Skip to main content

मराठी जुनी पुस्तकं 'डिजीटल ग्रंथालयात'

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 02/02/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल.

हक्क

लेखक नीलांबरी यांनी मंगळवार, 02/02/2010 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.

सध्याचे वाचन - २

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 02/02/2010 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
१. कर्णपिशाच्चं: लेखकः बाळा फोंडके. लेखन प्रकारः डिटेक्टिव्ह रहस्य कथा. बाळूने साफ निराशा केली. कथा अतिशय टुच्च्या आहेत. दोन पात्र घेऊन अत्यंत अ-रहस्यमय कथा रचल्या आहेत. पुस्तकाच्या कव्हर वर काळ्या बॅकग्राउंड वर एका कवटीच चित्र आहे. त्याच प्रयोजन आजूनही समजलेल नाही. मला पुस्तक हातात घेतल्यावर लय भारी वाटल होत. पण मी चू*त निघालो. २५० रुपयांना चूना !!! २. आवरण: लेखक: एस. एल. भैरप्पा. (कन्नड- अनुवादित) प्रकारः कादंबरी-वैचारीक, ऐतिहासीक . विस्मरणाने सत्य झाकोळलं जातं. त्याला आवरण म्हणातात. या थीम वर भैरप्पांनी सुंदर कादंबरी रचली आहे. रझिया-पूर्वीची लक्ष्मी. आमिरशी लग्न करते.

आज अचानक...

लेखक नीलांबरी यांनी सोमवार, 01/02/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक कातरवेळी, मनी दाटती काजळरेषा वाट चालुनि थकली पाऊले चल साजणा अपुल्या देशा गर्भरेशमी यौवन सरले, शैशव आता स्वप्नचि उरले आठवणींचा खेळ चालला संध्याछाया झाकोळती दिशा सखेसोबती वाट पाहती समांतर वाटा जरी चालती मधुर क्षणांची बकुलपुष्पे अजुनि जागविती मनी आशा पैलतीरी नेत्र लागले स्वप्नांचे आभासही नुरले नको येथले भास मखमली अन परतीची फसवी भाषा.
काव्यरस

०१०२२०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 01/02/2010 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज १ फेब्रुवारी २०१०. म्हणजेच ०१०२२०१० ... उलट सुलट कशीही वाचा तारिख तीच. आहे ना जादू? :) जाताजाता: इंग्रजी भाषेत असे दोन्ही बाजूंनी सारखेच असणार्‍या शब्दसमूहांना पॅलिन्ड्रोम म्हणतात. काही उदाहरणं... nitin malayalam Able was I 'ere I saw Elba - Napoleon Dammit, I'm mad चीमा काय कामाची अजून काही आहेत का माहिती?

मनात माझ्या...

लेखक अजिंक्य यांनी सोमवार, 01/02/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनात माझ्या विचार आले, अफाट वेगामधे पळाले, कुठून आले, कुठे निघाले, कळे न काही... मनात माझ्या उरे न जागा, लगाम नाही विचारवेगा, हजार घोडे लहान पागा, कळे न काही... मनात माझ्या अनेक वाटा, दिशादिशांना अनेक लाटा, जिथे बघावे नवीन फाटा, कळे न काही... मनात माझ्या विचार आले, सुसाट वेगे नभी उडाले, विहार केला, उडून गेले, कळे न काही...

बाप

लेखक मिसंदीप यांनी सोमवार, 01/02/2010 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी "बाप" नावाचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. तो कोणाकडे असल्यास कृपया sanbed@gmail.com वर पाठवावा ..हि विनंती.