Skip to main content

आभाळ ..

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 30/06/2009 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळोनी यावे .. आभाळ आज वाटे ओसंडोनी जावे अन् .. जळं साचलेले | गुंफलेली माला जणू .. व्हावे त्या सरींनी ओघळलेले मोती व्हावे .. थेंब पावसाचे | चमचमत्या किरणां सवे .. इंद्रधनू रेखावे शीळ घुमावी वार्‍याची .. हिरव्या, ओल्या बना मधे | सळसळत्या पानांतूनी .. संगीत नवे जन्मावे रंग रंगी, सुरेल कंठी .. खगांनी मग ते गावे | रंगीत-गंधीत धात्रीने .. साज सुखाचे ल्यावे मेघश्याम आभाळ तीला .. क्षितीजावर भेटावे |

चिल्ड्रन ऑफ हेवन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 30/06/2009 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही. बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते. अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 30/06/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे. तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही. पण तरी तात्यांनी म्हटल्यासारखे हे खरेच जाणवते, की आपल्या शरिरात एकाप्रकारची लय असते.

मी नारकर

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 30/06/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात प्रथमच हातात कॅमेरा नसल्याचे वैष्यम वाटले. जून २४ ते डीसेंबर २४ ह्या कालावाधीत बायको डोळ्यात तेल घालुन पहारा ठेवते. बेसीन वरचे ओडोमॉस, आफ्टर शेव क्रीम गायब होते. फक्त टुथ पेस्ट असते. मोज्याच्या गाठी मारुन ठेवल्या जातात. टीवी चा रीमोट लपवला जातो. टॉयलेट फ्लश झाले आहे की नाही ह्याची खात्री केली जाते. जाताना रुमाल्,मोबाईल्,छत्री परत आणा ची आठवण केली जाते. 'जेवलात का' चा फोन न चुकता असतो. अशाच एक सकाळी श्री श्री श्री तात्या महाराजांचा फोन आला. " मास्तर, आपल्याला ह्या भानगडीतले && काही कळत नाही. मी पडलो रांगडा माणुस. माझ्या कडे एक केस आहे. तुमचे क्षेत्र आहे.

आजच्या शिक्षणसंस्था

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 29/06/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या शिक्षणसंस्थांचे खरे रुप सुज्ञ वाचकांसमोर यावे हा हेतू या काकू मागे आहे. (कोठे कर्मवीर आणि कोठे आजकालच्या शिक्षणसंस्था ) नुकतीच नाशिक येथील एका 'विद्यामंदिर' या संस्थेत शिक्षक-शिक्षकसेवक (प्राथमीक+शालेय्+महावीद्यालयीन)या पदांच्या काही जागा भरावयाच्या असल्याची जाहीरात वर्तमानपत्रात आढळली. या पदांसाठी त्यांनी नोकरी अर्ज विक्रीला ठेवले आहेत. ज्या कोणाला या पदांसाठी अर्ज करायचे असतील त्यांना या संस्थेचा 'छापील अर्ज' रु. १००/- मोजुन घ्यावा लागेल आणि तो सुद्धा रोख पैश्याच्या स्वरुपात नव्हे तर "पोस्टल ऑर्डर" देवुन मगच. आता या सगळ्या कारभारात काही प्रश्न उद्भवतात. १.

नांदी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशी जलद जलद नाचू लागले आषाढसरी, मन माझे न्हाऊ लागले! दरवळ तो मातीचा मनास मोहवी वर्षेचे कंजन, बघ कानी गुंजू लागले! मग खेळणे वर्षेच्या धारांशी वार्‍याचे मनात आगळे, अलगुज छेडू लागले! संपले बघ वाट पाहणे ते चातकाचे आनंदविभोर, मोर वनी नाचू लागले! रोमांचित जाहली बघ तृषार्त धरा नग्ननिखळ, हास्य तिचे फुलू लागले! विशाल

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १६

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 29/06/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

झणझणीत सुकं मटण

लेखक दिपाली पाटिल यांनी सोमवार, 29/06/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आता बरेच लोक म्हटले की या दिपाली ला फक्त गोड च पदार्थ येतात की काय? मला येतात सगळे प्रकार बनवता पण मी ऐकलं आहे की माझ्या पाकृ (उदा: खानदेशी शेव भाजी) कोणीतरी कुठल्यातरी पेपरात छापली होती तेही अगदी त्याच फोटो सोबत आणि तेही मला न विचारता..