एक विचित्र अनुभव ...
नमस्कार मिपाकरांनो,
गेले अनेक दिवस मिपावर चाललेल्या वेगवेगळ्या चर्चा वाचत होतो. त्या अनुशंगाने मला आलेला एक विचित्र अनुभव शेअर करवासा वाटतो.
साधारण २००३-४ च्या सुमाराची गोष्ट आहे. मी आणि माझे काही मित्र अनेक रविवारी फर्ग्युसनमागील हनुमान टेकडीवर पहाटे पहाटे जायचो आणि नंतर एफ. सी. रोडवरील 'वैशाली' हॉटेल मधे नाश्ता करत असू. त्यावेळेस वैशाली हॉटेलमधे एक म्हातारा कन्नड भाषिक माणूस येत असे. बहुदा त्याची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नसावी.
मिसळपाव