(वेगळ्या प्रकारच्या एका विनोदाचा हा माझा पहिलाच प्रयत्न. कसा वाटला ते जरूर कळवा. यात कुणालाही आणि कशालाही दुखावण्याचा हेतू नाही.. तसे वाटल्यास हसून मोकळे व्हा - क्षणाचा सोबती)
एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना:
या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही.
तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही.