Skip to main content

बजेट ब्लुटूथ हेडफोन्स खरेदी २०२१

लेखक कंजूस यांनी शनिवार, 07/08/2021 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
बजेट ब्लुटूथ हेडफोन्स खरेदी २०२१ खरडफळ्यावर याबद्दल चर्चा झाली . तिथले प्रतिसाद इकडे कॅापी करता येत नाहीत कारण ते मिपाधोरणाविरुद्ध आहे. त्यामुळे मुख्य मुद्दे लिहीत आहे.

विश्वामित्र आणि विषाणू

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 07/08/2021 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सुरक्षित अश्या प्रयोग शाळेत विश्वामित्र विषाणू निर्मितीचा प्रयत्न करत होता. तो अचानक ओरडला युरेका-युरेका, विषाणूला निर्मित करण्यात मी सफल झालो. नारायण- नारायण या आवाजानी त्याची तंद्रा भंग झाली. त्याने मागे वळून पाहिले आणि म्हणाला नारदा! इथे टपकायचे कारण काय. तुला दिसत नाही मी किती व्यस्त आहे. अरे वा! तू मला पाहताच ओळखले, नाही तर बाकी लोकांना मी वीणा दाखविली तरी त्यांच्या विश्वास बसत नाही. चमत्कार करून दाखवावा लागतो, तेंव्हा त्यांना माझी ओळख पटते. भारी हुशार आहे तू. कसे ओळखले तू मला? या गुप्त जागेची माहिती कुणालाही नाही.

प्यायला पाहिजे!

लेखक अजिंक्यराव पाटील यांनी शनिवार, 07/08/2021 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
कसेतरी कुठेतरी जगायला पाहिजे म्हणूनच थोडीतरी प्यायला पाहिजे! हजारो उठतात या अंतरंगी वेदना, वेदना विसरायला प्यायला पाहिजे! हजार प्रश्न लाखो चिंता, हजारो कारणे, साऱ्यांना एक उत्तर प्यायला पाहिजे! नकोशी कुणा असते उन्मनी अवस्था कधीतरी कारणाविना प्यायला पाहिजे! पडो कुणी प्रेमात, डोळ्यात जावे गुंतुनी.. वारुणीच रमणी आम्हा प्यायला पाहिजे! वोडका, रम ब्रँडी स्कॉच वा असो व्हिस्कीही, दर्जा सांभाळून मात्र प्यायला पाहिजे! घडीभर सुख हे मजबुरी होऊ नये, तिने नव्हे आपण तिला प्यायला पाहिजे! -राव पाटील
काव्यरस

कहाणी महापुराची - माझ्या नजरेतून (भाग 4)

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 06/08/2021 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुढचा दिवस उजाडला. आज मामु चा दौरा होता. क्षणात अंतू बरवा आठवला. अक्षरशः भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होती. चिपळूण मध्ये फक्त एक पेट्रोल पंप चालू होता. बाकी पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने बंद होते. चिपळूण ला येणारे रस्ते , घाट बंद झाल्याने पेट्रोल चे टँकर पण 3 4 दिवस येत नव्हते. त्यामुळे 3 ते 4 तास रांगेत उभे राहून फक्त 50 रुपयाचे पेट्रोल मिळत होते. त्यातही चारचाकी साठी नाहीच. मदतीला शेजारील गावांतून गाड्या घेऊन यायचं तरी पंचाईत व्हाययाची वेळ यायची. मुख्य चिपळूण शहरात साफसफाई साठी पाणीच उपलब्ध नव्हते. पिण्यासाठी पॅक बाटल्या मदत म्हणून येत होत्या.