये. म्हणजे इथली माणसं (सुमो सोडल्यास) अगदी सुबक ठेंगणी कॅटेगरीतली असली तरी किडे मात्र गुटगुटीत आणि बाळसेदार असतात. असतात.

काव्य

लेखक केशवसुमार यांनी रविवार, 07/06/2009 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अजय जोशी यांची रचना प्रेम वाचकाला वाचताना कष्ट झाले पाहिजे त्याचसाठी फक्त.. करता काव्य आले पाहिजे मी लिहावे की नको हा प्रश्न मग उरतो कुठे? अर्थ ओळींचे कशाला ते... कळाले पाहिजे! 'कान' हा पकडू 'नका' अपुलाच पहिल्या वाचनी जाणण्या हे.. काव्य थोडेसे कळाले पाहिजे तेल डोळा घालुनी ते वाचकांना सांगती.. रत्न जाली यायच्या आधी पळाले पाहिजे! मी विडंबन पाडण्याला नेहमी आतूर पण.. चांगले मज.. काव्य एखादे मिळाले पाहिजे! जोडले मी हात "केश्या" काव्य लिहिण्याला तुझ्या... कोपर्‍या पासून मेल्या का जुळाले पाहिजे?

आठवणींची निर्मिती.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/06/2009 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली, "काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?" मी म्हणालो, "त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय." मला म्हणाली, "आज आमच्या घरी "पॉटलक" आहे." "म्हणजे ग काय?" ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते.

राधिका

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/06/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णसख्याची प्रीत राधिका सूर कन्हैया, गीत राधिका श्यामल करि अलगूज होउनी स्वरपुष्पे उधळीत राधिका नंदनंदनासंगतीत जणु रासरंगसंगीत राधिका श्रावणघन घननीळ बरसतो कदंबतळि झेलीत राधिका चंद्रसजण मुरलीधर गगनी, चांदणकण वेचीत राधिका मुकुंदकंठी वैजयंति, शिरी मोरमुकुट निरखीत राधिका देवकिनंदन झुलवित झूला, रोमांचित, पुलकीत राधिका देह श्याम अन् प्राणहि श्यामच, जणु अद्वैत, पुनीत राधिका जन्मजन्मिची सखी, हरीचे पूर्वजन्मसंचीत राधिका
Taxonomy upgrade extras