Skip to main content

अश्वत्थ

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 24/06/2009 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या कोरड्या डोळ्यात आता नुरला विश्वास शांत घरातली भासे खिन्न ओसरी उदास झाले कवाड पोरके नाही अंगणाची साथ चुडा भरल्या हातात बूजगावण्याचा हात अश्वत्थाच्या झाडावर किती पक्ष्यांची घरटी पारावर हिंडणारी बघ साळुंकी एकटी खोली भरून दाटला खुळा अंधाराचा जीव बाहेरचा कव डसा शोधी जमिनीचा ठाव वारा झपाटून आला होई क्षणात बेभान स ळ स ळू न उठते पिंपळाचे पान पान

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 24/06/2009 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
"बापाने यावं आणि दोन सणसणीत कानशिलात ठेऊन द्याव्यात असं आजही कुठेतरी वाटतं!" त्याचं काय झालं मंडळी,सौ. अनुराधा सचिन म्हापणकर ह्यांनी ही खालील कविता लिहिलेली माझ्या वाचनात आली, आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. वा.. बेटा .. वा..!! आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. पुन्हा पुन्हा डोळे भरून येतात.. तू मात्र डोळ्याला डोळाही देत नाहीस असं रे काय.. निघता निघता.. साध्या आशीर्वादालाही वाकत नाहीस का आशीर्वादाच्या हक्कापासूनही आम्हाला तू तोडलंस वा..बेटा..वा..आज तू आमचं सारं ऋण फेडलंस.. नव्हतं पटतं मान्य.. कदाचित आमचंही काही चुकलं असेल आमची लूडबूड..

शताब्दी - अर्थशास्त्राच्या प्रकाशनाची

लेखक विकास यांनी बुधवार, 24/06/2009 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
(इमेल वरून एका आलेल्या आणि त्या इमेलच्या वेधक मथळ्यामुळे सुदैवाने वाचल्या गेलेल्या एका लेखाचे हे स्वैर आणि संक्षिप्त भाषांतर.) १८९१ साली म्हैसुरच्या महाराजाने राणि व्हिक्टोरीयाच्या सन्मानार्थ "व्हिक्टोरीया ज्युबिली इन्स्टीट्यूट" नामक एक वास्तू म्हैसुरमधे बनवली. विविध संस्कृतीतील वास्तुशास्त्रांचे मिश्रण केलेली ही इमारत वेगळ्याच घाटणीतील तयार केली गेली आहे. या वास्तू मधे अनेक भुर्जपत्रांवरील लेखन विविध ठिकाणाहून आणून साठवले गेले होते. त्या काळात त्याला ओरीएंटल रिसर्च लायब्ररी म्हणायचे आता तीला ओरीएंटल रिसर्च इन्स्टीट्यूट म्हणतात.

"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 23/06/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"पाकिस्तानी अण्वस्त्रे आमच्या हाती पडली तर ती आम्ही अमेरिकेविरुद्ध वापरू" - अल् कायदा
ही मुलाखत कांहीं CNN सारख्या उतरती कळा लागलेल्या (Decadent) पाश्चात्य वृत्तसंस्थेवरील मुलाखत नसून "अल् जझीरा" या अरबी वृत्तसंस्थेने घेतलेली मुलाखत असून ती कालच (२१ जून ०९ला) अल् जझीरा चॅनेलवर प्रसारित झाली. अल्-कायदा या संघटनेचा ओसामा बिन लादेन व आयमान जवाहिरी यांच्यानंतरचा तिसर्‍या क्रमांकाचा नेता मुस्ताफा अबुल-याझीद यांनी अल् जझीराला सांगितले कीं पकिस्तानी अण्वस्त्रे जर ’अल्-कायदा’च्या हाती आली तर ते ती अण्वस्त्रे अमेरिकेच्याविरुद्ध वापरायला मागे-पुढ

पावसाची गाणी

लेखक अनंत छंदी यांनी मंगळवार, 23/06/2009 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पाऊस सुरू झालाय. वाटतं अशावेळी माथेरान, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं. वस्तीपासून जरा दूर एकांत स्थळी असलेल्या एखाद्या व्हिक्टोरियन शैलीतील लॊजच्या एका कोप़रयातील सुट्च्या गॆलरीत मस्त आरामखुर्चीत पहुडावं, समोरची हिरवाई धुक्याचे झिरझिरीत वस्त्र ल्यायलेली असावी. सायंकाळच्या त्या वेळी हवेतील गारठा अंगावर घेतलेल्या शालीशी लगट करीत असावा. बाजूच्या टेपरेकॊर्डरमधून मस्तपैकी गुलाम अली किंवा मेहदी हसनचे सूर पाझरत असावेत. हातात सोनेरी छटा धारण करणार्या वारुणीचा ग्लास असावा. पाऊस आला की त्याची मजा अनुभवण्याचा हा मार्ग मला आवडतो. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही.

पहिले पाढे पंचावन्न!

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 23/06/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
अन्वयचा बाळकडू वरचा लेख वाचला आणि परवाची गोष्ट आठवली ती लिहावी म्हटले. ------------------------------------------------------------------- हा आठवडा चिरंजिवांच्या ह्या शालेय वर्षाचा शेवटचा आठवडा. शनिवारपासून सुट्टी सुरु होईल आणि थेट सप्टेंबरात शाळा उघडेल तेव्हा मुलगा पहिलीतून दुसरीत जाईल. परवाची गोष्ट, मुलाला टेबल्स करुन द्यायचे मनात आले, टेबल्स म्हणजे पाढे. म्हटलं त्यालाच लिहायला लावूयात म्हणजे अनायसे लिहूनही होतील. क्रिएटीविटी चं भूत डोक्यात ना! मनाशी कल्पना घोळवत होतो काय करावे.

माझी भटकंती - कशुमा लेक ( Cachuma Lake )

लेखक भाग्यश्री यांनी मंगळवार, 23/06/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
"माझी भटकंती" या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं.. त्यामुळे पर्याय कमी जरी नसले तरी दुर्मिळ/कमी-प्रसिद्ध पर्याय शोधावे लागतात.. senyum बर्‍याच दिवसांपासून खास मीना प्रभू स्टाईल फिरण्यासाठी ( म्हणजे लिखाणासाठी फिरणे.. :) ) जागाही शोधून ठेवली.. मात्र जाणं होईना! एकदाचे काल ठरले..