Skip to main content

मंगेश पाडगावकरांनी स्वतः 'पद्म' मागणे योग्य हाय का ?

लेखक बाबुराव यांनी रविवार, 31/01/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1389
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

''पद्म पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला पाहिजे. ज्या अर्थी मला इतके पुरस्कार मिळाले त्या अर्थी मी पद्म पुरस्कारासाठी पात्र आहे. अजुन एका योग्य व्यक्तीला मिळाला नाही हे मला माहित आहे, ती व्यक्ती म्हणजे मंगेश पाडगावकर ! परंतु नसेल दिला देणार्‍यांनी '' अशी प्रतिक्रिया बालकुमार साहित्य संमेलनात दिली होती.
कुणी प्रतिक्रीया दिली होती हे कळले नाही? कृपया पुन्हा सांगाल का?

In reply to by Nile

स्वत; मंगेशपाडगावकरानी प्रतिक्रिया दिली होती. बातमी सौजन्य : दै. लोकमत बाबुराव :)

पाडगांवकरांसारख्या मान्यवर व्यक्तीने असे पुरस्कार मागणे अजिबात पटले नाही. ********** भले तर देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

से॑फ अलि खान ल मिळालेला पुरस्कार पाडगांवकरांना नाहि मिळाले हे बरंच नाहि का....

एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाला जर पाडगावकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असेल की "नसेल दिला देणार्‍यांनी '' तर ते स्वतःहून मागणं कसं होतं बॉ? मला सन्दर्भच लागला नाही. पाडगावकरांनी फक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे कि अपणहून मागीतलाय? *************** आम्ही काय कुणाचे खातो तो राम अम्हाला देतो

मित्र हो. ही प्रसार माध्यमातून आलेली माहिती आहे.ती एकांगी वाटते. -'नसेल दिला देणाऱ्यांनी'- यामधून पाडगावकरांचा 'विषाद' तर नक्कीच प्रकट होत नाही. उलट 'मागणी केली'असा 'कांगावा' प्रसिद्धी माध्यमांनी करून त्यांचा टी आर पी वाढवायला केला होता. सूज्ञांनी समजून घ्यायचे असते. एका अन्य सुत्रात प्रकाश घाटपांड्यांनी प्रसारमाध्यामांच्या या हातखंड्या प्रयोगावर असेच स्वर आळवले आहे. त्याला माझी संमती आहे. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

In reply to by शशिकांत ओक

मित्र हो. ही प्रसार माध्यमातून आलेली माहिती आहे.ती एकांगी वाटते. कशाला एकांगी वाटती बातमी. नाधोम्हानोरांनी लई धुतलाय पाडगावकरांना. पेप्राचा दुवा सापडना आता. दुबैच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा धा जानेवारीला व्हणार व्हती. नवु तारखीलाच मी अध्यक्ष झालो मी अध्यक्ष झालो अशी बोंब आदरनीय कवी मारीत सुटले, आता का बोलाचं ? बाबुराव :)

परवा महानोरांचे लेखन वाचून फार फार धमाल आली होती... मोठे मोठे लेखक कवी मंडळी आंतरजालीय कट्ट्यावर भांडल्यासारखी पाहून परम संतोष झाला. पण आजच्याच पेपरात ( बहुतेक सकाळ्) तिथे प्रत्यक्ष हजर असणार्‍या एका माणसाचे निवेदन आले आहे, की पाडगावकर लहान मुलांनी इचारलेल्या प्रश्नांना गमतीगमतीत उत्तरे देत होते. ... त्यात ते असे म्हणाले होते की मलाही द्यायला हवा होता पुरस्कार... वगैरे.... ... त्यामुळे पाडगावकरांविषयी वाटणारी / दोन दिवस वाटलेली सारी चिडचिड एकदमच कमी झाली.... श्या ... सगळी मजाच गेली.. काय करणार?

त्यांनी पुरस्कार मागावा की नाहि ते माहित नाहि मात्र त्यांना पुरस्कार मगायला लागावा हे सरकार साठी लाजिरवाणं आहे असे वाटतं ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

टीव्हीवर पाडगावकरांनी स्वतः दिलेली प्रतिक्रिया पाहाण्यात आली. पाडगावकर पूर्णपणे गमतीत बोलत होते असं दिसत होतं. सीरियस प्रतिक्रिया नव्हती.

In reply to by घाटावरचे भट

पाडगावकर पूर्णपणे गमतीत बोलत होते असं दिसत होतं. सीरियस प्रतिक्रिया नव्हती.
मलाही तेच वाटत आहे. 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असे लिहिणारे पाडगावकर अशी शासनाच्या दारात भिकेची अपेक्षा करणार्‍यातले मुळीच नव्हेत! --बंड्या.

In reply to by घाटावरचे भट

पाडगावकरांनी पुरस्कार मागीतला नाही हे ऐकुन बर्रर्रर्ररं वाटलं. धन्यवाद भटोबा! :)

जर आपले सरकार भूतपूर्व अतिरेक्याला 'पद्म' द्यायला सरसावते तर पाडगावकरांनीच काय पण प्रत्येक भारतीय नागरिकाने हे बक्षिस मागायला काय हरकत आहे? ते कमीत कमी देशद्रोही तरी नाहींत! ------------------------ सुधीर काळे बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया! (जगजीत-चित्रा यांनी गायलेली एक अप्रतिम गज़ल)

अयोग्य व्यक्तिनां देउन पद्म पुरस्कारांचे एवढे Devaluation झाले आहे की पाडगावकरांनीही त्या पुरस्कारासाठी आपली उमेदवारी जाहीर केली असे वाटले. अगदी 'मेरा नंबर कब आयेगा' स्टाईल मध्ये. पुरस्कारासाठी उमेदवार नीवडणारेही काय पात्रतेचे आहेत हे लोकांना समजायला हवे. Short listed उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध व्हायला हवी म्हणजे समजेल की ज्याला पुरस्कार मीळाला त्याचे प्रतिस्पर्धी कोण होते ते. (पाडगावकरांची पद्मपुरस्कारांसाठीची योग्यता/पात्रता याच्यावर भाष्य करत नाही आहे.)

च्यायला, मलाच का नाय देत राव असले पुरस्कार................. :) ;) अन मला सांगा, मागितल्याबिगार हतं काय मिळतं का बाबुराव ???? कशाला उगा त्या पाडगावकरांवर कावताय ???? [(

मा. पाडगांवकरांनी असे मत मांडावे किंवा ष्टेटमेन्ट करावे. . ते योग्य आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवता येत नाही किमान त्या योग्यतेपर्यंत पोचेस्तोवर ... पण मराठी माणसाला दमच निघत नाही हे खरे, लगेच धागा काढून मोकळा. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके