Skip to main content

(लिहावे कुठे)

लेखक चेतन यांनी सोमवार, 01/02/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
जयवी ताईंची सुंदर 'रुतावे कुठे' गझल वाचली आणि विडंबनाची कंड जाणवली ;) माझा एक प्रयत्न न कवीस कळले लिहावे कुठे कविता कुठे अन् चर्चा कुठे उशाला ठेवली रात्री पुस्तके तरी घुसते का ज्ञान डोक्यामध्ये कुठे ठरवुनी जमावे अश्रु लोचनी मालिका बघुनी रडावे कुठे मनी वंचना, हास्य गालावरी अशा बोलण्याने फसावे कुठे पुरस्कार पाहुनी थकलो अता नव्या 'पद्मा' ची पातळी कुठे हिमेशी नाक चोंदले का कधी नाकातुनी गाणे ऍकवावे कुठे सुरा पिउनी चालवणे गुन्हा किती निष्पाप ही मारावे कुठे विडंबनाने कोपला कवी जर का विडंबकाने मग पळावे कुठे चेतन

उर्मिला धनगर विजयी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 01/02/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
झी च्या सारेगमप स्पर्धेमधे उर्मिला धनगर विजयी..... महागायिका उर्मिला धनगर हिचे हार्दिक अभिनंदन......... :P :P :P :P :P

रुतावे कुठे

लेखक जयवी यांनी सोमवार, 01/02/2010 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
न काट्‌यास कळले सलावे कुठे रुतावे कुठे अन्‌ दुखावे कुठे विषाला अता या उतारा नको कळे पूर्ण त्याला भिनावे कुठे बरसता जमावे तळे लोचनी असे पापण्यांनी झरावे कुठे उरी वेदना, हास्य गालावरी अशा सोसण्याचे पुरावे कुठे तिरस्कार झेलून थकलो अता अशा गुंतण्याचे निभावे कुठे तुझे चांदणे गोंदले या नभी निशेच्या नशेने वहावे कुठे सुरांनी तुझ्या कोसळावे पुन्हा असे श्वास द्यावे नि घ्यावे कुठे अवेळी कसा लोपला सूर्य हा रित्या अंबराने लपावे कुठे जयश्री अंबासकर

रांगोळी

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीचा दिवस. माझं देवघर अगदी छान सजलेलं. देवासमोर बसून नवरा साग्रसंगीत पूजा करतोय. त्याच्या मागे छोट्याछोट्या आसनांवर मुलं बसली आहेत...किंवा शांत बसून रहायचा प्रयत्न करताहेत. मुलीचं लक्ष तिच्या चमचमत्या घागर्‍याकडे अन हातातल्या हैद्राबादी बांगड्यांकडे आहे तर मुलगा त्याच्या चुडीदार कुर्त्यावरची... म्हणजे त्याच्या भाषेत 'शाहरूख खान ड्रेसवरची' नक्षी निरखून बघतोय. नाकातली नथ नि अंगावरची पैठणी सावरत माझीही लगबग सुरू आहे. पूजा आटोपली तशी नवर्‍यानं प्रसादाचं ताट आणायची खूण केली.

माझं गाडीपुराण

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
दहा वर्षांपूर्वी, नवर्‍याचं अमेरिकेला 'सह' यायचं नक्की झालं नि तर्‍हेतर्‍हेच्या शेर्‍यांना, सल्ल्यांना जणू ऊत आला. 'नशीब काढलं हो पोरीनं...' ( म्हणजे? भारतात संसार करणारे सगळे फुटक्या नशिबाचे की काय?) 'आता काय, मज्जाच मज्जा तुमची...तिथे सारी कामं रोबोट करतात म्हणे.( हा रोबोट म्हणजे मीच हे इथे आल्यावरच कळलं.) 'पोरीचा पायगुण चांगलाय हो. घरात आल्याआल्या नवर्‍याचं नशीब उघडलं.' (इति मायकेवाले) 'अहो, पायगुण वगैरे काही नसतो हं बायकोचा. उलट त्याच्या नशिबानं हिला सुख मिळतंय.' (हे वाक्य कोणाचं हे सांगायलाच हवं का?) 'हं... तशीही तिला नटायमुरडायची आवड... आता काय..

...म्हणून सासू ही 'आई' होऊ शकत नाही!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 31/01/2010 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
सासू ही 'आई' का होवू शकत नाही? या विषयावरील उद् बोधक, विचारप्रवर्तक, खमंग आणि राष्ट्रीय हिताची चर्चा वाचली. छान वेळ गेला. त्या विषयाची चेष्टा किंवा विडंबन म्हणून नव्हे, पण एक गंमत म्हणून काही विचार आणि उत्तरे सापडली. बघा, पटताहेत का! सासू ही आई होऊ शकत नाही, कारण... १. तिच्या घरात सून आलेली असते. त्यामुळे सासू-सासर्‍यांना म्हणावा तेवढा एकांत मिळत नाही. २. जनरली, सुनेने लवकर `आई' व्हावे, अशी समस्त सासवांची अपेक्षा असते. ३. या वयात `आई` झाल्यास लोक काय म्हणतील, अशी भीती असते. ४. या वयात हॉस्पिटलच्या वार्‍या नि खर्च परवडणारा नसतो. ५.

माझी अगतीकता

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/01/2010 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझी अगतीकता अगदी सकाळी मी उठलो, उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो. तर काय सांगत होतो मी...

नटरंग आणि आमचं शंके़खोर मन

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 31/01/2010 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे शंकेखोर मन घेऊन आम्ही सहसा मराठी बोलपट पाहाण्यास जात नाही, कारण मनास फार (कु)शंका पडतात, आणि त्यामुळे आम्हांस फार तसदी होते, असा आमचा नित्य अनुभव आहे. तरीही मराठी भाषा-संस्कृतीवरील प्रेमापोटी आणि सर्वांच्या स्तुतिसुमनांमुळे आम्हांस मोह झाला आणि आम्ही ते धाडस अखेर केले. आता आम्हांस पडलेल्या या काही शंका... टिप्पणी १: आम्ही करमणूकप्रधान बोलपट (उदा: गोविंदा वगैरे) पाहावयास जाताना मेंदू नावाचा आमचा अवयव नेमाने घरी ठेवून जातो, पण उपरनिर्देशित बोलपटाने पारितोषिके वगैरे मिळवून गोविंदाच्या बोलपटांहून उच्च दर्जा प्राप्त केलेला असावा, असा आमचा कयास होता, त्यामुळे आमच्या मेंदूस आम्ही बरोबर नेले.

स्टार माझावर पाहा ’ब्लॉग माझा’चा पारितोषिक वितरण समारंभ !

लेखक देवदत्त यांनी रविवार, 31/01/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
हरभर्‍याच्या झाडावर चढून एक घोषणा: आत्ताच आलेल्या दूरध्वनी आणि विपत्रावरून असे समजले की आज (३१ जाने. २०१०) रात्री ९:३० वाजता स्टार माझावर ह्या पारितोषिक वितरणाचा एपिसोड दाखवण्यात येणार आहे. पहायला विसरू नका. :)