भेंडके किंवा फुंडके किंवा वड्या खानदेशात खास प्रिय आहेत...मी मात्र भेंडकेच म्हणणार...पूर्वी घरी जात्यावर तुरींपासून डाळ पाडत असत, तेव्हा जो डाळीचा चूर पडे त्याचा वापर कसा करावा म्हणून हे भेंडके बनवण्यास सुरुवात झाली...तसे भेंडके बर्याच तर्हेतर्हेने बनतात... साधे कांदा घालून, चिवळीची भाजी (जीला स्थानिक भाषेत चिव्वयी किंवा चिव्वि ची भाजी म्हणतात.) आणि घोळीची भाजी...फॉर अ चेंज माझी आई मेथीची भाजी घालूनही बनवायची...आणि हेल्थ कॉन्शस लोकांसाठी हा वाफवलेला प्रकार आहे म्हणजे अब्सोल्युटली नो ऑइल...